घरआली दिवाळी २०१८मुंबईकरांनो यंदाची दिवाळी खास; 'या' कार्यक्रमांचा घ्या आस्वाद

मुंबईकरांनो यंदाची दिवाळी खास; ‘या’ कार्यक्रमांचा घ्या आस्वाद

Subscribe

या दिवाळीत मुंबईकरांसाठी 'सांस्कृतिक' कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मुंबईकरांची दिवाळी खास बनवण्यासाठी एकाहून एक दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिवाळी म्हटलं आकाश कंदील, चविष्ट फराळ, सुंदर रांगोळ्या आणि रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई या गोष्टी ओघाने आल्याच. मात्र, याशिवाय दिवाळीचा सण म्हणजे विविध कार्यक्रमांची रेलचेल. खास दिवाळीच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुठे ‘दिवाळी पहाट’ सारख्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना संगीताची मेजवानी दिली जाते, तर कुठे रांगोळी स्पर्धा, कि्ल्ले स्पर्धा किंवा आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा यांसारख्या उपक्रमांद्वारे लोकांमधील कलागुणांना वाव दिला जातो. अनेक ठिकाणी तर लोकांना खुसखुशीत फराळाची चव चाखता यावी यासाठी खास फराळ महोत्सवही आयोजित केला जातो. यंदाची दिवाळीही मुंबईकरांसाठी स्पेशल असणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात अनेक विविधरंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ही दिवाळी अधिक चांगल्या पद्धतीने कशी साजरी करता येईल? किंवा दिवळीत कुटुंबासोबत कशाप्रकारे चांगला वेळ घालवता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर एक यावर एक नजर जरूर टाका

बहुरंगी कार्यक्रमांचा नजराणा

ख्याल रंग

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकीच्या सादरीकरणासाठी खास ‘ख्याल रंग’ ही दोन दिवसीय मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना विविध घराण्यातील संगीताचा आस्वाद घेता येणार आहे. शाश्त्रीय गायनापासून ते तबला वादन, सतार वादन, बासरी वादन अशा अनेक नादमधुर कलाकृतांची कार्यक्रमात रेलचेल असणार आहे. रघुनंदन पणशीकर, कौशिक दास, प्रिया पुरुषोत्तम, पं. रामदास पळसुले, निरंजन लेले असे अनेक सरस कलाकार या कार्यक्रमात आपली कलाकृती सादर करणार आहेत.

- Advertisement -
कुठे – राजा शिवाजी संकुल, हिंदू कॉलनी, दादर पूर्व
कधी – शनिवार ३ नोव्हेंबर आणि रविवार ४ नोव्हेंबरला, संध्याकाळी ७ वाजल्यापासून


दिवाळी फराळ महोत्सव

सीकेपी ज्ञातिगृह ट्रस्टतर्फे खास गृहिणीसांठी हा फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीत फराळ खाण्याची मजाच काही और असते. मात्र, सध्याच्या बिझी लाईफमध्ये सर्व पदार्थ घरीच बनवणं महिलांना शक्य होत नाही. म्हणूनच खास त्यांच्यासाठी या फराळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुम्हीसुद्धा याठिकाणी जाऊन फराळाच्या विविध पदार्थांची चव चाखू शकता.

कुठे- सीकेपी ज्ञातिगृह ट्रस्ट, खारकर आळी, ठाणे प.
कधी – रविवार ४ नोव्हेंबर, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत


शंभरपैकी पुलं

पु.ल.देशपांडे हे संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज नाव. त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शंभरपैकी पुलं’ हा विशेष कार्यक्रम आयोदित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पु.ल. देशपांडे यांच्या अगाद साहित्याटचे सादरीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -
कुठे – टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे (प.)
कधी – मंगळवार ६ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता


जयपूर दागिन्यांचे प्रदर्शन

दागिने हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय. या प्रदर्शनामध्ये महिलांना सोने, चांदी, मोती अशा पारंपारिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड अशा वेगवेगळ्या प्रकाराचे दागिने खरेदी करता येणार आहेत.  पारंपारिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्व आहे. असेच अनेक प्रकारचे पारंपारिक दागिनेही सा प्रदर्शनात असतील.

कुठे – ठाकूरवाडी, पानेरी साडी स्टोअरसमोर, गोखले रोड, ठाणे (प.)
कधी – ११ नोव्हेंबरपर्यंत सुरु, दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत

 

पार्ले कट्टा

ज्येष्ठ मानसोप्चार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक- डॉ.आनंद नाडकर्णी यांची पार्ले कट्ट्यावर प्रकट मुलाखत होणार आहे. या मुलाखतीमधून त्यांचा जीवनप्रवास जाणून घेता येणार आहे. याशिवाय पार्ले कट्टा आयोजित ‘मुक्त व्यासपीठ’ या कार्यक्रमात गायिका प्राजक्ता रानडे यांचे गायन आणि नृत्यांगना टीना तांबे यांच्या कलेचं सादरीकरण होणार आहे.

कुठे – साठे उद्यान, मालवीय पार्क रस्ता चौक,विलेपार्ले पूर्व
कधी- शनिवार ३ नोव्हेंबर, सायंकाळी ५.३० वाजता

 

दिवाळी ग्राहकपेठ

दिवाळीच्या निमित्ताने विविध गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी ठाण्यात ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहकपेठेत हस्तकला, गृहपयोगी वस्तू  तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तू आणि परिसरातील लघु उद्योजकांवनी बनवलेल्या नावीण्यपूर्ण वस्तू खरेदी करता येतील.

कुठे – शुभंकरोती हॉल, न्यू इंग्लिश स्कूलमागे, महर्षी कर्वे रोड, ठाणे (प.)
कधी – सोमवार ५ नोव्हेंबरपर्यंत, सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत

 

पुस्तकांची जत्रा

मराठी तसंच इंग्रजी भाषेतील सुमारे ५० हजार पुस्तकांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. ‘साहित्यजत्रा’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जत्रेत पुस्तकांच्या खरेदीवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत सवलतही मिळणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही रास्त दरात पुस्तकं खरेदी करु शकता. याशिवाय भाग्यवान विजेत्यांना बक्षीसंही दिली जाणार आहेत.

कुठे – सरस्वती विद्या मंदिर, क्रीडा संकुल, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
कधी- शनिवार ३ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर, सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत.


कॉन्सर्ट फॉर हार्मनी

नाद फाऊंडेशनने ‘कॉन्सर्ट फॉर हार्मनी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यामध्ये श्रोत्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि सतार वादनाचा आस्वाद घेता येणार आहे. शास्त्रीय संगीतातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि संगीत नाचक अकादमी पुरस्कार विजेते गायक- पं. प्रभाकर कारेकर हे या कार्यक्रमाच्या अग्रस्थानी असतील. याशिवाय सतारवादक पुर्बयान चॅटर्जी आणि गायिका डॉ. रिटादेव यांच्यासह अन्य कलाकारही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तबलावादन, सतारवादन, शास्त्रीय गायन अशा अनेक कलाकृती कार्यक्रमात पेश केल्या जातील.

कुठे – रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर (प.)
कधी- ३ नोव्हेंबर २०१८, संध्याकाळी ५ वाजता

 

‘जीवनगाणी’ कार्यक्रम

विलेपार्ले पूर्वमध्ये खास दिवाळीनिमित्त ‘जीवनगाणी’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी नगरसेवक शशिकांत पाटकर आणि शुभदा पाटकर यांनी रसिकांसाठी या खास संगीत मैफीलीचं आयोजन केलं आहे.

कुठे- दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)
कधी- मंगळवार ६ नोव्हेंबर, पहाटे ६ वाजता

 

दिवाळी प्रभात

स्वरांच्या हिंदोळ्यावर या सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन दिवाळी प्रभातच्या निमित्ताने करण्यात आलं आहे. ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, यामध्ये मराठी तसंच हिंदी गाणी सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना वाव देणार आहेत.

कुठे – राधारमण बिल्डींग हॉल, बापू बोगवे मार्ग, दहिसर (प.)
कधी – ७ नोव्हेंबर, सकाळी ८.३० वाजता

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -