Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स भारतीय उद्योगाचे जनक

भारतीय उद्योगाचे जनक

Related Story

- Advertisement -

जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठी मिश्र कंपनी टाटा ग्रुपची स्थापना केली होती. त्यांचा जन्म गुजरातच्या नवसारी नामक छोट्या कस्ब्यामध्ये पारसी पादरीच्या परिवारात झाला होता. आणि नंतर त्यांनीच टाटा ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली. टाटांना भारतात भारतीय उद्योगाचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म 3 मार्च 1839 झाला. जमशेदजी टाटा नुसीरवानजी टाटा यांचे पुत्र होते. नुसीरवानजी यांनी आपल्या मुलाची उद्योगातील आवड बघून ते आपल्या परिवारासोबत उद्योग करण्यासाठी मुंबईला आला. मुंबईमध्ये त्यांनी एक छोटया व्यापारापासून सुरवात केली, परंतु कधी त्यांनी छोटा व्यापार करताना पराभव स्वीकारला नाही. जमशेदजी टाटानी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधूनआपले ग्रॅजुएशन पूर्ण केले. कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून प्रिन्सिपॉलने डिग्री समाप्त होईपर्यंत जमशेदजीची पूर्ण फी परत करण्याचा निर्णय घेतला.

बालविवाहाची प्रथा असल्यामुळे जमशेदजींचा 16 वर्षाच्या वयात 10 वर्षाची हीराबाई दबू हिच्यासोबर विवाह लावण्यात आला. 1858 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यावर आपल्या वडिलांच्या व्यापारी संस्थेमध्ये सहभागी झाले. 1857 चा ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. तर टाटानी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेवून जाण्याचा निश्चय केला. त्यांचा मुलगा दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांनासुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटांची बहीण जेराबाईने मुंबईच्याच एका व्यापार्‍यासोबत विवाह केला आणि शापुरजी सक्लटवाला यांची आई झाल्या. शापुरजींनी बिहार आणि ओड़ीसामध्ये टाटा ग्रुपचे कोळसा आणि लोखंड व्यापार सांभाळला. नंतर शापुरजी टाटाचे मेनचेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे साम्यवादी सदस्य निवडले गेले.

- Advertisement -

14 वर्षांच्या वयात जमशेदजी टाटांनी आपला व्यवसाय सुरू केला होता, परंतु ते आपले पूर्ण योगदान 1858 मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच देऊ शकले. 1858 पासून ते आपल्या वडिलांच्या प्रत्येक कामात सहभागी होत असत, त्यांनी त्यावेळी आपल्या व्यवसायाला शिखरावर घेवून जाण्याचा निश्चय केला. 1857 च्या उठावाचा मुख्य उद्देश भारतामध्ये ब्रिटिश राज्यास समाप्त करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच होता. तरीसुद्धा 1859 मध्ये नुसीरवानजीनी आपल्या मुलास हाँगकाँगच्या यात्रेवर पाठविले. जेणेकरून आपल्या मुलाची उद्योग क्षेत्रात आवड वाढेल. त्यांच्या वडिलांच्या इच्छेस जमशेदजीनी चांगल्या प्रकारे पूर्ण केले. आणि पुढच्या चार वर्षापर्यंत जमशेदजी हाँगकाँगमध्येच राहिले.

ते आपल्या वडिलांची इच्छा तिथे टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय सुरु करण्याचा विचार करू लागले. हाँगकाँगमध्ये टाटा कंपनीच्या ऑफिसची स्थापना करण्यात आली. 1863 पासून टाटा कार्यालय हाँगकाँगसोबत जपान आणि चीनमध्येही सुरू करण्यात आले. जमशेदजी टाटांच्या कॉटन मीलचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त लोकांना चांगली गुणवत्ता देवून त्यांना समाधानी करणे हाच होता. त्यांच्या मिल्सना आधी धर्मसि कॉटन मील आणि नंतर स्वदेशी कॉटन मिल म्हटले जात असे, ज्याचा लोकांच्या बुद्धीवर खूप प्रभाव पडला.आणि लोक फक्त भारतीय वस्तूंचाच उपयोग करू लागले. आणि ब्रिटिश वस्तूंचा त्याग करू लागले. जमशेटजींचा मृत्यू जर्मनीत १९ मे १९०४ रोजी झाला.

- Advertisement -