Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स किसिंग स्ट्रीट

किसिंग स्ट्रीट

‘किसिंग स्ट्रिट’ला येणारे किस करण्यासाठी इथे एका रांगेत उभे राहतात, येणार्‍या जोडीदाराची वाट पाहातात आणि येईल त्याला किस करतात. रांगेत ज्याला किस करावा लागेल तो आपला कायमचा जोडीदार म्हणून पुढे त्याच्याशी संसारही करतात. ‘एल कॅलेजन डेल बेसो ’ असे या गल्लीचे नाव आहे. पण गेल्या अनेकवर्षांपासून या गल्लीला ‘किसिंग स्ट्रीट’च्या नावानेच ओळखले जाते.

Related Story

- Advertisement -

आश्चर्य वाटेल, पण एक जागा अशी आहे, तिथे केवळ किस करण्यासाठी जोडपी येतात. वर्षभर इथे येणार्‍यांची तादात कमी नाही. पण व्हॅलेन्टाईन डे हा दिवस तर या स्थळासाठी खूपच चर्चेत असतो. तुफान गर्दी या दिवशी केवळ किस करण्यासाठी येथे लेटते. ‘किसिंग स्ट्रीट’ हे नाव या स्थळाला केवळ याच कारणासाठी मिळाले आहे.

फिरण्यालायक असलेल्या अनेक ठिकाणांचे महत्व वेगवेगळ्या कारणांसाठी आणि सुंदरतेमुळे असते. मेक्सिको हे शहर मुळातच सुंदर आहे. पण त्यात सुंदरता आणलीय ती आगळ्या वेगळ्या ‘किसिंग स्ट्रीट’ने. नव्या जोड्यांच्या हनिमुनसाठी हे शहर सर्वाधिक फेमस आहे. तिथले रॉमॅन्टिक वातावरण त्याला कारण आहेच पण किसिंग करण्याच्या कारणाने हे शहर अधिकच चर्चेत आले आहे. शहरातील साईड सीन्सचा नजारा तर डोळे तिबवणारा मानला जातो.

- Advertisement -

‘किसिंग स्ट्रिट’ला येणारे किस करण्यासाठी इथे एका रांगेत उभे राहतात, येणार्‍या जोडीदाराची वाट पाहातात आणि येईल त्याला किस करतात. रांगेत ज्याला किस करावा लागेल तो आपला कायमचा जोडीदार म्हणून पुढे त्याच्याशी संसारही करतात. ‘एल कॅलेजन डेल बेसो ’ असे या गल्लीचे नाव आहे. पण गेल्या अनेकवर्षांपासून या गल्लीला ‘किसिंग स्ट्रीट’च्या नावानेच ओळखले जाते. या गल्लीचा इतिहासही मोठा रंजक आहे. खूप काळापूर्वी तिथे एक मुलगा आणि मुलगी राहत होती. डोना कार्मेन असे तिचे नाव. खूप श्रींमत घरातील ती तरुणी लुईस नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. तसा तो तिच्या मानाने गरीबच. तिच्या वडिलांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. लुईसने तिच्या घराजवळच भाड्याने घर घेतले. पुढे ते दोघेही या गल्लीत वेळ घालवायचे. डोनाच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी डोनाची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर कपल्सनी येथे जमा होऊन एकमेकांना किस करून या घटनेचा निषेध नोंदवला. या ठिकाणाबाबत सांगण्यात येणार्‍या या गोष्टीत किती सत्यता आहे हे सांगता येणे कठीण आहे. पण लाखोंच्या संख्येने जोडपी या गोष्टीने प्रेरित होऊन येथे येऊन किस करतात हे मात्र उघड सत्य आहे.


प्रवीण पुरो

- Advertisement -