घरफिचर्सचांद्र मोहिमेचा पहिला प्रयोग

चांद्र मोहिमेचा पहिला प्रयोग

Subscribe

यावर्षीच्या भारताच्या चांद्रयान-२ या चंद्र मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारताची ही दुसरी चंद्र मोहीम होती. यापूर्वी २००८ रोजी भारताने चांद्रयान-१ या मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून २२ ऑक्टोबर २००८ रोजी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.- सी ११) या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९ या दिवशी या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारताच्या चांद्रयान-१ या मोहिमेविषयी माहिती घेऊया.

यावर्षीच्या भारताच्या चांद्रयान-२ या चंद्र मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारताची ही दुसरी चंद्र मोहीम होती. यापूर्वी २००८ रोजी भारताने चांद्रयान-१ या मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून २२ ऑक्टोबर २००८ रोजी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.- सी ११) या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९ या दिवशी या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारताच्या चांद्रयान-१ या मोहिमेविषयी माहिती घेऊया. ‘चांद्रयान-१’ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान होते. ‘चांद्रयान-१’ हे मानवरहित अंतरीक्षयान होते, त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग होते. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी ११) या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचे प्रक्षेपण २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर 200८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. २००८मध्ये यूपीए-१ सरकारच्या काळात ‘चांद्रयान-१’ मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या मोहिमेद्वारे भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे दोन व बल्गेरियाचा एक उपग्रह अवकाशात यशस्वी सोडण्यात आले होते, पण या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचे उद्दिष्ट नव्हते. त्यावेळी १.४ टन वजनाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत १०० किमी अंतरावर सोडण्यात आला होता. एक वर्षाने मात्र ही मोहीम काही तांत्रिक कारणाने सोडून देण्यात आली होती. पी.एस.एल.व्ही. प्रक्षेपकाने चांद्रयानाला २२ ऑक्टोबरला त्याच्या पृथ्वीभोवतीच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत नेऊन सोडले. या कक्षेला इलिप्टिकल ट्रांस्फर ऑर्बिट (इ.टी.ओ.) असे म्हणतात. या कक्षेचा उपनाभी बिंदू (Perigee) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास २५० कि.मी. तर अपनाभी बिंदू (Apogee) जवळपास २२ हजार कि.मी. इतका आहे. यानंतर पाच टप्प्यांमध्ये चांद्रयानाची कक्षा वाढविण्यात आली व त्याला चंद्राभोवतीच्या कक्षेत ठेवण्यात आले. चांद्रयानास चंद्राच्या कक्षेत टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टप्पा (लुनार ऑर्बिट इन्सर्शन) ८ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. या योगे चांद्रयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून पूर्णपणे सुटले व त्याने चंद्राभोवतीच्या त्याच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा करणे चालू केले. चांद्रयानास चंद्राच्या कक्षेत टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टप्पा (लुनार ऑर्बिट इन्सर्शन) ८ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. या योगे चांद्रयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून पूर्णपणे सुटले व त्याने चंद्राभोवतीच्या त्याच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा करणे चालू केले. या कक्षेचा उपनाभी बिंदू चंद्रापासून ५०० कि.मी. अंतरावर होता, तर अपनाभी बिंदू ७५०० कि.मी. होता व परिभ्रमण काळ जवळपास ११ तासांचा होता. या टप्प्यात चांद्रयान चंद्रापासून जवळपास ५०० कि.मी. वर असताना यानावरील इंजिन चालवून यानाची गती मंदावण्यात आली, ज्यामुळे चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकू शकले. यानावरील इंजिन जवळपास ८१७ सेकंदासाठी चालविण्यात आले होते. या यशस्वी टप्प्यानंतर भारत जगातील पाचवा देश बनला, ज्यांनी चंद्राच्या कक्षेत यान टाकले. याआधी केवळ अमेरिका, पूर्वीचा सोवियत संघ, चीन व जपान या देशांनी व युरोपियन स्पेस एजंसीने आपल्या यानांना यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत सोडले. मून इंपॅक्ट प्रोब (एम.आय.पी.) १४ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅकलटन क्रेटरजवळ आदळला. एम.आय.पी. हा यानावरील एकूण आकरा भारांपैकी एक होता. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतीकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. एम.आय.पी. चंद्रयानापासून रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यशस्वीरीत्या वेगळा झाला. या जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासात एम.आय.पी.ने चंद्राची अनेक छायाचित्रे काढून यानाला पाठविली, जी यानाने नंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला पाठविली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -