Maharana Pratap Jayanti 2022 : महाराणा प्रताप यांच्या आयुष्यातील ‘या’ ७ गोष्टी माहित आहेत का?

राजस्थानचे वीर पुत्र , महान योद्धा आणि साहसी राजा महाराणा प्रताप यांची आज जयंती आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी कुंभलगढ दुर्ग येथे झाला होता. परंतु राजस्थानातील राजपूत समाजातील काही गट त्यांचा जन्मदिवस हिंदु तिथीनुसार साजरा करतात. असं म्हणतात की, महाराणा प्रताप यांनी त्यांच्या आईकडून युद्ध कौशल्याचे शिक्षण घेतले होते. देशाच्या इतिहासातील नमूद केलेल्या काही घटनांपैकी हल्दीघाटीचे युद्ध आज सुद्धा प्रचलित आहे. महाराणा प्रताप आणि मुगल बादशाह अकबर यांमध्ये झालेले हे युद्ध खूप विनाशकारी होते.

महाराणा प्रताप यांच्याशी जोडलेल्या ७ खास गोष्टी

  • महारणा प्रताप यांचा जन्म महाराजा उदयसिंह आणि माता राणी जीवत कंवर यांच्या घरामध्ये झाला. त्यांना लहानपणी कीका नावाने हाक मारली जात होती. हे नाव त्यांना भीलों या भाषेतून मिळालं होतं. भीलो भाषेत कीका या शब्दाचा अर्थ ‘बेटा’ असा होतो.
  • महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा एक घोडा होता. जो त्यांचा अतिशय प्रिय घोडा म्हणून ओळखला जात होता. महाराणा प्रतापांच्या अनेक गोष्टींमध्ये चेतक घोड्याचे वर्णन आहे. या घोड्यामुळे महाराणा प्रतापांना अनेक लढाईंमध्ये यश मिळाले होते. हल्दीघाटी युद्धात चेतकला खूप गंभीर जखमा झाल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
  • १५८२ मध्ये दिवेरच्या युद्धात महाराणा प्रताप यांनी त्या ठिकाणांना परत आपल्या ताब्यात घेतलं ज्या ठिकाणांना कधीकाळी मुगलांनी जिंकून घेतले होते.
  • महाराणा प्रताप यांनी मुगलांसोबत अनेक युद्ध केले, परंतु हल्दीघाटीचे युद्धा सर्वात महत्त्वपूर्ण मानलं जातं. १५७६ मध्ये झालेल्या या युद्धात जवळपास २० हजार सैनिकांना सोबत घेऊन महाराणा प्रताप यांनी मुगलांच्या ८० हजार सैनिकांचा सामना केला होता.
  • हल्दीघाटी युद्धा दरम्यान जेव्हा मुगल सेना महाराणांच्या पाठी धावत होती, तेव्हा चेतक घोड्याने राणांना आपल्या पाठीवर बसवून अनेक फूट लांब असलेल्या नाल्याला उडी मारून पार केले होते. आज सुद्धा हल्दीघाटी येथे चेतकची समाधी बनवलेली आहे.
  • महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन ८१ किलो होते. सोबतचं त्यांच्या छातीचे कवच ७२ किलो होतेय.
  • १५९६ मध्ये शिकारीला गेले असताना महाराणा यांना जखम झाली. मात्र ती जखम कधीही ठीक झाली नाही. १९ जानेवारी १५९७ साली वर्षाच्या ५७ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.


हेही वाचा :Russia-Ukraine war : बायडेन यांचे पुतिन कुटुंबीयांवर निर्बंध, दोन्ही मुलींची केली आर्थिक कोंडी