घरफिचर्सउद्योजक जे.आर.डी. टाटा

उद्योजक जे.आर.डी. टाटा

Subscribe

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी.टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. टाटांचा जन्म 29 जुलै १९०४ मध्ये पॅरिसमध्ये झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रलंड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्समध्ये गेले. काही कारणाने ते मॅट्रिक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. 1९३२ साली त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.

- Advertisement -

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले. टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्र शासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. टाटा यांना अनेक पुरस्कार मिळाले.

- Advertisement -

194 8 मध्ये त्यांना भारतीय हवाई दलाने गटाच्या कर्णधारपदाचा मानद पद दिले. 4 ऑक्टोबर 1966 रोजी एअर कमांडर रँक (सैन्यात ब्रिगेडियर समतुल्य) म्हणून बढती दिली गेली आणि त्यानंतर १ एप्रिल 1974 रोजी एअरमध्ये व्हाईस मार्शल रँक पदावर पदोन्नती झाली. विमानसेवेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आले. मार्च 1979 मध्ये टोनी जॅनुस अवॉर्ड, 1985 मध्ये फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनलचे गोल्ड एअर मेडल त्यांना मिळाले. अशा या महान उद्योजकाचे 29 नोव्हेंबर १९९३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -