घरफिचर्सपार्श्वगायक एस.पी. सुब्रमण्यम

पार्श्वगायक एस.पी. सुब्रमण्यम

Subscribe

एस.पी. बालसुब्रमण्यम हे तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते. २५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड १९ पासून त्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले. एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी मद्रास इलाख्यातील (तत्कालीन) (सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. त्यांचे पिता हरिकथा निरुपणकार होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला होता. शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतला. एका स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. अनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला तथापि विषमज्वर झाल्याने प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स या संस्थेचे (एएमआयआई) सभासदत्व त्यांनी घेतले.

गंगाई अमरन, इलयाराजा, अनिरुद्ध, भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलगू होती आणि एस. पी. कोदंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना तेलगू चित्रपटासाठी गायनाची प्रथम संधी दिली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत.

- Advertisement -

संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने ४०,००० गीते गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदविला गेला आहे. उपेंद्रकुमार या कानडी संगीतकारासाठी १९८१ साली त्यांनी बारा तासात २१ गाण्यांचे ध्वनिमुद्रण केलेले आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणार्‍या पद्मश्री (२००१) आणि पद्मभूषण (२०११) या सर्वोच्च बहुमानाचे एस.पी. बालसुब्रमण्यम मानकरी होते. २०१२ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल राज्य एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये त्यांना त्या वर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व म्हणून रौप्य मयूर पदक देऊन गौरविण्यात आले.

कन्नड, तेलगू, तामिळ आणि हिंदी या चार वेगवेगळ्या भाषांमधील कामांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. आंध्र प्रदेश राज्य तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कार्यासाठी नंदी पुरस्कार आणि कर्नाटक आणि तामिळनाडूमधील इतर अनेक पुरस्कार त्यांना दिले गेले होते. या व्यतिरिक्त, त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स दक्षिणमध्ये जिंकले होते. अशा या महान पार्श्वगायकाचे २५ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -