घरताज्या घडामोडीप्रसिद्ध विश्वकोशकार गणेश भिडे

प्रसिद्ध विश्वकोशकार गणेश भिडे

Subscribe

गणेश रंगो भिडे हे प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार होते. त्यांचा जन्म 6 जून 1909 रोजी अष्टे (सांगली) येथे झाला. त्यांचे बहुतेक सर्व वास्तव्य कोल्हापुरात होते. त्यांचे शिक्षण एम.ए., बी.टी. व मॅट्रिकनंतर ते प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करीत असताना विणकाम व पाकशास्त्र या विषयांवरील पुस्तके तसेच हाउसहोल्ड एन्सायक्लोपीडिया पाहून मराठीत अशा प्रकारची पुस्तके असणे आवश्यक आहे, अशा विचाराने भिडे यांनी दोनच दिवसांत ३५ विषयांची यादी तयार केली व पुढे २० एप्रिल १९३१ रोजी मा. त्र्यं. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात व्यावहारिक ज्ञानकोश मंडळाची स्थापनाही केली. २० मार्च १९३३ रोजी या मंडळाचे ‘लिमिटेड कंपनी’मध्ये रूपांतर होऊन त्याद्वारे १९३५ मध्ये प्रस्तुत कोशाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. स्वत: भिडे यांनी सर्वत्र हिंडून त्याची विक्री केली. व्यावहारिक म्हणजे जीवनास आवश्यक असे ज्ञान देणार्‍या या कोशाचे बहुतेक लेखन अप्रसिद्ध पण व्यासंगी होते.

लेखनाचा उत्तम दर्जा, चित्रे व छायाचित्रे, सुबक बांधणी आणि त्यामानाने किंमत कमी ही कोशाची वैशिष्ठ्ये म्हणावी लागतील. स्वातंत्र्योत्तर काळात नवे ज्ञान देणारा अभिनव मराठी ज्ञानकोश प्रसिद्ध झाला. त्याचे पाच खंडच प्रसिद्ध होऊ शकले.‘सिनेमासृष्टी’ हे मराठीतील चित्रपटविषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले. सेवक, पुढारी व उषःकाल या नियतकालिकांतही त्यांनी काम केले आणि पुण्याच्या केसरी व त्रिकाल वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणूनही काम पाहिले. (१) व्यावहारिक ज्ञानकोश खंड, १-५ (१९३५-४०), (२) बालकोश खंड, १ (१९४२), (३) अभिनव ज्ञानकोश खंड, १-५ (१९६३-७९), (४) फोटो कसे घ्यावेत? (५) सावरकरसूत्रे (६) कोल्हापूर दर्शन(पु.ल.देशपांडे यांच्या सहकार्याने, १९७१) व (७) कलामहर्षी बाबूराव पेंटर (१९७८). इत्यादी लेखन त्यांनी केले. अशा या प्रसिद्ध विश्वकोशकाराचे ८ जून १९८१ रोजी निधन झाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -