Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स LGBT च्या झेंड्यातल्या 'रंगांची' कहाणी

LGBT च्या झेंड्यातल्या ‘रंगांची’ कहाणी

LGBT कम्युनिटीच्या झेंड्यातील प्रत्येक रंग समलैंगिक लोकांच्या मनातील विविध भावनांचं प्रतिक असल्याचं सांगितलं जातं.

Related Story

- Advertisement -

समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचं सांगत त्याला कायदेशी मान्यता दिल्यामुळे LGBT कम्युनिटीमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरावेत की नाहीत? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. मात्र, अखेर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने याबाबतचा अंतिम निर्णय दिला. या निर्णयानंतर कालपासूनच एलजीबीटी कम्युमिटीतील लोक आनंद सोहळा साजरा करत आहेत. दरम्यान एलजीबीटी म्हटलं की सर्वप्रथम लक्ष जातं ते या कम्युनिटीच्या सहारंगी झेंड्याकडे. एलजीबीटीचे सदस्य नेहमीच त्यांच्यासोबत हा झेंडा ठेवतात. विशेषत: त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आणि आंदोलनांमध्ये तुम्ही हा झेंडा पाहिला असेल. एलजीबीटीच्या या ऑफिशिअल फ्लॅगमध्ये तसंच त्यांच्या लोगोमध्ये आपल्याला ६ विविध रंग पाहायला मिळतात. या ‘LGBT  फ्लॅग’ची आणि त्यातील सहा रंगांची एक विशेष कहाणी आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया LGBT च्या झेंड्यातील रंगांची कहाणी.


वाचा : ‘समलैंगिक’तेच्या विषयावरील भारतीय चित्रपट!

झेंड्याती रं काय दर्शवतात?

 

  • गुलाबी रंग – सेक्स
  • लाल रंग – जीवन
  • केशरी रंग – चिकित्सा
  • पिवळा रंग – सूर्यप्रकाश
  • हिरवा रंग – शांती/ निसर्ग
  • निळा रंग – कलात्मकता/ क्रिएटिव्हीटी
  • जांभळा रंग – स्पिरीट
- Advertisement -


वाचा : ‘समलैंगिक संबंध आरोग्यास हानीकारक’

ऐतिहासिक झेंड्याची गोष्ट

सर्वांचच लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या या LGBT चा झेंड्याचं ऐतिहासीक महत्व आहे. समलैंगिकतेचं प्रतिक असलेला हा झेंडा सर्वात पहिल्यांदा सॅन फ्रॅन्सिस्कोचा कलाकार गिलबर्ट बेकर याने तयार केला होता. बेकर यांनी ५ रंगांचे पट्टे असलेल्या ‘फ्लॅग ऑफ द रेस’ या झेंड्यापासून प्रेरित होत, स्पतरंगी LGBT झेंड्यांची निर्मिती केली होती. २५ जून १९७८ साली, सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या ‘गे फ्रीडम परेड’मध्ये सर्वप्रथम या झेंड्याचा वापर करण्यात आला होता. त्यावेळेच्या फ्लॅगमध्ये लाल, नारिंगी, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा आणि गुलाबी हे ७ रंग होते. मात्र कालांतराने यातील गुलाबी रंग काढून टाकण्यात आला. यातील प्रत्येक एक रंग वेगवेगळ्या भावनेचं प्रतिक आहे. समलैंगिक लोकांच्या मनातील भावना तसंच त्यांच्या अपेक्षा यांचं प्रतिक म्हणून बेकरने हा झेंडा तयार केल्याचं सांगितलं जातं.

- Advertisement -

 

- Advertisement -