घरफिचर्सऑनलाईन उत्सवांचे दिवस

ऑनलाईन उत्सवांचे दिवस

Subscribe

मार्च महिन्यात जेव्हा भारतात कोरोनाचा कहर झाला त्यावेळी इंग्लडमध्ये अनेक कलाकारांनी घरात चक्क ऑनलाईन कॉन्सर्ट केल्या. त्याला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर अनेक फेस्ट ऑनलाईन साजरे होऊ लागले. जे आपल्याकडे आज होत आहेत. कोरोनाच्या दहशतीखाली सतत वावरण्यापेक्षा बिनधास्त पण वास्तवाचे भान ठेवत लोक जगू लागले आहेत. हा जगण्याचा व सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा उत्तम मार्ग असून श्रावणातील सर्वच सण आता ऑनलाईन साजरे होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच इमारतींमध्ये आजही बाहेरच्यांना एन्ट्री नाही. यामुळे रक्षा बंधनही यावेळी ऑनलाईन साजरे करण्याचा निर्णय अनेक कुटुंबियांनी घेतला आहे.

कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करता करता अर्धं वर्षं केव्हा संपलं कळलंच नाही. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाग्रस्त, बेड, बिलं, मृत्यू, लॉकडाऊन, नोकर्‍या याशिवाय दुसर काहीच ऐकायला आणि वाचायला मिळालं नाही. त्यात आता ऑनलाईनचा बोलबोला आहे. आतापर्यंत फक्त कपडे आणि इलेकट्रॉनिक वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या जात होत्या. पण कोरोनाने ऑफिस वर्क, डॉक्टर, वाण सामान आणि शाळाही ऑनलाईन केल्या. एवढे कमी की काय आता तर लग्न, डोहाळ जेवण, बारसे, मुंज, गृहप्रवेशही ऑनलाईन होत आहेत. त्यातच आता दरवर्षी वाजत गाजत घरी येणार्‍या लाडक्या बाप्पाचं दर्शनही ऑनलाईन घ्यावे लागणार आहे. सध्या सर्वच सणावारांचे हे चित्र जगभरात पाहायला मिळत आहे.

आपल्यासाठी ऑनलाईन वर्क फ्रॉम होम हे तसं नवीनच. पण आता त्याची सवय झाली आहे. त्यातच गर्दीत जाणे टाळावयाचे असल्याने ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास आज फारसे कोणी उत्सुक नाहीत. असेच सणांबाबतीतही होत आहे. कोरोनाचा संसर्ग हे यामागचे प्रमुख कारण जरी असले तरी आता प्रत्येकाला ऑनलाईन जगण्याची सवय झाली आहे. यामुळे ऑफिस वर्क असो वा फेस्ट ऑनलाईन साजरी करण्याकडे जगाचा कल वाढला आहे. तरी इतर देशांच्या तुलनेत भारतात मात्र सणवार ऑनलाईन साजरे होण्यास तसा उशीरच झाला आहे. सात महिन्यांपूर्वी जेव्हा चीन व इतर देशात कोरोनाने हाहा:कार उडवला होता. त्यावेळी त्या त्या देशांनी सार्वजनिकरित्या साजरे होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी घातली.

- Advertisement -

कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लोकांनी एकमेकांना भेटणंच नाही तर फोनवर बोलणंही कमी केलं. कारण घराघरात कोरोनाग्रस्त होते. कोण कोणास केव्हा मदतीस बोलावेल हे सांगता येत नव्हते आणि बोलावलंच तर कोणीही जाऊ शकतं नव्हतं. पण रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीप्रमाणे लोकं हळूहळू कोरोनाबरोबर जगायला शिकली. त्यानंतर सतत कोरोनाच्या दहशतीखाली वावरणं परवडणारे तर नाहीच पण त्यातून नकारात्मक विचारच वाढत असल्याचं लोकांना जाणवलं. यामुळे तज्ज्ञांनी सकारात्मक कार्यक्रमातून नकारात्मक विचार संपवायला हवा.

अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. त्यानंतर लोकांनाही ते पटलं आणि कोरोनाच्या नकारात्मक वातावरणाला सकारात्मकतेची जोड लाभली. इतके दिवस कोरोनाच्या भीतीने मोकळा श्वास घेण्यास घाबरणार्‍या व्यक्ती बर्थडे पार्टीचेच नाही तर कोरोनामुक्त झाल्याचे सेलिब्रेशनही ऑनलाईन साजरी करू लागल्या. बघता बघता हे फॅडच तयार झालं. त्यानंतर हळूहळू कोरोना लोकांच्या अंगवळणी पडला. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक देशांनी लॉकडाऊन शिथिल तर केलाच तर काही ठिकाणी लॉकडाऊन मागे घेण्यात आला. पण तरीही संसर्गाची भीती होतीच त्यामुळे लोक एकत्र यायला घाबरु लागले आणि ऑनलाईन सेलिब्रिशनच्या निमित्ताने कोरोना काळात दूर झालेले मित्रमंडळी व आप्तजन पुन्हा एकदा जवळ आले. व्हिडीओ चॅटींग करुन लोक मन मोकळं करू लागले. आता तर इंग्लडमध्ये ऑनलाईन विकेंड साजरा करण्याचं फॅड आलं आहे. लोक विकेंडला घर सजवतात. पार्टीचा माहोल तयार करतात. नवीन कपडे घालून चियर्स करत एकमेकांना शुभेच्छा देतात. एकमेकांना व्हिडीओत बघत नाचतात. हास्य विनोद करतात. कोरोनाची वावटळ अजूनही आहे हे तात्पुरतं का असेना पण विसरतात व आनंदाने जगतात.

- Advertisement -

मार्च महिन्यात जेव्हा भारतात कोरोनाचा कहर झाला त्यावेळी इंग्लडमध्ये अनेक कलाकारांनी घरात चक्क ऑनलाईन कॉन्सर्ट केल्या. त्याला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर अनेक फेस्ट ऑनलाईन साजरे होऊ लागले. जे आपल्याकडे आज होत आहेत. कोरोनाच्या दहशतीखाली सतत वावरण्यापेक्षा बिनधास्त पण वास्तवाचे भान ठेवत लोक जगू लागले आहेत. हा जगण्याचा व सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा उत्तम मार्ग असून श्रावणातील सर्वच सण आता ऑनलाईन साजरे होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच इमारतींमध्ये आजही बाहेरच्यांना एन्ट्री नाही. यामुळे रक्षा बंधनही यावेळी ऑनलाईन साजरे करण्याचा निर्णय अनेक कुटुंबियांनी घेतला आहे. मंगळागौरही अशाच पद्धतीने साजरी करण्याचा बर्‍याच महिलांचा मानस आहे. तर त्यातही गणपतीसारखा मोठा उत्सव ऑनलाईन साजरा होत आहे. यामुळे यावर्षी घरात बसूनच मित्रमंडळी व नातेवाईकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

दरम्यान, कोरोना संपण्याची चिन्हे नसल्याने दिवाळीही ऑनलाईन साजरी करण्याचा प्लान अनेक कुटुंबानी आखला आहे. तर काहीजण ख्रिसमसही ऑनलाईन साजरी करण्याच्या विचारात आहेत. गर्दी नाही, गोंधळ नाही, धूसफूस आणि हेवेदावेही नाहीत. याच पार्श्वभूमीवर ऑनलाईन सण साजरे करण्याचे हे फॅड सध्या परिस्थितीनुसार जरी असले तरी आताच्या काळात लोकांना असेच अंतर ठेवून जगण्याची सवय झाली आहे. यामुळे येणारे अनेक महिने नातेवाईक आपल्याला ऑनलाईनच भेटले तर त्यात नवल वाटायला नको.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -