घरफिचर्सइंद्रधनुष्य आहाराविषयी घ्या जाणून

इंद्रधनुष्य आहाराविषयी घ्या जाणून

Subscribe

वजन नियंत्रणात आणण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार, विशिष्ट प्रकारचा व्यायाम करूनही तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होत नाही? मग आज आम्ही तुम्हाला इंद्रधनुष्य आहाराबद्दल सांगणार आहोत. या प्रकारचा आहार घेतल्यास तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता सतावणार नाही. पावसाळ्यात आकाशात दिसणार्‍या सप्तरंगी पट्ट्याला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. मात्र, याच इंद्रधनुष्यातील रंगांचा आपण आपल्या आहारात समावेश केला तर आपण नक्कीच आरोग्यदायी जीवनाचा लाभ घेऊ शकतो.

वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंद्रधनुष्य आहार फायदेशीर ठरतो. या आहार प्रकारात इंद्रधनुष्याप्रमाणेच रंगीबेरंगी आणि पौष्टिक घटक असलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश असतो. त्यामुळेच या आहारप्रकारातून शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक मिळतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हा आहार महत्त्वाचा ठरतो.

- Advertisement -

इंद्रधनुष्य आहार आणि त्याचे फायदे

लाल रंग – यामधील लाल रंगाच्या भाज्या, फळे जसे की गाजर, टोमॅटो, लाल मिरची, डाळिंबमध्ये फायटोकेमिकल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. यातील अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांवर मात करणे शक्य होते.

नारिंगी रंग – संत्रे, पपई, भोपळा यासारख्या नारंगी फळांमध्ये फ्लेवोनाइड्स, लायकोपीन, पोटॅशिअम, जीवनसत्व क, बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक आढळतात. हे अँटिऑक्सिडेंट्स शरीराला विविध प्रकारे मदत करतात. निरोगी हृदय आणि तजेलदार त्वचेसाठी नारिंगी रंग असलेल्या फळांचा, भाज्यांचा समावेश करावा.

- Advertisement -

हिरवा रंग – डॉक्टरही आपल्याला हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याविषयी सुचवतात. पालक, हिरवी केळी, मटार, ब्रोकोली, कोबी सारख्या हिरव्या भाज्या, फळांमध्ये जीवनसत्व, पोटॅशिअम, फायबर, खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. वजन कमी करण्यास, पोटाच्या विविध तक्रारी दूर होण्यास हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि फळांचा आहारात जरूर समावेश करावा.

पिवळा रंग – लिंबू, केळी, संत्र, अननस सारख्या पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये ब्रोमेलन, पपैन सारखी एंजाइम असतात. त्यामुळे या प्रकारच्या फळांचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या विविध तक्रारींवर मात करता येते.

जांभळा किंवा निळा रंग – या प्रकारात जांभळ्या रंगाची वांगी, जांभळा फ्लॉवर, ब्लूबेरी, कॅनबेरीचा समावेश होतो. यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सीडंट्स मेंदूच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायी असतात.

पांढरा रंग – इतर खाद्य पदार्थांप्रमाणेच पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थही आरोग्यासाठी हितकारक असतात. सफेद कांदा, लसूण सारखे पांढरे पदार्थ कर्करोग आणि उच्च रक्तदाबावर लाभदायक ठरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -