घरट्रेंडिंगगुरु नानक जंयती; 'इक ओकांर' जगाला दिलेला महान विचार

गुरु नानक जंयती; ‘इक ओकांर’ जगाला दिलेला महान विचार

Subscribe

जाणून घ्या शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु 'गुरु नानक' यांच्याबद्दल...

शीख धर्माचे पहिले गुरु म्हणून गुरु नानक यांची आज ५४९ वी जयंती. १५ एप्रिल १४६९ मध्ये कार्तिकी पोर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. गुरु नानक हे शीख धर्माचे गुरु असले तरी हिंदू धर्मातही त्यांचे खुप महत्त्व आहे. त्यामुळेच हिंदू देखील हा दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा करतात. आजच्या दिवशी शीख धर्मीयांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गुरुनानक यांच्या पवित्र विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी केला जातो. दरवर्षी कार्तिकी पोर्णिमेच्यादिवशी प्रकाश पर्वच्या निमित्ताने गुरुनानक यांचा उपदेश जनमाणसांत पुन्हा रुजवला जातो.

गुरुनानक यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिला संदेश दिला होता, असे सांगितले जाते. १६ व्या वर्षी ते एक प्रबोधनकार म्हणून नावारुपाला आले होते. ईस्लाम, ख्रिश्चन, ज्यू आणि हिंदू धर्माविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. गुरु नानक यांनी दिलेली शिकवण गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहे.

- Advertisement -

गुरुनानक यांनी समाजातून जातीयवाद संपवून बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच गुरुनानक यांनी ‘इक ओंकार’चा नारा दिला होता. याचा अर्थ ईश्वर एकच आहे आणि तो प्रत्येक चराचरात सामावलेला आहे. आपल्या सर्वांचे मायबाप एकच असून आपण सर्वांशी प्रेमाने राहिले पाहीजे, अशी शिकवण गुरुनानक यांनी दिली होती. प्रत्येक व्यक्तिने मेहनत करुनच धन कमावले पाहीजे, कोणत्याही लोभाला बळी न पडता दुसऱ्या व्यक्तीचा हक्क मारु नका, असा संदेश त्यांनी दिला.

गुरुनानक म्हणतात की, व्यक्ती आपला संसार तेव्हाच सुखाचा करु शकतो जेव्हा तो आपल्या मनातील विकार, मत्सर, ईर्षा यावर विजय मिळवतो. कोणत्याही व्यक्तीने अंहकार बाळगू नये, कारण अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे नेहमीच विनम्रतापूर्वकच आचरण करावे, अशी शिकवण ते देतात. ..

- Advertisement -

गुरु नानक यांचे निधन २२ सप्टेंबर १५३९ मध्ये झाले. मात्र शीख धर्माचे पहिले गुरु आणि जगाला मानवतेचा संदेश देणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख कायमची झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -