घरफिचर्सकृषी संस्कृतीचं देणं

कृषी संस्कृतीचं देणं

Subscribe

आपल्यासाठी दिवाळी म्हणजे नवीन कपडे, फटाके, फराळ, कंदील आणि चार-सहा दिवसांचा आनंद एवढाच तपशील असतो, तर गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षांतही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो. आपल्या इतर सर्व सणांप्रमाणेच दिवाळी हे आपल्या प्राचीन व समृद्ध ‘कृषी संस्कृती’चं आपल्याला देणं आहे.

गाव शहर जोडणारे काही क्वचित क्षण माणसाच्या जीवनात येतात, त्यापैकी वर्ष भरातील अनेक उत्सव आणि सणासुधीचे दिवस. आपण नेहमी गावाकडची गणपतीला, दसरा, दिवाळी आणि संक्रांतीला गावाला जातो.

अनेकांना आपण गाव सोडून शहरात कामाला आणि रोजगार शोधत शहराकडे येतो. काहींचे अजून गावात घर, शेती आई वडील आणि नातेवाईक असतात. विशेषता मुलांना दिवाळी, गणपती आणि उन्हाळ्यात सुट्टीचा काळ असतो. मोठे माणसे पण सुट्टी घेतात. पाऊस संपलेला असतो. आपल्या कडची घरे थोड्या प्रमाणात रंगरंगोटी करण्याचा काळ असतो. आपण दिवाळीत साफसफाई, घराला रंग व रोषणाई करतो.

- Advertisement -

ठिकठिकाणी बाजारात कपडे, मिठाई, दिवे, रोशनाईची दुकाने सजतात. आपण तिथे खरेदी करतो. दिवाळीचे खरे महत्व शहरात समजत नाही आणि त्याचा खरा अर्थ ग्रामीण भागात दिसतो. आपले जीवन कृषी आणि पशुधनावर आधारित आहे.विदर्भात खास करून कृषी आणि पशुधन आधारित जीवन आहे आणि अनेक कुटुंबाची उपजीविका आधारित आहे.

तर, शहरात अत्यंत थाटामाटात व झगमगाटात आपण साजरी करत असलेल्या श्रीमंत दिवाळीची मुळं आपल्या ग्रामीण संस्कृतीत, गावाकडच्या मातीत रुजलेली आहेत. आपल्यासाठी दिवाळी म्हणजे नवीन कपडे, फटाके, फराळ, कंदील आणि चार-सहा दिवसांचा आनंद एवढाच तपशील असतो, तर गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षांतही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो. आपल्या इतर सर्व सणांप्रमाणेच दिवाळी हे आपल्या प्राचीन व समृद्ध ‘कृषी संस्कृती’चं आपल्याला देणं आहे.

- Advertisement -

पावसाळा संपला. विदर्भातील पूर्व भागात धान (भात पिके) आणि पश्चिम भागात कापूस, सोयाबीन आणि तूर पिके घेतात.
विशेषत: आपल्या शेतमालाची रास, येणार्‍या किलातून उत्पन्न पैसे आणि पशुधानातून गायी म्हैस यातून दूध व इतर पदार्थ आणि शेळी- मेंढी च्या विक्रीतून आलेला पैसा व त्याचे समाधान आणि मुख्यत: आभार मानायचा सन दिवाळी होय.विदर्भात दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. एकूण पाच दिवसांचा हा सोहळा. आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील आत्यंतिक महत्त्वाचा सण.

विदर्भात पशुपालक आणि अनेक शेतकरी पशु पाळतात. तेव्हा या सणाची सुरवात वासू बारस आणि शेतमालाचे उत्पादन निघणारा काळ म्हणजे धनत्रयोदशी मानतात. विदर्भात गोवारी व माना आदिवासी, धनगर, नंदा गवळी, गवळी, मथुरा बंजारा, गोलकर आणि कुरमार समाज आहे. सध्या राजस्थान आणि गुजरातमधून आलेले घुमान्तु जातीचे भरवाड व राबाडी सुधा काही स्थायिक झालेले आहेत.

या समाजाच्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, बारस या शब्दाचा ‘वासरू’ शब्दात काही अर्थ निघतो. गाय आणि वासरू यांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. दुधदुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग व शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञता पूजा केली जाते. गोठ्यातील गोधन, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढ्या हेच शेतकर्‍याचे खरे धन. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस.

नंतरचा दिवस तो धनत्रयोदशीचा, कोणत्या कोणत्या वर्षी एकाच दिवशी दोन्ही दिवस येतात. शेतकर्‍यांच्या दृष्टीने शेतात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन. ‘धान्य’ हा शब्द उत्पनाच्या स्वरुपात धनधान्य घेऊन येणारा मानला जातो.
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे ‘नरक चतुर्दशी’. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरक चतुर्दशी’म्हणतात. घरासमोर शेणाचा राक्षस करतात व त्यालाचं सजवतात. या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषी संस्कृतीची प्रथा होती.

चौथा दिवसाला लक्ष्मीपूजन मानतात, या दिवशी घरासमोर शेणाचा सडा अंगणात टाकतात (पाणी) व मातीचे लेप (सारवण) लावून घर स्वच्छ करतात. या दिवशी नवीन केरसुणी किवा सिंधीच्या झाडाचा कचरा काढायला नवा फडा घेतात. आपण या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं, धान्य यांची पूजा करतो. नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. पाचवा दिवस गाय गोधन असते याला आपल्याकडे पाडवा म्हणतात.

गावाकडे व आमच्याकडील पशुपालकासाठी मोठा दिवस असतो. या दिवशी गोठ्यातील गोधनाची, शेळ्या-मेंढ्यांची पूजा केली जाते. गाय बैल आणि म्हैस यांना सजवतात काहीना रंग लावतात. त्यांना आंघोळ घालून सजवतात. विदर्भातल्या सर्व पशु पालक समाज या पशूंचा विशेष कृतज्ञता मानतात. या दिवशी जनावरांची गावात फेरी मारतात त्याच्या सोबत खेळतात. आपल्याकडे उत्कृष्ट जनावर आहे असे त्या संदर्भात चर्चा करतात. प्रत्येक पशु पालक समाज आपल्याकडील स्थानिक जातीचे संरक्षण करतात आणि या वारसाचे जतन करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. ग्रामीण भागात या दिवसाला ‘बलिप्रतिपदा’ आता दिवाळीचा शेवटचा म्हणजे ‘भाऊबीजेचा’ दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. जर काही कारणाने बहिणीच्या घरी भाऊ जाऊ शकला नाही अथवा तिला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते.

दिवाळी झाली की, अनेक शेतकरी आपले धान्य ( भात) आणि पश्चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, आणि तूर डाळ विक्रीला घेवून जातात आणि पशु पालक आपले जनावर बजारात विक्री ला काढतात.

सन उत्सव परंपरा याला विशेष महत्व आहे, आपण आपल्या कामाची सुरवात एप्रिल मे या महिन्यांपासून शेतावर काम करतो आणि नंतर आपल्या कडे धान्य घेण्याचे हंगाम सुरु होते, आणि याच काळात आपण धन धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हावं असा सण साजरा करतो. आपले शरीर थकलेले असते. आपण निसर्गाचे आणि ईश्वराचे धन्यवाद मानण्यासाठी या दिवसाची वाट बघतो आणि दिवाळीचा सण झाल्यावर आपले उत्पादन बजारात विक्रीला घेऊन जातो. आणि येणार्‍या नव्या रब्बी हंगामाच्या तयारीला लागतो.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात धान (भात) उत्पादन झाल्यानंतरच्या हंगामात गावाकडे किवा आदिवासी भागात यात्रा भरतात याला मंडई म्हणतात. या मंडईमध्ये किंवा प्रत्येक गावात नाटक आयोजित करतात. या पूर्व जिल्ह्यातील भागाला झाडीपट्टी म्हणतात. म्हणजे शेत आणि जंगला लगतचा भाग. याच शेतात काम करणारे मजूर किवा शेतकरी या नाटकात कलाकार असतात. स्थानिक वेशभूषा आणि कलाकार असल्यामुळे खूप उत्सुकता असते. वडसा गडचिरोली या भागात सर्व नाट्य मंडळं आहेत. आता अलीकडे बाहेरच्या भागातून कलाकार आणतात.

सगळे सण यात्रा व उत्साह माणसाच्या जीवनातील निराशा दूर करून नवे रस्ते शोधणे व नवी कामे हाती घेण्यासाठी उत्साह निर्माण करतात.

-प्रवीण मोते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -