घरफिचर्स'असे' वाचवा प्रायव्हेट कॅबचे पैसे!

‘असे’ वाचवा प्रायव्हेट कॅबचे पैसे!

Subscribe

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे प्रायव्हेट कॅबने राईड करतेवेळी तुम्ही तुमचे पैसे काही प्रमाणात नक्कीच वाचवू शकता.

आजकाल लोक प्रायव्हेट कॅब्सने प्रवास करण्याला अधिक पसंती देतात. प्रायव्हेट कॅब्समध्ये मिळणारा आरामदायी प्रवास आणि मुख्य म्हणजे प्रिपेड सुविधा असल्यामुळे द्यावे लागणारे मोजकेच पैसे या २ मुख्य सुविधांमुळे लोक प्रायव्हेट कॅब वापरण्यास पसंती देतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर अशा प्रायव्हेट एसी कॅब्सना अधिक मागणी असते. मात्र, बरेचदा ‘प्रायव्हेट कॅब्जचा प्रवास अधिक स्वस्त झाला असता तर…’ असा विचार नोकरदार आणि मध्यमवर्गीय प्रवाशांचा मनात डोकावून जातो. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे प्रायव्हेट कॅबने राईड करतेवेळी तुम्ही तुमचे पैसे काही प्रमाणात नक्कीच वाचवू शकता.

१. आपापसांत तुलना करा

प्रायव्हेट कॅब बुक करण्याआधी एकापेक्षा अधिक कंपन्यांच्या उपलब्ध कॅब्सचे दर पर्याय तपासून पाहा. त्यापैकी जी कंपनी तुम्हाला तुलनेत कमी दर देत असेल, त्याच कंपनीची कॅब बुक करा. जेणेकरुन तुम्ही तुम्हाला परवडेल अशा दरात कॅब सर्व्हिसचा लाभ घेऊ शकाल.

- Advertisement -

२. ऑनलाईन पेमेंट उत्तम

बऱ्याचदा कॅब सर्व्हिस कंपन्या तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसाठी, कॅशबॅक किंवा डिस्काउंट सारख्या अनेकविध ऑफर्स देतात. तर काहीवेळेला ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेमध्ये बँकांकडूनही काही सवलतीच्या ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.

३. शेअरिंग जिंदाबाद

तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही कॅब शेअरिंगचा पर्याय स्विकारु शकता. यामध्ये तुम्ही आणि अन्य २ जण असे एकूण ३ प्रवासी कॅब शेअर करतात. त्यामुळे तुम्हाला सोलो राईडच्या तुलनेत कमी पैसै भरावे लागतात.

- Advertisement -

४. आसपासचा लँडमार्क निवडा

तु्म्हाला जिथे उतरायचंय त्याच्या जवळपासचा मुख्य रस्त्यावरील एखादा लँडमार्क निवडा. जिथे उतरुन तुम्ही अगदी सहज आणि कमी वेळात तुमच्या ठिकाणापर्यंत पोहचू शकता. याचा फायदा म्हणजे तुम्ही काही मीटरचं अंतर आणि पर्यायाने त्याचे पैसे वाचवू शकता.

५. ‘अॉटो’ पर्याय स्विकारा

काही खासगी कंपन्या कॅब्ससोबतच ‘ऑटो’ रिक्षा सर्व्हिसही पुरवतात. तुमचा एअर कंडिशनने जाण्याचा अट्टाहास नसेल तर, तुम्ही प्रिपेड रिक्षाचा पर्याय स्विकारु शकता. यामुळे कॅबच्या तुलनेत तुमचा प्रवास स्वस्तात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -