घरफिचर्सजागतिक स्तरावरील प्रश्न गंभीर ; पण भारत खंबीर!

जागतिक स्तरावरील प्रश्न गंभीर ; पण भारत खंबीर!

Subscribe

२०२१ हे वर्ष भारतासाठी खूप आव्हानात्मक ठरले आहे. भारताने अनेक प्रकारच्या संकटावर मात केली आहे. यंदाच्या वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये भारताने इतर देशांसह नेहमीप्रमाणे सहभाग घेतलेला आहे. भारताला सर्वात जास्त चिंता सतावली ती म्हणजे अफगाणिस्तानची. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच होत्या. परंतु या दोन्ही देशांना भारताने करारा जवाब दिला आहे. दुसरीकडे भारताने कुरापती करणाऱ्या देशांना शांत बसवण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटनसारख्या इतर देशांसोबत मैत्रिपूर्ण संबंध ठेवत अनेक करार देखील केले आहेत. यंदाच्या वर्षात भारताने कोणत्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत त्याचा हा आढावा…

तालिबानकडून काबूलवर कब्जा

तालिबानने अफगाणिस्तानातील काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अनेकदा देशात बॉम्बस्फोट झाल्याच्या घटना घडल्या. परंतु पुन्हा एकदा एका मोठ्या बॉम्बस्फोठाने हादरलं ते म्हणजे अफगाणिस्तान. तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यामुळे आणि काबुलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर या हल्ल्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांचा मृत्यू झाला. ३ ऑक्टोबर रोजी काबुलमधील एका मिशीदीबाहेर जीवघेणा बॉम्बस्फोट हल्ला झाला. ज्यामध्ये ५ नागरिकांचा मृ्त्यू झाला होता. ऑगस्ट महिन्यात काबुल ताब्यात घेतल्यानंतर आयएसकडून तालिबानवर अनेक हल्ले करण्यात आले. विमानतळावर सर्वात मोठा स्फोट तालिबानने घडवून आणला होता. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात मिळवल्यानंतर आयएसकडून होणारे हल्ले वाढले. यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने काबुल विमानतळाबाहेर मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामध्ये १६९ हून अधिक अफगाणी आणि १३ अमेरिकन सैन्य मारले गेले होते.

- Advertisement -

अमेरिकेला हरवले, अफगाणिस्तान जिंकले

अफगाणिस्तानच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा २० वर्षानंतर विजय मिळवला. राष्ट्रपती अशरफ गनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देश सोडून जावे लागले. अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबानने डोके वर काढण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागातील भूभागावर ताबा मिळवत तालिबानने मागील काही दिवसांत मोठ्या शहरांवर ताबा मिळवला आणि काबूलवर आपला झेंडा फडकवला.
एकमेकांचे चांगले मित्र समजले जाणारे पाकिस्तान आणि तालिबान आता सीमावादावरून ऐकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाकिस्तान सुरूवातीपासून अफगाणिस्तानमधील तालिबानला पाठिंबा देत होता. परंतु तालिबानने पलटी मारत आता पाकिस्तानसमोर उभा ठाकला आहे. तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानच्या सैन्याला दोन्ही देशांच्या सीमेवर सुरक्षा कुंपण बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली. अफगाण अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर जगभरातील इस्लामी देश अफगाणिस्तानातील नागरिकांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर दोन्ही देशांतील सीमेवरील वाद चव्हाट्यावर आला. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सरकारच्या विरोधाला न जुमानता २६०० किमीपर्यंत सीमेवर कुंपण घातलं आहे.

भारत-चीन सीमावाद

भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-चीन यांच्यातील संघर्ष कमी होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच भारतात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. या बैठकीत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. या बैठकीत पाकिस्तान आणि चीनने सहभाग घेतला नव्हता. भारत आणि इतर देशांपेक्षा या दोन्ही देशांना तालिबान खूप फायद्याचा वाटतो. त्यामुळे तालिबानच्या माध्यमातून भारतात अस्थिरता पसरवण्याचं काम हे देश करत आहेत. काश्मीर घाटात त्याचे परिणाम पहायला मिळत आहेत. चीनच्या कुरापती वाढल्यामुळे चीन हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण लडाख आणि अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर भारताविरोधात रणनिती आखण्याचा ड्रॅगनचा डाव आहे. त्याचसोबतच पाकिस्तान आणि तालिबान या देशाला चीन उघडपणे मदत करत आहे. त्यामुळे काश्मीर, लडाख आणि अरूणाचल प्रदेश या तिन्ही ठिकाणी भारताला एकाचवेळी लढाईसाठी रणशिंग फुंकावे लागणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेचा दौरा केला. मोदींचा हा तीन दिवसांचा दौरा होता. तसेच पंतप्रधानांचा हा दौरा भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव, अफगाणिस्तानातील घडामोडी आणि अमेरिकेसोबतचे व्यावसायिक संबंध, यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा होता.

अमेरिका दौऱ्याचं महत्त्व काय?

प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, कोरोना महामारी, दहशतवादाची सामना करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वांच्या मुद्द्यांसह जागतिक स्तरांवरील आव्हानांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा होता. अमेरिका दौरा केल्यामुळे अमेरिका-भारत, जपान-भारत यांच्यासह जागतिक धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत होईल आणि सहयोगाला चालना देऊन व्यावसायिक संबंध सुधारतील असा पीएम मोदींना विश्वास आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद हे भारताकडे देण्यात आलं होतं. एक ऑगस्टपासून एक महिन्यासाठी हे पद भारताकडे देण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे पीएम मोदी भारताचे पहिले पंतप्रधान ठरले.संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत अस्थायी सदस्य आहे. १ जानेवारी २०२१ पासून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू झाला आहे. अशातच एक महिन्याकरिता भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपदही आलं. भारत सुरक्षा परिषदेच्या आपल्या दोन वर्षांच्या अस्थायी सदस्याच्या कार्यकाळात पुढील वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये पुन्हा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवेल.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून ते थेट भारतामध्ये ओमिक्रॉनच्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. जगभरातील १०८ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. तर आतापर्यंत एकूण २६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. ब्रिटेन, डेन्मार्क, कॅनडा, नॉर्वे, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. जागतिक स्तरावर रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ओमिक्रॉन धोकादायक ठरत आहे. तसेच डेल्टापेक्षाही ओमिक्रॉन व्हेरियंटचा वेग दुप्पट आहे. त्यामुळे भारतात लसीकरणाची मोहीम मोठ्या संख्येने राबवली जात आहे. २०२१ या वर्षाच्या सुरूवातीला भारताने अनेक मोठे निर्णय आणि आव्हाने स्वीकारली आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण जगभरातील देशांना पाठींबा देण्यासाठी आणि मैत्रितही भारत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. तसेच आगामी वर्षातील २०२२ मध्ये भारत नवनवीन धोरणांसह महत्त्वाचे निर्णय घेईल आणि भविष्यात समोर येणाऱ्या संकटांवर मात करेल हीच आशा..!

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -