म्युच्युअल फंड – पारंपरिक बँक गुंतवणुकीला पर्याय

ज्यांना थेट शेअर्समध्ये गुंतवण्याचे धाडस करायचे नसते, अभ्यास नसतो, त्यांना म्युच्युअल फंड आल्याने नवा-आकर्षक  दिसू लागला.

mutual fund
म्युच्युअल फंड

विदेशी गुंतवणूक वाढू लागली आणि शेअरबाजारात तेजी आली म्हणून चाकोरीबद्ध गुंतवणूक करणारेदेखील शेअर्समध्ये पैसे गुंतवू लागले. डिव्हिडंड आणि वाढते भाव असे काही प्लस पॉईंट्स असल्याने,जोखमीच्या मायनस पॉईंटकडे दुर्लक्ष करू लागले. विशेषतः तरुण मंडळी नव्या पर्यायांचा डोळसपणे विचार करू लागले. परगावी किंवा शहरी गजबजाटापासून दूर अशा ‘सेकंड होम’मध्ये इन्वेस्ट करणे, नवीन बाईक-स्कुटरसाठी किंवा मोबाईलसाठी ‘लोन घेणे’ हे रुटीन झाले आहे. ज्यांना थेट शेअर्समध्ये गुंतवण्याचे धाडस करायचे नसते, अभ्यास नसतो, त्यांना म्युच्युअल फंड आल्याने नवा-आकर्षक  दिसू लागला.

नमस्कार, इथे आपण भेटणार आहोत कारण आपल्याला जगण्यासाठी -सुख-प्राप्तीसाठी आणि भविष्यासाठी गुंतवणूक कशी करायची,त्यासाठी आवश्यक अशी ‘अर्थ-साक्षरता’ आपल्याकडे असली पाहिजे. आज क्षणा-क्षणाला जग बदलते आहे. अशा वेळी आधुनिक गोष्टी आपल्याला हव्याहव्याशा वाटतात,उदाहरणार्थ टीव्ही-बाईक किंवा आपण ज्याशिवाय राहू शकत नाही असा ‘मोबाईल’-अगदी लेटेस्ट मॉडेल हवे असते. असे असताना आपली कमाई वाढवताना मात्र आपण-आपल्यापैकी काहीजण अजूनही पारंपरिक गुंतवणूक साधनांचा आग्रह धरतात.हे असे का? यामागे आपली रुढीबद्ध मानसिकता आहे.कसे ते जरा उलगडून सांगतो.

तुम्ही-आम्ही जेव्हा पहिल्यांदा बँकेत ‘खाते’उघडले ते कसे?आठवते का? आपल्या बाबा-दादा किंवा घरातल्यांचे ज्याबँकेत खाती आहेत,तिथेच आपण गेलो किंवा तिथेच आपण जातो.कारण आपला भरोसा असतो,घरच्यांचा विश्वास असतो.पूर्वी जसा ‘फॅमिली डॉक्टर’ असायचा,तसेच काहीसे गुंतवणुकीबाबत बँक निवडताना असायचे. पुढे आपण नोकरी करतो किंवा लग्न झाल्यावर ‘जॉइंट अकाऊंट’ उघडतो, तो वेगळ्याच बँकेत. कारण नवीन एखादी बँक आपल्याला सोयीची वाटते.थोडक्यात काय तर पुढे पुढे आपण ‘आपली सोय -आपला फायदा’ असा व्यवहारिक विचार करायला लागतो.केवळ खाते ओपन करताना नव्हे,तर पुढे कर्ज घेताना,ठेवी ठेवताना आपण अन्य बँकेचा पर्याय निवडतो. कारण तेव्हा आपण आपली नेहमीची बँक निकष न ठेवता व्याजदर,अटी-शर्ती,सेवा-कार्यक्षमता अशा अनेक सोयी-सुविधांचा, आर्थिक नफा-तोट्याचा विचार करतो.

गेल्या काही वर्षांत बँकिंगमध्ये अनेक नवीन बँक्स-खाजगी-सहकारी बँका आकर्षक सेवा,लाभदायक व्याजदर देत असल्याने स्पर्धा वाढलेली आहे.पूर्वी केवळ पोस्ट ऑफिस ठेवी आणि बँक या ठिकाणी पैसे गुंतवणे सुरक्षित मानले जायचे. कारण सरकारी असल्याने धोका नाही अशी सर्वांची भावना असायची.पुढे काही बँका बुडाल्या किंवा प्रचंड अफरातफर-भ्रष्टाचार झाल्याने विश्वासार्हता कमी झाली,ही विदारक असली तरी वस्तुस्थिती आहे. दरम्यानच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेत अनेक चांगले बदल झाले,म्हणून नवीन बँका, वित्त कंपन्या, बिगर बँकिंग कंपन्या यांचे आगमन झाले. विदेशी गुंतवणूक वाढू लागली आणि शेअरबाजारात तेजी आली म्हणून चाकोरीबद्ध गुंतवणूक करणारेदेखील शेअर्समध्ये पैसे गुंतवू लागले.डिव्हिडंड आणि वाढते भाव असे काही प्लस पॉईंट्स असल्याने,जोखमीच्या मायनस पॉईंटकडे दुर्लक्ष करू लागले.विशेषतःतरुण मंडळी नव्या पर्यायांचा डोळसपणे विचार करू लागले. परगावी किंवा शहरी गजबजाटापासून दूर अशा‘सेकंड होम’ मध्ये इन्वेस्ट करणे,नवीन बाईक-स्कुटरसाठी किंवा मोबाईलसाठी ‘लोन घेणे’ हे रुटीन झाले आहे.ज्यांना थेट शेअर्समध्ये गुंतवण्याचे धाडस करायचे नसते,अभ्यास नसतो,त्यांना म्युच्युअल फंड आल्याने नवा-आकर्षक पर्याय दिसू लागला.

म्युच्युअल फंड -म्हणजे नेमके काय? ते आधी आपण पाहणार आहोत.

असंख्य छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांचे पैसे एका ठिकाणी गुंतवले जातात आणि त्यानिधीचे व्यवस्थापन हे गुंतवणूक-तज्ज्ञ असलेल्या व्यावसायिक संस्थेकडे सोपवले जातात.कोणाही व्यक्तिगत गुंतवणूक करणार्या व्यक्तीकडे बाजाराचे तितके ज्ञान असते,अभ्यास नसतो किंवा वेळ देता येत नाही,अशा अनेक कारणांनी वैयक्तिक निर्णय घेण्यापेक्षा अभ्यास असलेल्या टीमने अर्थव्यवस्था, भांडवली बाजार स्थिती आणि कंपनीची उलाढाल-नफा करण्याकडे लक्ष दिले तर कोठे पैसे गुंतवले तर अधिक लाभ होईल आणि ते सुरक्षितही राहतील! हे ठरवले जाते.म्हणजेच ज्यांना थेट शेअर्समध्ये गुंतवायचे आहेत; पण व्यक्तिशः तसे करू शकत नाहीत,त्यांना म्युच्युअल फंड हा सुरक्षित आणि लाभदायक असे साधन आहे.

वैशिष्ठ्ये :-

  • कमीत कमी जोखीम-अधिक लाभ अशा शेअर्स/रोख्यात गुंतवणूक
  • पैसे मोठ्या प्रमाणात गुंतवले जातात
  • सखोल अभ्यास,अनुभव आणि सतत निरीक्षण करणे
  • खास निधी व्यवस्थापक हे काम करतात
  • संशोधन विभाग अर्थव्यवस्था /बाजार आणि कंपन्या यांचा अभ्यास करत असतात
  •  विश्लेषण निपक्षपातीपणे केले जाते

युनिट-  म्युच्युअल फंड हे शेअर्सप्रमाणे नसतात, पण ते युनिटस्वरुपात खरेदी-विक्री केली जातात.नफा हा लाभांशरूपात प्रत्येक युनिटमागे दिला जातो. अशा एका युनिटमध्ये अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा काही प्रमाणात धारक भाग असतो. हे युनिट जरी शेअरबाजार येथे नोंदलेले असले तरी ते इतर शेअर्सप्रमाणे नसतात.

कार्य-पद्धती-  प्रत्येक म्युच्युअल फंडाकडे असलेले निधी व्यवस्थापक हे आपण गुंतवलेला ‘निधी’ बाजार-कल ,कंपन्यांची कामगिरी आणि कंपनी व्यवस्थापन -ज्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे,तिचे अर्थव्यवस्थेतील स्थान आणि भवितव्य उदा.टूथपेस्ट उत्पादन करणारी कंपनी असेल तर तिची विक्री-कमाई,नफा ,स्पर्धक कंपन्या,बाजारपेठ-देशी-विदेशी आणि गेल्या पाच वर्षातील चढ-उतार, असे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात.
निधी व्यवस्थापक अशारीतीने गुंतवणूक करतात की ज्यायोगे अधिक उत्पन्न मिळावे आणि खर्च वजा करून जे राहते, ते लाभांश म्हणून गुंतवणूकदारांना वाटले जाते.

फायदे –

१] बाजार आणि कंपन्यांचा अद्ययावत अभ्यास असलेले निधी व्यवस्थापक – फंड मॅनेजर्स असल्याने चांगली कामगिरी करत असणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. आपण व्यक्तिगतपणे करायला गेलो तर नेमका निर्णय घेता येणार नाही,पण ही तज्ञ-मंडळी सातत्याने आकडेवारी व कामगिरी अभ्यासत असल्याने किती प्रमाणात शेअर्स घ्यायचे हे ते अधिक प्रभावीपणे ठरवू शकतात.
२] खरेदी-विक्री – दोन्ही बाबतीत अभ्यासू निर्णय घेण्याची क्षमता असलेले फंड मॅनेजर्स कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी खरेदी वा विक्री करू शकतात ,त्याकरिता योग्य वेळ कोणती हे सर्वसामान्य गुंतवणूकदार तितके चांगल्याप्रकारे ठरवू शकत नाही.आपल्या ऑफिस -कौटुंबिक व्यस्त जीवनात आपल्या इतकी माहिती घेण्यास वेळ मिळत नाही,म्हणून थेट शेअरबाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंड हा मध्यम व कमी जोखमीचा मार्ग मानला जात आहे.
३] सामायिक निधी – म्युच्युअल फंडाकडे असंख्य गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले असल्याने त्यांच्याकडे एकत्रित असा निधी जमा झालेला असतो.आपल्याला एकवेळ पैसे कमी आहेत असे जाणवेल,पण फंडांकडे ‘निधी’चणचण जाणवत नाही.म्हणून ते उत्तम कामगिरी करणार्या कंपनीचे अधिक किंवा त्यांना योग्य वाटतील इतके शेअर्स बिनधास्त घेऊ शकतात.
असे म्युच्युअल फंडचे अनेक पैलू आणि नवीन गुंतवणूक पर्याय आपण नियमितपणे पाहणार आहोत.