घरफिचर्सकरोनाच्या वाढत्या संसर्गामागे तबलीगी !

करोनाच्या वाढत्या संसर्गामागे तबलीगी !

Subscribe

थाळ्या बडवून, दिवे पेटवून ‘करोनाला गो’ करण्यासाठी एकीकडे देशवासीयांची सुरू असलेली धडपड तर दुसरीकडे हजारो लोकांची एकत्र गर्दी जमवून ‘सोशल डिस्टन्सिंगला फाट्यावर मारत दिल्लीत निजामुद्दिन येथे मरकजसाठी गेलेल्या तबलिगी जमातीच्या अक्कलशून्य लोकांमुळे देशात करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. जगभरात करोनाचा कहर सुरु असताना भारतात मात्र त्याला नियंत्रित ठेवण्यात यश येत असताना निजामुद्दीन येथील मरकजमुळे देशातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असल्याचे केंद्राच्या आरोग्य विभागानेदेखील मान्य केले आहे.

जनता कर्फ्यूच्या काळात कोणालाही न जुमानता दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात असलेल्या हजारोच्या संख्येने एकत्रित जमलेल्या तबलीगी जमातीच्या लोकांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मरकजसाठी येथे एकत्रित आलेल्या तबलीगींमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर विदेशातील सुमारे 300 तबलीगी जमातीचे लोक धर्माचा प्रसार करण्यासाठी उपस्थित होते. जगभरात करोनाचा प्रसार होत आहे, आपला देशदेखील करोनाशी सामना करीत आहे, हे माहीत असताना तबलीगी जमातीचे लोक निजामुद्दीन येथे एकत्र जमले होते. धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या जमातीचे हजारो लोक आपआपल्या देशाकडे, विविध राज्यात रवाना झालेले असून दोन हजार तबलीगी अजूनही मकरजमध्ये एकत्रित राहत होते, दिल्ली शासनाने त्यांना क्वॉरंटाईन केले आहे.

दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तबलीगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आदेशाचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झालं. या दरम्यान मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या सुमारे 200 जणांवर गुन्हे दाखल कऱण्यात आलेले असून एकटी मुंबईत 150 जणांवर गुन्हे दाखल कऱण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून देखील शेकडो तबलीगी येथे गेले होते त्यातील अनेकांना ताब्यात घेऊन क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. त्यातील काहींना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. मरकज येथून आलेले तबलीगी मुंबई तसेच राज्याच्या अनेक जिल्ह्यातील मसिदीमध्ये आसरा घेत होते, तर मुंबईतील मुस्लीमबहुल झोपडपट्यांमध्ये वास्तव्यास आलेले होते. त्यातील अनेकांना ताब्यात घेऊन त्याना क्वॉरंटाईन करण्यात आलेलं असून त्यापैकी काही तबलीगींना करोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आलेले आहे. मुंबईतील धारावी, बेहरामपाडा, कुर्ला पाईप रोड, नागपाडा, मदनपुरा या विभागातून गेल्या आठवड्याभरात करोना बाधित मोठ्या प्रमाणात मिळून आलेले असून येथून आलेल्या तबलीगींमुळे या परिसरात करोनाचा फैलाव झाला असल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील करोनाची संख्या वाढण्यामागे मर्कज येथून परतलेल्या तबलीगी जमातीचे लोकच जबाबदार असल्याचे राज्य प्रशासनातील काही अधिकार्‍यांमध्ये चर्चा असली तरी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

एवढे होऊनदेखील अद्याप समोर न येणार्‍या तबालिगांचा शोध घेण्याचे आव्हान राज्य सरकारवर आलेले असून मरकज येथून आलेल्या तबलिगीना स्वतःहून समोर येऊन सहकार्य करण्याचे आव्हान राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे. मात्र, अजूनही अनेक जण समोर आलेले नाही. अखेर या तबलीगींना शोधून काढण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक पद्धत अवलंबली आहे. मरकज येथून राज्यात परत आलेल्या तबलीगी जमातीच्या लोकांचा नाव व पत्ते फोन नंबर दिल्ली शासनाकडून मागवण्यात आलेले आहेत. या पत्त्यावर काही जण सापडले आहेत. लपून बसलेल्या तबलीगींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांची मदत घेतली आहे, त्यांचे सीडीआर आणि त्याचे टॉवर लोकेशन मागवण्यात आलेले आहेत. 1885 जणांपैकी मुंबई तसेच आसपासच्या जिल्ह्यात 1826 जणांचा ठावठिकाणा राज्य शासनाला मिळून आलेला असल्याचा दावा राज्याच्या गृहमंत्रालयाने केला आहे, असे एका इंग्रजी दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटलेले आहे. तसेच 59 जणांचा शोध अद्यापही लागलेला नसून त्यांनी आपले मोबाईल फोन बंद केल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास अडचणी येत असल्याचे या दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. मुंबई तसेच इतर जिल्ह्यातून सुमारे 2000 तबलीगी मरकज येथे गेल्याचा अधिकृत आकडा राज्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून समोर येत असून त्यापैकी 23 जण कोरोना बाधित असल्याचे समजते राज्यभरात 1350 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. राज्य शासनाकडून आव्हान करून देखील समोर न येणार्‍या 59 तबलीगींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर तबलीगी जमातीतील लोकांना करोनाची बाधा झाली नसती तर देशात करोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तबलीगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 274 जिल्हे करोना विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. मरकज प्रकरण नसतं झालं तर भारताचा करोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितलं.

गृह मंत्रालयाने तबलीगी जमातीच्या लोकांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयातील संयुक्त सचिव श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘आम्ही 25000 पेक्षा जास्त तबलीगी जमातीच्या लोकांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन केलं आहे. हरियाणाच्या ज्या 5 गावांमध्ये ते गेले होते. ते सील करण्यात आलं आहे.

तबलीगी म्हणजे अल्लाहच्या शब्दांची घोषणा करणारा. त्याच वेळी, जमात अर्थ एक गट असतो. म्हणजे अल्लाहच्या शब्दांना प्रोत्साहन देणारा एक गट. मरकज म्हणजे संमेलनासाठी वापरण्यात येणारी जागा. वास्तविक, तबलीगी जमातशी संबंधित लोक पारंपरिक इस्लामवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा प्रसार करतात. एका दाव्यानुसार जगभरात या जमातीचे 15 कोटी सदस्य आहेत. असे म्हणतात की ही चळवळ 1927 मध्ये भारतात मुहम्मद इलियास अल-कांधलवी यांनी सुरू केली होती. याची सुरुवात हरियाणाच्या नूह जिल्ह्यापासून झाली.

या जमातची मुख्य उद्दिष्टे ‘सिक्स उसूल’ (कालीमा, सलात, इल्म, इक्राम-ए-मुस्लीम, इख्लास-ए-नियत, दावत-ओ-तबलीग) आहेत. त्यांची आशियामध्ये मोठी लोकसंख्या आहे. जमातचे मुख्यालय निजामुद्दीन येथे आहे. 1927 मध्ये सुरू झालेल्या या संस्थेला पहिली मोठी सभा होण्यास सुमारे 1 वर्षे लागली. मग अविभाजित भारतातील या संस्थेचे कामकाज संपूर्ण देशात पूर्णपणे गोठवले गेले आणि 1941 मध्ये जमातची पहिली बैठक 25,000 लोकांसह झाली. हळूहळू ही चळवळ जगभर पसरली आणि दरवर्षी हा कार्यक्रम जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केला जातो.

संतोष वाघ (लेखक आपलं महानगरचे प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -