घरफिचर्सएकनाथराव शिंदे: तळागाळातील लाखो शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत

एकनाथराव शिंदे: तळागाळातील लाखो शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत

Subscribe

मुबई ठाण्यासह संपूर्ण राज्याला एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक मोठं वलय निर्माण झालंय. राजकारणाच्या क्षितिजावर स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र शिपाई म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव संपूर्ण राज्यात नावारूपाला आले आहे.

एकनाथ शिंदे साहेब म्हणजे शिवसैनिकांसाठी जीव की प्राण असे हे नेतृत्व असून मला या नेतृत्वाने एकदा नव्हे दोनदा अनपेक्षीतपणे अंबरनाथ नगरीच्या नगराध्यक्ष पदावर संधी दिली. शिवसेना शाखाप्रमुख पासून ते पाणीपुरवठा सभापती आणि एकदा नव्हे दोनदा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी मला त्यांनीच दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचा सहभाग असलेल्या अंबरनाथ पालिकेत राजकीय डावपेचाने मला रातोरात नगराध्यक्ष बनवले. नुसते नगराध्यक्ष हे शोभेचे पद न देता त्यांनी अंबरनाथ नगरीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी त्यावेळी दिला. त्याचप्रमाणे आमदार बालाजी किणीकर, युवा लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील अंबरनाथ नगरीमध्ये मी एकनाथ शिंदे याच्या आशीर्वादाने उत्तम काम करू शकलो याचा तेवढाच अभिमान आहेच.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यावर विशेष प्रेम
खान्देश आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम राहिले असून ज्या वर्षी मी नगरसेवक झालो त्या वर्षी अपुरे संख्याबळ असताना देखील मनसेच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांनी हात उंच करून मला नगराध्यक्ष पद दिले त्यावेळी राज्यभर मनसे आणि शिवसेना पॅटर्न म्हणून युतीचा संदेश गेला होता.

शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून अबरनाथ पॅटर्न राज्यभर राबवला जाईल की काय, अशी दखल त्यावेळी संपूर्ण मीडियाने घेतली होती, यावेळी अंबरनाथ नगरीसह मुंबई-ठाणे परिसरात एकाच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे या दोघांच्या जवळचे नेते म्हणून माझ्याकडे पाहिले गेले होते.

- Advertisement -

अंबरनाथच्या विकासाचा ध्यास
नगराध्यक्ष असताना विकासाच्या कामकाजाच्या संदर्भात व लोकप्रतिनिधीच्या वर्तनाबाबत मी टीकात्मक कविता लिहिली होती. या कवितेच्या संदर्भात नगरसेवकांनीच एकनाथ शिंदे साहेबांकडे माझी तक्रार केली होती, म्हणून मला एकनाथ शिंदे यांनी घरी बोलवून या सर्व प्रकरणाबाबत विचारणा केली आणि मी देखील नगरसेवकाच्या वर्तणूकबाबत माहिती दिली. माझे सर्व ऐकून घेतल्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही योग्य केले आहे, असे म्हणून जाहीर पाठराखण त्यावेळी केली होती.

त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब म्हणजे विकासाचे व्हिजन असलेला प्रामाणिक नेता असून ते खर्‍या अर्थाने विकास पुरुष आहेत हे सिद्ध झाले होते. माझ्या मनातील घुसमट त्यांनी अवघ्या काही मिनिटांत त्यावेळी त्यांनी काढली होती.

मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खान्देशाच्या माणसांवर मोठे प्रेम असून त्याची प्रचिती मला नेहमीच येत असते. नुकतेच जळगावात पाळधी गावी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे शिंदे साहेब आलेले असताना त्यांनी विमानतळावर विचारले की सुनील आपल्याला आव्हाण्याला जायचे आहे. त्यांना मी म्हटले की साहेब आज सर्व आव्हाणे गाव पाळधीला आहे. तसेच माझे आजोबा यांचा 100 वाढदिवस आम्ही अंबरनाथ येथे घरी साजरा करत असताना त्यांनी अचानक माझ्या घरी येऊन जीभाऊना शुभेच्छा दिल्या त्या वेळी आमचा सर्व चौधरी परिवार अक्षरशः भारावला होता. जीभाऊचा 100 वाढदिवस आणि मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अचानक इन्ट्री आजही माझ्या लक्षात असून तो क्षण अजूनही आमच्या डोळ्यासमोर फिरतो.

एकनाथ शिंदे साहेब हे राजकारणातलं परीस व्यक्तिमत्व असून जे जे जवळ गेले आहेत त्यांचं सोनं झालं आहे हे मी अनेक दशके पाहतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे सुरू ठेवला असून शिवसैनिकांची देखभाल करणारा हा माणूस मोठ्या उंचीवर आज पोहोचला असून त्यांची राजकारणातली उंची आणि महाराष्ट्रभर वाढलेले वजन आम्ही पाहत असताना आमचे हृदय नेहमीच गहिवरून येत असते. आज राज्यभरातील लाखो शिवसैनिकांच्या हृदयात एकनाथ शिंदे साहेब असून आमच्या गळ्यातील ते ताईत आहेत.

एकनाथ शिंदे साहेब आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आम्ही तिघेही मुबंईत नेहमीच जळगाव जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा करून जळगाव शहर आणि जिल्ह्यात काही देता येईल याबाबत विचार विनिमय करत असतो.

आज एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देताना परम कृपाळू परमेश्वराला हीच विनंती करेन की शिंदे साहेबांना राज्यातील शिवसैनिकांची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य लाभु दे आणि निरोगी आयुष्य दे…कारण अशा नेत्याच्या हातून राज्याची सेवा व्हावी हीच मागणी परमेश्वराकडे करतो.

–*सुनील चौधरी*
माजी नगराध्यक्ष अंबरनाथ
अध्यक्ष – दोडे गुर्जर समाज मुंबई-ठाणे-कोकण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -