घरअर्थजगतम्युचुअल फंडातील मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप

म्युचुअल फंडातील मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप

Subscribe

शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड यात गुंतवणुकीचे अनेकविध प्रकार आहेत.त्यातील काही संज्ञा-व्याख्या आपल्याला माहीत नसतात.म्हणून आपण काही बिचकून जाण्याचे कारण नाही.आपल्या मराठी भाषेत अशी माहिती मिळू शकते कारण आर्थिक साक्षरता हे आपल्यासाठी अत्यावश्यक असे ‘मिशन’ आहे. मराठी माणसाने-समाजाने पैसे कमावण्याबाबत मागे राहू नये. शेअर्सबाबत, कंपन्यांबद्दल असे काही शब्द आहेत जे एरवी आपण सहजपणे वाचतो किंवा आपल्या कानावरून जात असतात पण सहसा आपण त्याचा अर्थ व परिणाम शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. हळूहळू का होईना आपण हे सर्व जाणून घेतले पाहिजे, तरच आपल्याला अधिक डोळस-अधिक फलदायी गुंतवणूक करता येईल आणि त्यातून आपल्याला अतिरिक्त पैसा कमावता येईल.जी आजच्या काळाची गरज आहे.

मार्केट कॅपिटलायझेशन चरीज्ञशीं उरळिींरश्रळूरींळेप म्हणजे काय ?

- Advertisement -

एखाद्या कंपनीचे शेअरबाजारात शेअर्स खरेदी-विक्रीसाठी नोंदवलेले असतात.त्यांच्या भावाच्या चढ-उतारानुसार मागणीत वाढ किंवा घट होत असते.एखाद्या कंपनीचे एकूण किती शेअर्स बाजारात आहेत,त्यासंख्येला त्या कंपनीच्या ताज्या किंमतीने गुणिले तर आपल्याला त्याविशिष्ट कंपनीची शेअरबाजारातील मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्य कळू शकते. कंपनीच्या शेअर्सचे बाजारमूल्य हे वेगळे असते शेअर्सच्या खरेदी-विक्रीशी निगडित असते आणि कंपनीची उलाढाल ही वेगळी असते.ज्याचा संबंध कंपनी निर्मित उत्पादन,सेवा -विक्री आणि नफा यांच्याशी असतो

उदाहरणार्थ – एखाद्या नामांकित कंपनीच्या शेअरची किंमत रु 50/- इतकी आहे. आणि एकूण 5 लाख शेअर्स बाजारात आहेत.

- Advertisement -

तर एकूण मूल्य कसे काढले जाते,ते पाहूया

रु 50/ गुणिले 5,00,000 शेअर्स = रु 2,50,00,000-एकूण बाजार-मूल्य
कंपनीच्या शेअरचा भाव वाढला की त्याप्रमाणात त्याकंपनीचे बाजारमूल्यदेखील वाढते. याउलट परिस्थिती होऊ शकते, म्हणजे कंपनीच्या शेअरची किंमत खाली आली की बाजारमूल्येही त्यानुसार खाली येऊ शकते.
अनेक कंपन्या कार्यरत असतात,त्यांच्या व्यवसाय, व्यावसायिक कामगिरी,ग्राहक-संख्या, नफा-कमाई अशा काही निकषानुसार त्यांची वर्गवारी करता येते. तशी कंपन्यांची अनेक प्रकारे वर्गवारी होऊ शकते.मात्र इथे आपण त्यांच्या शेअर्सचे मूल्य, व्यवसायातील यश, नफा अशा निश्चितपणे मोजमाप करता येतील अशा घटकांचा विचार केला जातो.त्यानुसार तीन मुख्य प्रकार केले जातात.

1 लार्ज कॅप साईझ कंपन्या – ‘मोठ्या कंपन्या’ हा शब्ददेखील अपुरा पडेल म्हणून आपण अशा कंपन्यांना ‘बलाढ्य कंपन्या’ असे म्हणूया. त्यांची ठळक वैशिष्ठ्ये पाहूया :-

  • एकूण उलाढाल मोठ्या प्रमाणावर उत्पादन-उत्पन्न
  • भाग-भांडवल भरपूर -सशक्त म्हणता येईल असे
  • स्थावर मालमता चांगली
  • नफा-कमाईमध्ये सातत्य
  • ज्या उद्योग-व्यवसायात असतील तिथे अग्रणी
  • ग्राहक-संख्या भरपूर

अशा बलाढ्य कंपन्यांबद्दल अनेक प्रकारची माहिती वर्तमानपत्र, प्रसिद्धी माध्यमे यांच्याकडे उपलब्ध असते. कामगिरीचा तपशील सातत्याने जाहीर होत असतो. निर्यात-वाढ किंवा सर्वोत्तम कामगिरी करणारी कंपनी म्हणून गौरव होत असतो किंवा विविध स्तरावर नावलौकिक वाढताना दिसत असतो. आपण गुंतवणूकदार म्हणून अशा कंपन्याकडे निश्चितपणे छान पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. लाभांश -बोनस शेअर्स असे काही शेअर-होल्डर्स म्हणजे भागधारकांना समृद्ध करणारे कमाई-निकष आकर्षित करतात.

मार्केट शेअर्स मूल्य उलाढाल – रु 20,000 कोटींच्यावर असू शकते

बलाढ्य कंपन्या -काही ठळक कंपन्या – फक्त उदाहरण म्हणून – विप्रो, टीसीएस,इन्फोसिस

2 मिड कॅप साईझ कंपन्या – अशा कोणत्या कंपन्या हे आपण पाहणार आहोत. बलाढ्य कंपन्यांच्या तुलनेत सर्वच पातळीवर किंचित कमी कामगिरी करणार्‍या कंपन्या म्हणून पाहता येईल. मात्र नजीकच्या भविष्यात बलाढ्य होण्याची क्षमता असलेल्या प्रगतीशील कंपन्या असेही आपण म्हणून शकतो.साधारणपणे 3 ते 5 वर्षात चांगला परतावा मिळू शकतो.

मार्केट शेअर्स मूल्य उलाढाल -रु 5000 कोटी ते रु 20,000 कोटीच्या दरम्यान असू शकते

3 स्मॉलकॅप साईझ कंपन्या – ज्या नव्याने स्थापन झालेल्या आहेत किंवा ज्यांना ‘स्टार्ट अप कंपनीज’ म्हणून ओळखले जाते, तशा कंपन्या या विभागात धरल्या जातात. एखादे नवीन क्षेत्र असेल किंवा विकसित होत असलेले क्षेत्र असेल तर त्यात कामाचा प्रारंभ करणार्‍यांना ‘स्मॉलकॅप’ म्हणून अधोरेखित केले जाते.

नुकतीच सुरवात झालेली असल्याने मर्यादित भांडवल, मोजकी कर्मचारी संख्या आणि नवनवीन ग्राहक मिळवण्याची कुवत आजमावू पाहणारी कुशल व्यवस्थापन कौशल्य असलेली तरुण टीम असे या कंपन्यांचे वर्णन करता येईल.उगवत्या कंपन्या असल्याने तितकीशी माहिती उपलब्ध नसते,जोखीम प्रमाण अधिक असू शकते.मात्र भविष्यात ‘मोठी’ होण्याची लक्षणे असतात. दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून याकडे बघितले जाते.

सेबीची डएइख नवीन वर्गवारी – आपल्याकडे अनेक म्युचुअल फंडांच्या असंख्य योजना अस्तित्वात होत्या,त्यात सूत्रबद्धता असावी आणि गुंतवणूकदारांना सुलभ-सुटसुटीत पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून सेबी- नियंत्रकांनी अलीकडेच सर्व म्युच्युअल फंडांचे पुन:वर्गीकरण केले. काही फंड्सची नावे बदलली गेली किंवा विलीनीकरण केले गेले.असे झाल्याने काही फंडबाबत किरकोळ बदल, तरी काही फंडांचे फक्त नाव बदललेले आढळेल.तर काही बाबतीत लार्जमधून मिडमध्ये रूपांतर झाल्याचे कळेल. कदाचित आपला आधीचा पोर्टफोलीओ आणि नव्याने वर्गीकरण झाल्यानंतरचा पोर्टफोलीओ यात फरक जाणवेल.परंतु आपण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये.कर आकारणी, उत्पन्नाचे प्रमाण आणि नव्याने आपला पोर्टफोलीओ -लार्ज/मिड/ आणि स्मॉल कसा बनला आहे हे आपल्याला फंड कंपन्यांनी कळवले असेल ते तपासून पाहावे.गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घेवून फेरबदल करावेत. एकूण विचार करून ‘नवीन पोर्टफोलिओ’ तयार करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.

सेबीच्या आदेशानुसार आता फंड कंपन्यांना खालील प्रकारचे म्युचुअल फंड आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

  • एकूण 10 प्रकारचे इक्विटी फंड
  • 16 – श्रेणीतील बाँड योजना
  • हायब्रीड बाँड – फक्त 6 प्रकारचे

आपला पोर्टफोलियो तयार करताना आपली अपेक्षा, उत्पन्न आणि कालावधी असा सर्वांगीण विचार करावा आणि त्यानुसार पुन:रचना करावी. भरपूर योजना आणि संभ्रम टाळून आता सुटसुटीत म्युच्युअल फंड योजना आपल्यासमोर येत असल्याने आपल्या निवडीनुसार, गरज आणि कमाई यांचा समतोल साधत लार्ज-मिड किंवा स्मॉल असा पोर्टफोलिओ उभारता येईल आणि त्याद्वारे जोखीम-विभागणी केली जावून लाभदायी गुंतवणुकीचा आलेख तयार करता येईल.

राजीव जोशी 

अर्थ आणि बँकिंग अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -