घरफिचर्सहॅकर, ईव्हीएम आणि राजकारण

हॅकर, ईव्हीएम आणि राजकारण

Subscribe

भारतात कुठल्याही प्रकारचे हॅकिंग अगदी ‘सो कॉल्ड’ एथिकल हॅकिंगही कायदेशीर नाही, हे बहुधा तरुणांना माहीत नसावे. सायबर गुन्हेगार फक्त पैसे, डेटा चोरी करत नाहीत तर एखाद्या देशाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करत असतात. सध्याचा बहुचर्चित हॅकर सय्यद शुजा याने आपल्या अशाच एका गुन्ह्याची कबुली पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर दिलेली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार केवळ त्याने एखादा सायबर गुन्हा केला नाही तर त्याने भारताची लोकशाही किती असुरक्षित आहे हेही मांडले आहे.

भारतात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे यात शंकाच नाही. जितके प्रगत तंत्रज्ञान तितकेच अधिकाधिक सायबर गुन्हे होणार हे नक्की. गुन्हेगारांना सायबर गुन्हे करणे सोयीस्कर वाटतात, कारण यात प्रत्यक्षात कुठे जाऊन हे करायचे नसतात, आपल्याच घरी, ऑफिसमध्ये शांतपणे बसूनही सायबर गुन्हे करू शकतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तपास यंत्रणाही हल्ली सायबर गुन्हेगारापर्यंत पोहचत आहेत. परंतु असे असतानाही गुन्हेगारांना सबळ पुराव्याशिवाय शिक्षा होऊ शकत नाही हेही तितकेच खरे. हॅकिंग हा सायबर गुन्हा आहे. हा गुन्हा असला तरी तरुणांना, हुशार विद्यार्थांना त्याचे आकर्षण आहे. हे अज्ञानामुळेच त्यांना, हॅकर काय सॉलिड असतो ! ही कल्पना ते करतात.

- Advertisement -

भारतात कुठल्याही प्रकारचे हॅकिंग अगदी ‘सो कॉल्ड’ एथिकल हॅकिंगही कायदेशीर नाही, हे बहुधा तरुणांना माहीत नसावे. सायबर गुन्हेगार फक्त पैसे, डेटा चोरी करत नाहीत तर एखाद्या देशाच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करत असतात. सध्याचा बहुचर्चित हॅकर सय्यद शुजा याने आपल्या अशाच एका गुन्ह्याची कबुली पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर दिलेली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार केवळ त्याने एखादा सायबर गुन्हा केला नाही तर त्याने भारताची लोकशाही किती असुरक्षित आहे हेही मांडले आहे.

काळ बदलतो तसे आपल्या समोरची आव्हाने बदलत असतात. आज आपल्या ७०व्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला एक भारतीय नागरिक म्हणून कळले पाहिजे की वर्षानुवर्षे केवळ आपल्याला शेजारच्या राष्ट्राचे आव्हान नाही. आता देशांतर्गत आणि जगाच्या पातळीवरही अनेक आव्हाने आहेत. पुढे होणार्‍या लढाया या रणांगणावर नाही तर सायबर स्पेसमध्ये लढल्या जातील. अनेक देशांनी असे सायबर हल्ले करायला कधीच सुरुवात केली आहे. सय्यद शुजाचा कबुलीजबाब म्हणजे आपली लोकशाही कुणाच्या हाती आणि किती सुरक्षित आहे याचा विचार करायला लावणारा आहे.

- Advertisement -

हॅकर आणि राजकारण
राजकारण करायला हल्ली कुठलेही कारण पुरते. जनतेसाठी केलेलं एखादे विकासाचे काम असते, पण त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक स्तरावरचे राजकीय पक्ष आणि नेते भांडत असतात. परंतु हेच एखाद्याच्या चुकीने काही दुर्घटना घडली तर मात्र एकमेकांवर दोषारोप करून राजकारण करतात. असेच काहीसे पाहायला मिळाले ते सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदे नंतर. अमेरिकेत राजकीय आश्रय घेतलेला हॅकर भारतीय सैयद शुजा याने ईव्हीएम मशीन संबधित आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अनैसर्गिक मृत्यूशी निगडित काही खुलासे केले. आणि संपूर्ण भारतात एकच हाहा:कार झाला. सत्तेत असलेला राजकीय पक्ष विरोधी पक्षालाही एक राजकीय खेळी असल्याचे सांगत आहे, तर विरोधी पक्ष, निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे देशाच्या जनतेचा विश्वासघात केला असे सांगत आहे. अनेक वृत्तवहिन्यांनी सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेच्या मुख्य मुद्याला बाजूला ठेवून, कपिल सिब्बल तिथे काय करत होते ?, सय्यद शुजाला काँग्रेसने सुपारी कशावरून दिली नसेल? हॅकरने आत्ताच का पत्रकार परिषद घेतली?

ईव्हीएम हॅकिंग फक्त २०१४ ला झाले कशावरून ते नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतही झाले असेल ? असे एक ना अनेक मुद्दे उपस्थित केले. तसेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी रॉ या एजन्सीकडून चौकशी करण्याचीही मागणी केली. एकूण काय तर सय्यद शुजा याने उपस्थित केलेल्या मुद्याला केवळ एक राजकीय मुद्दा म्हणून पहिले गेले. काँग्रेसला येणारी लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर हवी आहे आणि त्यांनी वारंवार तशी मागणी आहे. खरं तर हा

ईव्हीएम मशीन संबंधित असलेला एक तांत्रिक मुद्दा आहे. त्या मुद्याकडे तांत्रिक मुद्दा म्हणून पाहायला आणि त्यावर चर्चा करायला हरकत नाही.

ईव्हीएम मशीन
भारतात ईव्हीएम मशीनचा वापर नोव्हेंबर १९९८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली यांच्या निवडणुकीत काही मतदारसंघांत प्रायोगिक तत्वावर केला गेला. कालांतराने संपूर्ण भारतात लहानमोठ्या प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर होत आहे. भारतात ईव्हीएमचा वापर सुरू करण्यामागे अनेक कारणे आहेत. भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि मतदान करणार्‍यांची संख्याही अधिकाधिक वाढत आहे. तसेच सतत भारतात कुठेना कुठे निवडणूक होत असते आणि मुख्य म्हणजे भारतातील सर्व निवडणुकांचे नियोजन हे निवडणूक आयोगाकडून होत असते. त्यामुळे मतदान अधिक सुलभतेने व्हावे यासाठी ईव्हीएम मशीनचा पर्याय निवडला असावा. या मशिन कुठल्याही ऑनलाईन नेटवर्कशी जोडलेल्या नसतात, किंबहुना या विजेवरही चालत नाहीत. अजूनही भारतात अनेक ठिकाणी वीज नाही त्यामुळे एकसमानता साधण्यासाठी बॅटरीवर चालणार्‍या ईव्हीएमचा उपयोग केला जातो.

नागरिकांनी ईव्हीएमचा वापर करावा यासाठी गावखेड्यात निवडणूक आयोग त्यांना प्रशिक्षणही देते. निरक्षरता अजूनही असल्यामुळे अनेक नागरिक फक्त पक्षाचे चिन्ह पाहून मत देतात. भारताच्या लोकशाहीत निवडणुकीला आणि नागरिकांच्या मताला खूप महत्त्व आहे, अशा वेळी ज्या ईव्हीएम मशीनद्वारे आपल्या भारताच्या नेत्यांची आणि पर्यायाने जनतेचे भवितव्य ठरले जाते त्यावर शंका घेणे म्हणजे आपली लोकशाही धोक्यात येण्यासारखे आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धती सदोष असू शकेल किंवा त्याची कार्यप्रणाली सुरक्षित नाही म्हणून अनेक केसेस केल्या आहेत. अनेक केसेमध्ये निकाल ईव्हीएमच्या बाजूनेच लागला आहे. निवडणूक आयोगाचे अजूनही असे मत आहे की त्यांची ईव्हीएम मशीन संपूर्णपणे सुरक्षित म्हणजेच tamperproof आहे. परंतु अनेक संगणक तज्ज्ञ, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, निवडणूक अभ्यासक, आणि निष्णात हॅकर यांच्या मते ईव्हीएम मशीन असुरक्षित आहेत. तसे पहिले तर आजच्या घडीला संगणकीय किंवा इलेक्ट्रॉनिक मशीन या फक्त तिथपर्यंतच सुरक्षित आहेत, जोपर्यंत कोणी त्याला हॅक करत नाहीत.

हॅकर आणि हॅकिंग
हॅकिंग हा भारतात सायबर गुन्हा आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, आपले काही खास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हॅकर अनधिकृतपणे संगणकात शिरकाव करून त्यामध्ये बदल करून त्याला निकामी किंवा आपल्याला हवे तसे करून घेतो. हॅकिंग करण्यार्‍याला हॅकर म्हणतात. गेल्या १० वर्षात हॅकर आणि हॅकिंग हे शब्द प्रत्येकाला माहितीचे झाले आहेत. हॅकिंग करतात म्हणजे हॅकर नक्की काय करत असावा? हॅकर सामान्यतः एखाद्या सिस्टीममध्ये अनधिकृतरित्या शिरून तिथला डेटाबेस चोरू शकतो ( without changing data, Only copying), त्यामध्ये हवी तशी माहिती भरु शकतो ( Addition of data), काही डेटा काढून टाकू शकतो (Substraction of data), त्यात काही बदल करू शकतो(Editing data), किंवा वरीलपैकी काहीही न करता फक्त शिरकाव करून संपूर्ण सिस्टिमवर लक्ष (silent viewer and listener) ठेवून योग्य संधीची वाट पाहू शकतो.अशा गोष्टी करण्यामागे हेतू अनेक असू शकतात, परंतु मुख्य हेतू हा पैसाच असतो. व्यावसायिक हॅकरचे क्लायंट असतात आणि त्यांच्यासाठी ते काम हे करतात.

सय्यद शुजाच्या मते हॅकर्सनी अशाच प्रकारे भाजपसाठी काम केले आहे. पुढे एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याने असेही जाहीर केले की तुम्ही कुणालाही निवडणुकीला उभे करा मी ईव्हीएम मशिनच्या जोरावर त्यांना जिंकून देऊ शकतो. प्रश्न असा आहे की हा जो कोणी हॅकर असा दावा करत आहे त्याने काय केले किंवा करू शकतो? किंवा तो किती चांगला आणि वाईट हॅकर आहे हा प्रश्न नाही. महत्त्वाचे हे आहे की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते ही शक्यता त्याने वर्तवली आहे आणि ती आपण नाकारू शकत नाही. न्यायवैधक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई याचे माजी वैज्ञानिक अधिकारी रवींद्र महाजन यांच्या मते ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. कारण हॅकिंग करण्यासाठी वायफाय, इंटरनेट नेटवर्क असेल किंवा मूळ सोर्सकोड चीपमध्ये बदल केला असेल तरच हॅकिंगची शक्यता आहे. परंतु शुजाने यापैकी काही केले की नाही याबाबत त्याने काहीच सांगितले नाही. त्यामुळे अजूनही माझे मत हेच आहे की, ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकत नाही. चोर चोरी दोन प्रकारे करू शकतो, एक तर तो घरफोडी करू शकतो त्यात तो पकडला जाण्याची शक्यता जास्त असते आणि दुसरे म्हणजे घरच्याच कोणी चोरी करणे ज्यात त्याची चोरी पकडली जाण्याची शक्यता खूप कमी असते.

सय्यद शुजाच्या बाबतीत तसेच आहे. तो ज्या कंपनीत काम करत होता तिथेच त्याने हे हॅकिंगचे काम केले आणि त्या कृत्याची तो स्वतःच कबुली देत आहे. हॅकर ब्लू सामुराय (बदलेले नाव) याच्या मते, शुजा हा एक कमचोर हॅकर आहे, त्याने जे सादरीकरण केले ते मान्य आहे, परंतु त्याने हे काम नक्की कसे केले त्याचे प्रेझेन्टेशन दिले नाही. आणि कुठलाही हॅकर हे करणार नाही, हॅकिंग करणे काही विनोद नाही, आणि जर त्याने तो जे म्हणतो ते ईव्हीएम हॅक केले असावे तर त्याने ते करून दाखवावे, आम्ही मान्य करू.

हॅकरच्या दृष्टीने एखादा हॅकर जेव्हा हॅकिंग करतो तेव्हा तो आपले स्कील वापरतो आणि मुख्य म्हणजे जग काही म्हणो, प्रत्येक हॅकरला त्याच्या स्कील आणि कामाचा अभिमान असतो. आता हॅकर कम्युनिटीमध्ये मात्र ‘शुजा फेल गेला’ असे मत आहे. परंतु तरीही त्याने ईव्हीएम हॅक केले हे कबूल केले आहे. पण त्यावर विचार न होता त्याच्या कृत्याचा तपास करण्याऐवजी तो मुद्दाच मुळात आपण मान्य करत नाही तर सत्य समोर येणार कसे ? तरी सकारात्मक विचार करून योग्य त्या यंत्रणा ईव्हीएम मशीन हॅकेबल आहे की नाही या शक्यतेवर नक्कीच काम करीत असेल असे गृहीत धरूया.

-पुनम सावंत
-सायबर गुन्हे, अभ्यासक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -