घरफिचर्स'या' आहेत देशातील काही ऐतिहासिक विहिरी

‘या’ आहेत देशातील काही ऐतिहासिक विहिरी

Subscribe

आपल्या देशात पाण्याचा साठा करण्यासाठी वर्षानुवर्ष विहिरींचा वापर होत आहे. प्राचिन काळापासून मुघल कालीन, पेशवे कालीन ते स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही विहिरी बांधण्यात आल्या आहेत. देशातील विविध प्रांतात या विहिरींना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मराठीत याला बारव, गुजरातीमध्ये वाव, उत्तर भारतात बावडी, कन्नडमध्ये कल्याणी, संस्कृतमध्ये वापी तर हिंदीत कुआँ म्हटलं जातं. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या काही विहिरींची माहिती जाणून घेऊया…

रेठरेकर गावंदर भागातील ४०० वर्षापुर्वीची ऐतिहासिक विहीर
  • साताऱ्यातील कृष्णानदीच्या काठी वसलेल्या रेठर्‍यात बाळकृष्ण विश्‍वनाथ रेठरेकर यांच्या गावंदर भागातील शेतात चारशे वर्षापुर्वीची ऐतिहासिक विहीर आहे. १९१४ साली देशात दुष्काळ पडला होता, त्यावेळी रेठर्‍याची विहीर, कर्नाटक विजापूर येथील ताजबागडे तळे व रायगड येथील गंगासागर पाणी साठा येथेच पाणी होते, अशी अख्यायिका आहे. जुन्या विटा व दगडाच्या साहाय्याने या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे
उत्तर प्रदेशातील मुगलकालिन ऐतिहासिक विहीर
  • उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात औराई येथील राष्ट्रीय राजमार्गावर शेकडो वर्ष जुनी मुगलकालिन ऐतिहासिक विहीर आजही अस्तित्वात आहे. ही विहीर मुगल सरदार शेरशाह सूरी यांनी बनवली होती. वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शेरशाह यांनी विहीर बनवली होती
हिमाचल प्रदेशातील हरिपुर गावातील विहीर
  • हिमाचल प्रदेशातील देहरा जिल्ह्यातील हिरपुर गावात १५०० वर्ष जुनी विहीर आहे. या विहिरीत ५ ते ७ खोल्या आहेत. हा भूयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. हरिपुर गावातील राजा हरिचंद्र यांच्या राजवटीत ही विहीर बांधण्यात आली आहे
राजस्थानमधील शेखावाटी, फतेहपुर विहीर
  • राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेल्या शेखावाटीतील फतेहपुर येथील ५०० वर्ष जुनी ऐतिहासिक विहीर असून याची निर्मिती नवाबाच्या कालखंडात करण्यात आली होती. ही विहीर बांधण्यासाठी १४७४ ते १४८९ इतका कालावधी लागला
गुजरातमधील ‘रानी की वाव’ ही विहीर
  • गुजरातच्या पाटण तालुक्यात असलेल्या ‘रानी की वाव’ ही विहीर जगप्रसिद्ध आहे. १०६३ साली सोलंकी राजवटीतील राजा भीमदेव (प्रथम) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती यांनी या विहिरीचे काम केले होते
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -