घरट्रेंडिंगचॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव सोबत दिलखुलास गप्पा

चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव सोबत दिलखुलास गप्पा

Subscribe

अनिकेतचा नवा कोरा मराठी सिनेमा 'माझ्या बायकोचा प्रियकर' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने अनिकेतशी दिलखुलास गप्पा

नाटक, मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अनिकेतचा अभिनय प्रवास तितका सोपा नव्हता. डहाणूकर महाविद्यालयातून अभिनयाचे धडे घेत त्याने मराठी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि आता तो आणखी एका नव्या सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ असे या सिनेमाचे नाव असून हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी आहे.

- Advertisement -

आज फेसबुक LIVE च्या माध्यमातून अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत आपण दिलखुलास गप्पा मारत आहोत. LIVE मुलाखत पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

कॉमेडीची सुग्रास फोडणी

अनिकेतसोबत ‘माझ्या नवऱ्याचा प्रियकर’ या सिनेमात विनोदवीर प्रियदर्शन जाधव देखील आहे. यात प्रियदर्शन एका भूताची भूमिका साकारत असून अनिकेतच्या आवडता विनोदवीर प्रियदर्शन जाधव आहे. त्यामुळे या सिनेमात त्यांची एक वेगळीच भट्टी जमली आहे. त्यामुळे हा सिनेमा फुल टू धम्माल आणणार, असा विशवास अनिकेतनं व्यक्त  केला आहे.

- Advertisement -

आला भूताचा अनुभव ?

माझ्या बायकोचा प्रियकर हा सिनेमा हॉरर कॉमेडीपट असल्यामुळे या चित्रपटाच्या शुटींगबद्दलही आम्ही जाणून घेतलं. अनिकेतला या सिनेमाचे शुटींग भोरच्या वाड्यात झाले आहे. या विषयी अनिकेत म्हणाला की, या आधी भोरच्या वाड्यातील अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. पण त्याचा अनुभव अनिकेतला शूट दरम्यान आला नाही. पण या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सेटसाठी घेतलेली मेहनत, लाईट हे सगळचं घाबरवणारं होतं असं देखील तो म्हणाला.

नाटकापासून झाली सुरुवात 

अभिनयात येण्याचा विचार अनिकेतने कधीच केला नव्हता. नाटकाचा त्याला फोबिया होता. पण नाटकापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली. कठीण कठीण कठीण किती या नाटकातील त्याचा रोल अगदी लहान होता. पण त्याच्या अभिनयाची छाप त्याने या नाटकात पाडली आणि त्यानंतर त्याने अनेक मराठी नाटकांमधून कामं केली.

‘ब्रेकअप के बाद’ गाण्यातून पोहोचला घराघरात

‘ब्रेकअप के बाद’ या गाण्यातून अनिकेतला एक वेगळी ओळख मिळाली. रुईयाच्या ‘SAY’ बँडच्या मुलांनी तयार केलेलं हे गाणं आणि गाण्यातील अनिकेतच्या अभिनयामुळे हे गाणं अगदी ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाच्या मोबाईलपर्यंत पोहोचले. आजही हे गाणं तितकचं रिफ्रेशिंग वाटतं.


वाचा विस्तृत मुलाखत आपलं महानगरच्या रविवारच्या अंकात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -