घरफिचर्सनातवंडांचं आजी - आजोबांशी नातं

नातवंडांचं आजी – आजोबांशी नातं

Subscribe

खरं तर नातवंडांना निखळ, शुद्ध प्रेम देणं हीच महत्त्वाची जबाबदारी आजी - आजोबांची झाली आहे. पालन - पोषण करण्यापेक्षा आपल्या अनुभवाचा फायदा करून त्यांना योग्य जिव्हाळा जाणवू देणं हेच जास्त महत्त्वाचं. मुलांना आई - बाबांपेक्षा बर्‍याचदा आजी - आजोबांचा लळा असतो.

आई आज मला परत रविवारी शिफ्ट लागली गं, तू जरा प्लीज आज येशील का घरी बाळाला सांभाळायला?’ पुन्हा एकदा तोच प्रश्न. असे प्रश्न आजकाल घरोघरी ऐकायला येतात. सतत ऑफिसची कामं आणि कामानिमित्त होणारे प्रवास. यामध्ये मुलांना कुठे ठेवायचं? तर हक्काचे असतात ते आजी -आजोबा. आई -बाबानंतर प्रत्येक लहान मुलासाठी हक्काचं कोणतं ठिकाण असेल तर ते म्हणजे आजी -आजोबांचं घर. आई – बाबांपेक्षाही आजकाल मुलांना आजी -आजोबा जास्त प्रिय असतात असंच चित्र आहे. कारण त्यांच्याकडे मुलं लहानाची आजकाल मोठी होत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालचे आजी -आजोबा हे त्यामानानं तरूण असतात.

खरं तर नातवंडांना निखळ, शुद्ध प्रेम देणं हीच महत्त्वाची जबाबदारी आजी-आजोबांची झाली आहे. पालन-पोषण करण्यापेक्षा आपल्या अनुभवाचा फायदा करून त्यांना योग्य जिव्हाळा जाणवू देणं हेच जास्त महत्त्वाचं. मुलांना आई – बाबांपेक्षा बर्‍याचदा आजी -आजोबांचा लळा असतो. त्यात वावगं असं काहीच नाही. खरंतर शहरी भागामध्ये दिवसभर कामात बुडालेले आणि घरी आल्यावर बाळाच्या गरजा भागवताना मेटाकुटीला आलेले आई-बाबा हेच चित्र असतं. अशा वेळी त्यांना गरज असते ती थोड्याफार मदतीची. घरात आजी-आजोबा असतील तर, त्यांचं नातवांबरोबरचं नातं हे नैसर्गिकपणानंच फुलत जातं. तसं बघायला गेलं तर, आजी आजोबा हे मुलांना जास्त चांगलं समाजावून सांगतात. त्यामुळं त्यांच्यामधलं बाँडिंग हे अप्रतिम असतं.

- Advertisement -

आईवडिलांच्या शिस्तीच्या बडग्यापेक्षा आपल्यावर निखळ प्रेम करणारे आजीआजोबा नातवंडांना हवेहवेसे वाटायला लागतात. आपले लाड पुरवणारे आई-बाबा नसून आजी-आजोबाच आहेत असा या लहानग्या आणि अगदी मोठ्या झालेल्या मुलांचाही पक्का समज असतो. आपला हिरमुसलेला चेहरा आपल्या आजी-आजोबांना बघताच येणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना असते आणि त्यातून आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्यात एक बाँडिंग तयार होतं. नातवंडाला लागलेली वाईट सवय ही आई – वडिलांपेक्षाही आजी-आजोबांच्या प्रेमळ समजावणीने दूर होते. ही समजावणी ही आजी-आजोबांची खासियतच म्हणावी लागते. आजी – आजोबांचे लाड म्हणजे नातवंडांसाठी दुधावरची साय.

घरातल्या प्रत्येक गोष्टींवर अगदी बारीक नजर ठेवून प्रत्येकाच्या हालचाली नजरेत टिपणारे हे जणू सीसीटीव्ही कॅमेरे असतात. आई-वडिलांनी रागावून चार फटके दिलेल्या नातवंडांना आधार वाटतो तो आजी-आजोबांचा. धावत जाऊन त्यांच्या कुशीत शिरावं आणि आपण पूर्ण सुरक्षित असल्याचं आई-वडिलांना कळावं एवढी शक्ती या प्रेमामध्ये आहे. कारण आजी-आजोबांकडे असलेल्याला हात लावण्याची हिंमत कुणाचीच नाही. त्यामुळं हे नातं वेगळंच आहे. हे नातं ज्या नातवंडांकडे आहे, ते नक्कीच नशीबवान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -