घरफिचर्सइंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

Subscribe

1720 मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात घेतले (1721). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली.

मल्हारराव होळकर यांचा आज स्मृतिदिन. मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी होळ (जेजुरीजवळ) येथे झाला. त्यांचे वडील खंडूजी हे शेतकरी व चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली.

1720 मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात घेतले (1721). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावांस खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी 1725 मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली.

- Advertisement -

तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली मात्र कंठाजी कदमबांडे यांच्या आश्रयाखाली आपला भाग्योदय झाला, ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी आपला स्वतःचा झेंडासुद्धा कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच केला. नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांना दिले (1735). बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले.

1745 साली म्हणजे अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांकडे साडेचौर्‍याहत्तर लाखांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायांमध्ये भाग घेतला. मल्हाररावांनी 1735-38 दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. अशा या पराक्रमी योद्ध्याचे 20 मे 1766 रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -