घरफिचर्सआदित्य

आदित्य

Subscribe

गावाकडे लग्नं असली की घरच्या सुनांना सारखे काम लागलेलेच असते. त्यामुळे आपण काम करत असताना आपला लेक ह्या लग्नात नक्की काय पराक्रम करणार ह्याने तिच्या बिचारीच्या जिवाला आधीच घोर लागला होता. त्यांची मुलगी शांत आहे. ती अशी पराक्रमी नाही.पण मुलगा मात्र...लग्नकार्यात त्याला घेऊन जायचं म्हणजे त्याच्या आईच्या अंगावर भितीने काटाच उभा राहतो.

माझा एक मित्र भारी खोडकर.लहानपणी तर डेंजरच असेल! माझ्यासमोर मिश्कील वगैरे वागे. मी नसताना हा कसा वागत असेल? मी त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीतच भेटे. मस्तीखोर मुलांची ते मोठे-मोठे होतात तशी मस्तीही बदलू लागते.हा माझ्यासमोर सुतासारखा सरळ वागतो ह्याच्या मित्रांसोबत,घरी हा कसा असेल..असे प्रश्न मला पडत.पण काल त्याच्या बायकोचा फोन आला आणि बरीचशी उत्तरं मिळाली.तिने तिच्या मुलाचे जे प्रताप मला सांगितले त्यावरून त्या मुलाचा बाबा लहानपणी कसा होता ह्याचा साधारण अंदाज आला.जणू मला माझ्या मित्राचेच बालपण नव्याने अनुभवायला मिळाले.
तर मित्र, त्याची बायको आणि मुलगा-मुलगी एका लग्नासाठी शेवगावला गेले होते.मुलगा आदित्य चार वर्षांचा.लग्न ज्या भागात होतं तिथं पाण्याचं दुर्भिक्ष्य! त्यामुळे लग्नघरी पाण्याचे मोठेमोठे जार आणलेले होते.पल्लवी..

मित्राची बायको लग्नघरी कामांमधे व्यस्त होती. गावाकडे लग्नं असली की घरच्या सुनांना सारखे काम लागलेलेच असते. त्यामुळे आपण काम करत असताना आपला लेक ह्या लग्नात नक्की काय पराक्रम करणार ह्याने तिच्या बिचारीच्या जिवाला आधीच घोर लागला होता. त्यांची मुलगी शांत आहे. ती अशी पराक्रमी नाही. पण मुलगा मात्र…लग्नकार्यात त्याला घेऊन जायचं म्हणजे त्याच्या आईच्या अंगावर भितीने काटाच उभा राहतो. त्याचं वय किती?४ वर्षं.तर सकलजन आपापल्या कामात गर्क आहेत हे कळल्यावर त्याने सर्वप्रथम तिथल्या नुकत्याच जन्मलेल्या एक दिवसाच्या वासराकडे आपला मोर्चा वळवला.ते वासरूबाळ खाली जमिनीवर झोपलेलं होतं.बाळराजे तिथे गेले.लहान मुलांना कसली म्हणून भीती नसते.उत्सुकता ओसंडून वहात असते.परिणामांची फिकीर नसते.ते डेअर डेव्हील असतात.

- Advertisement -

वासरू शांतपणे झोपलेलं आहे हे पाहून आधी ह्या बाळराजांनी त्याच्या पोटावर डोकं ठेवलं आणि तरी वासरू काहीच करत नाही हे पाहून त्याच्या अंगावर पूर्णपणे झोपण्याचे प्रयत्न केले.मग काही लोकं धावत आली आणि बाळराजांच्या ह्या आनंदपरिक्रमेत त्यांनी अडथळे आणले. मजायचं नाही हं बाळा तिथे..त्याची आई आहे नं ती भलीमोठी हम्मा ती चिडत असती बरं का असं केल्यावर….ती लाथ मारील…शिंग मारील…बै बै नको हं सोन्या..लांब खेळ हं..हे घे फूल खेळ हं!’काही समजूतदार महाबोअरिंग लोकं उगाच आपल्या मागे लागली आहेत ह्याने ते बाळ काही वेळ फुगून बसले होते.रूसून बसले होते.

मोठी माणसं निरूद्योगी असतात हे त्याला बहुदा फार लौकर कळले असावे. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून त्यानं परत आपला मोर्चा वासराकडे वळवला. ते पाहून त्याची आठ-नऊ वर्षांची बहीण तिथं आली.तिने आपल्या लहान भावाला त्यानं चालवलेल्या संशोधनापासून परावृत्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. ‘आई बाबांना हे कुटाणे सांगण्यात येतील’,अशी शेवटची वॉर्निंगही तिने भावाला दिली.त्यावर बाळराजे खवळले आणि त्याने तावातावाने वासरापासून लांब होत बहिणीच्या नव्याकोर्‍या शरार्‍यावर ती हातात मावेल इतकी माती टाकली.शिवाय तिच्या पोटात गुद्दे मारून तिला बुकलून काढले आणि ‘ये तो बस झाकी है आगे पिक्चर बहोत बाकी है’;ह्याची तिथेच प्रचिती आणून दिली.ह्या प्रकाराने भेदरून गेलेली ती छोटी तिथून पळून गेली; पण तिथल्याच एका झाडामागे लपून बसली.सारा आखों देखा हाल आईला सांगायचा होता मग..तिचा शरारा मात्र मातीने पार भरून गेला होता!
(पूर्वार्ध)

- Advertisement -

– रेणुका खोत
(लेखिका ब्लॉगर आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -