घरक्रीडावर्ल्डकप २०११चा हिरो धोनी, आताच्या पराभवाचा व्हिलन

वर्ल्डकप २०११चा हिरो धोनी, आताच्या पराभवाचा व्हिलन

Subscribe

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाने भारताचा पराभव केला. त्या पराभवाची कारणमिमांसा करणारा हा विशेष लेख

मी‌‌ धोनीला जबाबदार धरतोय. कारण आशाही त्यांच्याकडून होती आणि निराशही‌ त्यानेच केलं.
वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर झालीये
. पण हा पराभव जिव्हारी लागला. हा पराभव टोचणारा होता …आहे. कारण या वर्ल्ड कपमधली बेस्ट टीम आपली होती. वर्ल्ड कप जिंकण्याची सर्वोत्तम संधी आपल्याला होती. आपण फायनलमध्येही जावू शकलो नाही. टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकायला हवा होता. २०११ पेक्षाही उत्तम टीम आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधी टीम, टीम इंडियाच्या तोडीच्या नव्हत्या.

न्यूझीलंड विरुद्ध सेमिफायनल आपण जिंकायलाच हवं होतं. २४० चं टार्गेट कुठल्याही पिचवर चेस करण्याची कपॅबिलीटीआपल्या टीममध्ये आहे. मग सेमिफायानल का हरलो?

- Advertisement -

. सर्वात प्रमुख कारणधोनी

इमोशनली विचार करण्याआधी मला काय म्हणायचंय ते समजून घ्या. सेमिफायनलमध्ये टीम इंडियाचा कमबॅक फक्त रविंद्र जाडेजानं केला. त्याची इनिंग लाजवाब होती. रविंद्र जाडेजा खेळतांना तो जिंकण्यासाठी खेळत होता. त्याच्यात तो इंटेन्ट दिसत होता. धोनीनं त्याला साथ दिली. पण धोनीकडून त्यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या. तो धोनी आहे म्हणून अपेक्षा होत्या. रविंद्र जाडेजा सहजपणे बाँड्री मारत असतांना धोनी अनेकवेळा सिंगलही घेई शकत नव्हता. धोनीकडे अशा परिस्थितीचा अनुभव होता. १० चा रनरेट झाल्यानंतरही धोनीचा वेग वाढला नाही. आणि रविंद्र जाडेजा आऊट झाल्यावर धोनीनं रन आऊट होणं हे दुर्दैवी नाही बेजबाबदार होतं.

- Advertisement -

अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा खेळ निराशाजनक होता. आणि तसाच खेळ त्यानं सेमिफायनललाही केला. त्याच्या कालच्या खेळावर बोलताना मी त्याचं योगदान त्यानं जिंकून दिलेला वर्ल्ड कप विसरलो नाही. पण २०११ मध्ये जिंकल्यावर डोक्यावर घेतलं. आज पराभूत झाल्यावर त्याचं विश्लेषण करण्यात काय चूक आहे.? धोनी त्याचा खेळ योग्यवेळी उंचावू शकला नाही. रविंद्र जाडेजावरचं प्रेशर कमी करण्याऐवजी डॉट बॉलमुळे वाढलं. धोनी योग्यवेळी आणि टीमला गरज असतांना धावांचा वेग वाढू शकला नाही. पराभवाचं हे माझ्या मते प्रमुख कारण आहे.

ms dhoni
महेंद्र सिंह धोनी

. धोनीचा बॅटिंगचा क्रमांक चुकला

महेंद्र सिंग धोनीला हार्दीक पंड्याच्या आधी बॅटिंगला पाठवायला हवं होतं. हार्दीक काय, पंतच्या आधी‌ धोनीला पाठवायला हवं‌ होतं. धोनी स्लो खेळत होता. त्याला सेट व्हायला वेळ लागतोय. हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घडूनही धोनीला खाली ठेवण्यात आलं. रन रेट वाढवण्याची, वेगानं धावा‌‌ करणं धोनीला जमत नव्हतं. त्यावेळी गरज होती ती विकेट थोपवून‌ धरण्याची. माही त्यात माहीर आहे. तो पंत , कार्तिकचा मार्गदर्शक बनला‌ असता. त्यांना आततायिपणा करण्यापासून रोखू शकला असता. रन रेट वाढवण्याची, कुठलीही गरज नसतांना हार्दीकला वर बॅटिंगला पाठवण्यात आलं. त्याऐवजी धोनी आला असता तर त्याला सेट व्हायला अधिक वेळ मिळाला असता. आणि खाली जेंव्हा फटकेबाजीची गरज असती तेंव्हा हार्दीक उपयोगी ठरला असता.

hardik p
हार्दिक पांड्या

. बेजबाबदार पंत आणि हार्दीक

सेमिफायनलमध्ये हिरो बनण्याची नामी संधी या दोघांकडेही होती. क्रिकेट इतिहासात आपलं नाव कोरण्याची सुवर्ण संधी दोघांकडे होती. ऋषभ पंतने तर सुरुवातही उत्तम केली. तो खेळत असताना न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. हार्दीक आणि पंतची पार्टनरशिप अजून ४०५० रन्स चालली असती तरी सामना भारताच्या बाजूनं झुकला असता. ऋषभ पंतनी मारलेला फटका मुर्खपणाचा कळस होता. आपण आयपीएल नाही वर्ल्ड कप खेळतोय आणि लीग मॅच नाही वर्ल्ड कप सेमिफायनल आहे. याचा त्याला विसर पडला. मॅच्युरिटीचा अभाव आणि बेजबाबदारपणा पंतला नडला. टीमनं त्याच्यावर विश्वास दाखवला पण त्यानं माती खाल्ली. फ्लेमबॉयंट असणं आणि मूर्ख आणि बेजबाबदार असणं यात फरक असतो. पंतनी टीमचा आणि फॅन्सचा विश्वासघात केला. हार्दीक पंड्या त्याच्याच धुंदीत जगतो. त्याचा उद्दामपणा त्याला स्वॅग वाटतो. स्वॅग त्याला शोभतोही. पण त्याच्यात कपिल देव शोधणाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका. ६२ चेंडू खेळल्यावर,सेटल झाल्यावर हार्दीक पंड्यानं केलं त्याला गाढवपणा म्हणतात. टीमला गरज असतांना‌ तुम्ही इतके बेजबाबदार कसे वागू शकतात.

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत

. दिनेश कार्तिक टीमवर भार

सेमिफायनलमध्ये जे संकट ओढवलं, अशाच संकटासाठी दिनेश कार्तिकची निवड झाली होती. मधल्या फळीत तो सांभाळून घेईल अशी त्याच्याकडून अपेक्षा होती. काल मिळालेली संधी तर त्यानं दवडलीचं. पण २५ चेंडू खेळल्यावर त्यानं मारलेला फटका म्हणजे आत्मघात होता. नीशमनी घेतलेला झेल अप्रतिम होता. पण दिनेश कार्तिकनं काल त्याच्या लौकिकाला साजेशा खेळ केला नाही.

. टॉप ऑर्डर कोसळली

टीम इंडियाच्या पराभवाचं शेवटचं कारण आणि माझ्या मते वरच्या चार कारणांपेक्षा कमी महत्त्वाचं आहे. कारण भारताची टॉप ऑर्डर ही टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होती. आणि म्हणतात ना sometime your strength became your weakness. भारताची टॉप ऑर्डर कोसळली तर भारताचा पराभव निश्चित आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप प्रवासाला सुरुवात होण्याआधीपासून हे बोलल्या जातं होतं. भारताची मिडल ऑर्डर कमकुवत
आहे
. हे वारंवार सांगितल्या जातं होतं. टीम मॅनेजमेंटनेही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं सेमिफायनलला येऊन ही भीती खरी ठरली. सेमिफायनलमध्ये टॉप ऑर्डर कोसळली. या टॉप ऑर्डरनीच आतापर्यंत झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली होती. सगळ्यांना ज्याची भीती वाटत होती ती मूठ बुधवारी उघडली आणि टीम इंडियाची मीडल ऑर्डर उघडी पडली. यंगस्टरनी बेजबाबदार खेळ केला. आणि ज्यांच्याकडे अनुभव होता त्यांना खेळ उंचावता आला नाही. रोहित आणि विराटनी सेमिफायनलपर्यंत आऊट स्टँडिंग खेळ केला. ते कधीना कधी फेल जाणार होते दुर्भाग्य सेमिफायनलमध्येच त्यांनी निराश केलं. रोहित आणि विराटवर कायम अवलंबून असणाऱ्या टीमचं पितळ उघडं पडलं. एकदोन बॅट्समनवर अवलंबून असलेली टीम काही मॅच जिंकू शकते. वर्ल्ड कप नाही.

कोहलीने केले मान्य

. दिवस कुणाचा?

कालचा दिवस भारताचा नव्हता. असं म्हणणाऱ्याची कीव करावीशी वाटते. १०० किंवा १५० वर ऑलआऊट झालो असतो तर मान्य केलं असतं. कारण भारतीय फलंदाजीची ताकद सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे १००१५० स्कोअर म्हणजे bad day. 30 बॉल ६० रन्स नव्हे.

मी धोनीचा अपमानही करत नाहीये. आणि त्याच्या योगदानाचा मला विसरही पडला नाही. धोनी होता म्हणून इतक्या धावा झाल्या असा युक्तिवाद अनेक जण करतायत. पण तो स्कोअर जाडेजामुळे झाला. विजयाच्याजवळ नेणारा नव्हे तर विजय मिळवून देणारा हिरो ठरतो. धोनी legend आहे म्हणून त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. विजयाजवळ नेलं हा एक्सक्युज असू शकत नाही.

१९९९ मध्ये झालेली भारतपाकिस्तान चेन्नई टेस्ट आठवते का? 270 धावांचा पाठलाग करतांना. भारताचा डाव ५ बाद ८२ असा गडगडला होता. सौरव गांगुली,अझरुद्दीन,लक्ष्मण,रमेश आणि राहुल द्रविड सगळे पॅव्हेलियनमध्ये परतले होते. तिथून सचिननं टीम इंडियाला मॅचमध्ये परत आणलं. १३७ धावांची जिगरबाज खेळी केली. आणि त्याला मोलाची साथ दिली. ती नयन मोंगियानं. टीमला विजयासाठी फक्त १६ धावांची गरज असतांना सचिननं अत्यंत वाईट शॉट खेळून आऊट झाला. आणि आपण ती मॅच १२ धावांनी हरलो. सचिन त्या पराभवासाठी स्वत:ला जवाबदार ठरवतो. कारण विजयाच्या जवळ आणून होतं नाही. विजय मिळेपर्यंत थांबण्याची जबाबदारी त्याची होती. आशाही त्यानंच दाखवली आणि निराशही त्यानंच केलं.
१९८३ च्या‌ सेमिफायनलमध्ये यापेक्षा वाईट अवस्था होती
. कपिल देवने किल्ला लढवला होता. विजय निश्र्चित होईपर्यंत तो पाय रोवून‌ उभा होता. त्यामुळे धोनीवर कितीही प्रेम असलं तरी पराभवाचं प्रमुख कारण धोनीची, शेवटच्या षटकांमधली स्लो हरलो खेळी होती.

Where did the 13 players of indian cricket team who win the 2011 World Cup
२०११ ची विश्वचषक स्पर्धा जिंकवून देणारे १३ खेळाडू गेले कुठे?

२०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यावर धोनीला डोक्यावर घेतलं. जर आता तो चुकला असेल तर बोलण्यात गैर काय? धोनीचा मंदावलेला खेळ सगळ्यांना दिसत होता आणि धोनीलाही त्याची जाणिव होती. आयपीएलमध्येही ते दिसलं. तरीही तो वर्ल्ड कप खेळला. २०११ च्या वर्ल्ड कपची तयारी करतांना अनेक सीनिअर खेळाडूंना संघाबाहेर करणाऱ्या धोनीनं, त्याच्यावर वेळ आल्यावर मात्र नियम बदलला. तो धोनी होता म्हणूनच अपेक्षा होती विजयाची. तो धोनी होता म्हणून त्याच्याकडून विजयी खेळीची अपेक्षा होती. पण सेमिफायनलमध्ये त्याची खेळी त्याचा अॅप्रोच याच्यावर कायम प्रश्न राहिलं. रविंद्र जाडेजानंतर धोनीचं सामना जिंकू देऊ शकला असता. धोनीवर जबाबदारी होती त्याच्यावरच आशा होत्या. तोचं x-फॅक्टर होता. तुम्ही युक्तिवाद कराल त्याच्यामुळे क्लोज मॅच झाली. पण मॅचमध्ये आपण परतलो ते फक्त आणि फक्त जाडेजामुळे. त्यानं विजयाच्या जवळं आणलं आणि धोनीनं दूर लोटलं.

धोनी महान होता आहे आणि राहिलं. म्हणून‌ आज‌ जे घडलं‌ ते योग्य ठरत नाही. २०११च्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या धोनी हिरो होता. आणि २०१९ वर्ल्ड‌कपच्या सेमिफायनलच्या पराभवचा व्हिलन आहे.

– अमित मोडक
[email protected]

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून क्रीडा आणि चित्रपट हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -