घरफिचर्सपशुधन आणि दुष्काळ

पशुधन आणि दुष्काळ

Subscribe

जगभरात दोन तृतीयांश जमीनीवर पिक लागवड होत नाही, त्यावर पशुधनासाठी चार्‍याची लागवड करू शकतो. पशुधनाचे मास, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थांसोबत शेनखताचे मोठे योगदान आहे. आज शेती उत्पादनात सेंद्रीय शेतीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पशुधन महत्वाचे आहे व त्यातून आर्थिक उत्पादन होऊ शकते हे उल्लेखनीय आहे.

मानवी प्रगतीसाठी शेतीनंतर सर्वात मोठे योगदान पशुधन क्षेत्राचे आहे. पशुधन आजही गरीब कुटुंबाचा खूप मोठा आधारवड आहे. आज जगभरात शाश्वत विकास ध्येया संदर्भात बोलले जात आहे, ज्यात पशुधन क्षेत्राकडून गरीबी निर्मूलनासाठी मोठ्या योगदानाची अपेक्षा आपण ठेवू शकतो. परंतु तितकेच मोठ्या प्रमाणात आव्हाने उभी आहेत. सयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने ‘जागतिक पशुधन आणि शाश्वत विकास ध्येय एक सुरवात’, असा अहवाल मागच्या दोन महिन्यापूर्वी संघटनेने जाहीर केला.

जागतिक स्तरावर अनेक देश गरीब आहेत, कुपोषण, बेरोजगारी, वातावरणातील बदल, पिण्याच्या पाण्याचे संकट, अनेक नैसर्गिक संसाधनाची कमतरता, अन्न धन्य उत्पादनात तूट अशा अनेक एकापेक्षा एक संकटे आपल्यासमोर आहेत. आपण शाश्वत रोजगार आणि काही आर्थिक उत्पादनाची हमी पशुधन क्षेत्राकडून घेऊ शकतो. आज पशुधन क्षेत्राचे योगदान आणि यात अनेक विकासात्मक दृष्टीकोन बघून या क्षेत्राला समोर नेण्यासंदर्भात मोठी संधी आहे.

- Advertisement -

आज क्षेत्राकडून अनेक अब्जावधी लोकांचे जीवन आपण बदलू शकतो, ज्यात मास, अंडी , दूध, दुग्धजन्य पदार्थ आहेत. या सगळ्या पशुधानापासून उपलब्ध संसाधनामुळे आपण अनेक लोकांची उपजीविका सुरक्षित करू शकतो. लहान मुलांचे आरोग्य आणि अनेक कुटुंबासाठी रोजगार उपलब्ध होवू शकतो.

जगभरात दोन तृतीयांश जमीनीवर पिक लागवड होत नाही, त्यावर पशुधनासाठी चार्‍याची लागवड करू शकतो. पशुधनाचे मास, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थांसोबत शेनखताचे मोठे योगदान आहे. आज शेती उत्पादनात सेंद्रीय शेतीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता पशुधन महत्वाचे आहे व त्यातून आर्थिक उत्पादन होऊ शकते हे उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

जगभरात वातावरणातील बदल, वाढते उष्णतामान आणि त्याचे दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवतात. आज उष्णतेची लाट, पूर, कमी पाऊस आणि दुष्काळ जगभरात या नैसर्गिक आपतीचे संकट उभे आहे. त्याचे आज पशुधनावर परिणाम जाणवत आहेत. राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो कर्नालच्या वैज्ञानिकांनी 2017 च्या पशुधन प्रकाश अंक आठमध्ये ग्लोबल वार्मिंग आणि देशी पशुधन- संसाधन यावर सखोल चर्चा करून उपाययोजना मांडल्या आहेत.

तापमानात बदल झाल्यामुळे उत्पादनाच्या गणात कमतरता, पोषण व खाद्य विकार, नर प्रजनन क्षमतेवर प्रभाव आणि मादी प्रजनन क्षमतेवर प्रभाव जाणवतात. वैज्ञानिकांच्या मते, देशातील पशु जैविविधता जगप्रसिद्ध आहे, ज्यात गाय, म्हैस, बकरी, मेंढरे (मेंढी), घोडे, उंट आणि याक इत्यादी. देशी पशुधनात विशिष्ट गुण आहेत जे शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम आणि रोगप्रतिकारक आहेत, ज्यामुळे ते विषम परिस्थितीत वातावरणातील झालेल्या बदल स्थितीत यांच्यावर विशेष परिणाम होत नाही.

सयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने जागतिक पशुधन या अहवालात आज देशी पशु जैविविधता महत्वाची मानली आहे.

आज देशी पशुधन संरक्षित करण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांच्या पशुंसाठी चांगल्या प्रजातीचा चारा, आरोग्य यंत्रणा, पशु उत्पादन आणि विपणन व्यवस्था मजबूत केल्यास हे शक्य आहे.

महाराष्ट्र आज राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि खखडएठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र जनुक कोश अत्यंत महत्वाच्या प्रकल्प आहे. ज्यात पिके, जनावर, मासे, पक्षी, चारा, जंगल, यातील स्थानिक प्रजातीचे विशेष संरक्षण करून क्षेत्रीय जैविविधता संरक्षित करण्याची महत्वाचे प्रकल्प राबवला जात आहेत. सरकारी पातळीवर यावर महत्वपूर्ण धोरण आखण्याची गरज आहे. स्थानिक डांगी, खिल्लारी, गौडवू गायीच्या जाती आणि इतर पशूंच्या जातीचे संरक्षण आणि त्या पशुपालकांचे पारंपरिक ज्ञान महत्वाचे आहे ते जतन करण्याची गरज आहे.

देशात व राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आज दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी आपण अनेक अभ्यास केले, आयोग नेमले आणि उपाय योजना सुचवल्या, परंतु आपण त्याही पलीकडे गेलो नाही.

यात स्थानिक समुद्याचा विचार आणि त्यांचा सहभाग आपण विशेष मानत नाही. आज देशात पशुपालकांच्या समस्या आहेत. त्यांच्या प्रश्नावर आणि समस्यावर विशेष चर्चा व त्यांचे अधिकार स्थापित करण्यासाठी त्यांना धोरण आखण्यासाठी त्यांच्या सोबत चर्चा करण्याची गरज आहे. देशभरात अनेक पशुपालक त्यांची विशेष ओळख नाही, पशुपालकांना चारा महत्वाचा घटक आहे, ते एकतर जंगल आणि भटकत चारा शोधण्यासाठी देश भर फिरतात. त्या त्या राज्यात त्यांना मदत करण्यासाठी विशेष यंत्रणेची गरज आहे. पशुपालक आणि त्यांचे विशेष पारंपारिक ज्ञान महत्वाचे आहे आणि ते जतन करण्याची गरज आहे.

आज जगभरात या सगळ्या समुद्याचे घोषणापत्र तयार होत आहेत, सरकारी पातळीवर यावर किवा राज्य जैविविधता मंडळ यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने आज अनेक मार्गदर्शिका प्रकाशित केल्या त्याचे अनुवाद करून या सर्व समुदायासोबत स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज आहे.

प्रवीण मोते –

(सेंटर फॉर पीपल्स क्लेक्टीवचे निर्देशक आहेत व पर्यावरण धोरणाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -