घरफिचर्सउद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

Subscribe

शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म २८ मे १९०३ रोजी किर्लोस्करवाडी येथे झाला. १९२५-२६ दरम्यान एक महाराष्ट्रीय तरुण मॅसेच्युसेट्स येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याला परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध असतात; मात्र परदेशी जीवनाचे प्रलोभन समोर असतानाही तो तरुण आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्रातल्या गावात येतो आणि वडिलांच्या छोट्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात करतो. तो तरुण म्हणजे शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि ते गाव म्हणजे किर्लोस्करवाडी.

हेच शंतनुराव पारतंत्र्यामुळे शतकभर मागे असलेला देश, कर्मापेक्षाही नशिबावर अधिक विश्वास असलेल्या लोकांचा तत्कालीन महाराष्ट्र-या परिस्थितीत प्रामुख्याने महाराष्ट्रात उद्योजकतेचं रोपटं स्वत:च्या कष्टाने लावणारे महापुरुष बनले. शेती व नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही त्या काळात धाडसाचे होते. अशा वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामास सुरुवात केली.

- Advertisement -

शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे; साखर निर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑइल इंजिन्स; इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत-अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या-त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले. त्या काळात मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला (नाट्य, संगीत, चित्रपट) या क्षेत्रांत प्रगती साधली होती; मात्र मूळ मराठी माणसाने, महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमावले आहे असे उदाहरण अस्तित्वात नव्हते. पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली. केवळ भरून काढली असे नव्हे, तर त्यांनी उद्योग-विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले.

१९४६ मध्ये शंतनुरावांनी किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड या कंपन्यांची अनुक्रमे बेंगळुरू व पुणे येथे स्थापना केली. पुढील काळात त्यांनी किर्लोस्कर न्यूमॅटिक्स; किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर ट्रॅक्टर्स, किर्लोस्कर सिस्टिम्स याही उद्योगांची स्थापना केली, विस्तार केला. जगात जिथे जिथे शेती चालते, त्या प्रत्येक खंडात, असंख्य देशांत, किर्लोस्करांचे पंप, ऑइल इंजिन्स, शेती संयंत्रे आजही वापरली जातात.

- Advertisement -

आज किर्लोस्कर समूहात २५ पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. हँबुर्ग (प. जर्मनी), मनिला (फिलिपाइन्स), मलेशिया, मॉरिशस आदी देशांमध्येही किर्लोस्कर समूहाचा विस्तार झालेला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात परदेशांत कारखाने स्थापन करण्याचे अनोखे धाडस शंतनुरावांनी केले होते. आजच्या ‘मर्जर’, ‘अ‍ॅक्विझिशनच्या’ जमान्यातल्या लोकांनाही या धाडसाबद्दल आश्चर्य वाटते.

पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते. शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी ‘उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार’ केला. अशा या महान उद्योगमहर्षीचे २४ एप्रिल १९९४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -