घरफिचर्सआरोग्यदायी मका...

आरोग्यदायी मका…

Subscribe

पावसाळ्यात सर्वत्रच मुबलक प्रमाणात मिळणारा मका, मक्याचे कणिस तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचं कणिस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मक्याला मीठ मसाला लावून गरमागरम कणिस खाण्याची मजा काही निराळीच असते.

 

पावसाळ्यात सर्वत्रच मुबलक प्रमाणात मिळणारा मका, मक्याचे कणिस तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचं कणिस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मक्याला मीठ मसाला लावून गरमागरम कणिस खाण्याची मजा काही निराळीच असते. पावसाळ्यात केवळ रस्त्यावर मका खाणं मर्यादीत नसून अनेकजण घरीदेखील मका खातात. अवेळी लागणार्‍या भूकेवर मका खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. मका हा अत्यंत पौष्टीक असून त्याचे अनेक आरोग्यदायी लाभ आहेत. जाणून घेऊया त्याविषयी.

- Advertisement -

हृदय रोगावर गुणकारी

मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटामिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

हाडे बळकट होतात

मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

- Advertisement -

शरीराला ऊर्जा मिळते

मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.

दृष्टी सुधारते

मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.

पोटाच्या समस्यांवर गुणकारी

अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

लक्षात ठेवा

मका हा आरोग्यासाठी नक्कीच खूप पौष्टिक आहे. पण तो खाताना, आरोग्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे, आयुर्वेदीक सल्ल्यानुसार, मका खाल्ल्यानंतर त्यावर काही वेळ पाणी पिऊ नये. मक्यामध्ये ’कॉम्प्लेक्स कार्ब्स’ आणि ’स्टार्च’ घटक अधिक प्रमाणात असतात. यावर जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा पचनाची क्रिया मंदावते. पोटात गॅस होतो. यासोबतच पोटफुगी, पित्त, पोटदुखीचा त्रास वाढतो. त्यामुळे मका खाताना या गोष्टी नक्की ध्यानात ठेवाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -