घरफिचर्समाझ्या मनातील आपलं गाव...

माझ्या मनातील आपलं गाव…

Subscribe

आपल्या गावापोटी असणारे प्रेम,भावना मनात साठवून नेहमी जगत असतो. कधीकधी गावाविषयी काही ऐकायला मिळाले तर भारावून जातो. वर्षातून एकदा तरी गावाकडे जावे असे वाटते. होळी आणि गणपतीला तर गेल्याशिवाय करमतच नाही. कुणाच्या लग्नाला जाणेयेणे होते. आईवडिलांसाठी तर जावेच लागते. खरं तर त्यांच्यामुळेच गाव टिकून आहे, नाही तर गाव हे गाव राहिलेच नसते.

“गाव” म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक गावाविषयी आगळंवेगळं स्थान असतं. माझं गाव…माझी वाडी…माझं घर…माझ्या घरातील माणसे… सारं काही एका क्षणात आठवायला लागते. मग गावाची ओढ लागते. शहरात राहणार्‍या माणसाला एकदा तरी गावी जावेसे वाटते. प्रत्येकाचं गावाशी काहीना काही असं अतूट नातं जोडलेलं असतं. प्रत्येकाची गावाशी एक नाळ जुळलेली आहे. ज्या मातीत आपण जन्म घेतो, रुजतो, वाढतो तो गाव सर्वानाच प्रिय असतो.

काही गावे शांत, निर्मळ, विरळ वस्तीची असतात तर काही गावे गजबजलेली असतात. असाच माझा दापोली तालुक्यातील उन्हवरे गाव. माझ्या मनाला नेहमी भुरळ पाडतो. चारी बाजुंनी डोंगरांचा पडलेला वेढा. हिरवंगार निसर्गरम्य सौंदर्य. गरम पाण्याचा वाहता झरा. आंघोळीसाठी कुंड. गावात आले की, पुन्हा शहरात परतूच नये असे वाटते. गाव आणि माझे नाते म्हणजे न तुटणारा प्रवाह आहे. जेव्हा जेव्हा बाहेर पडावे वाटते. तेव्हा तेव्हा गावच्या मातीत जावून खेळावे, बागडावे असे वाटते.तशी सर्वांना गावाकडची एक वेगळीच ओढ असते. असं वाटतं की, प्रत्येक माणसाला गाव हे हवंहवंस वाटतं. गाव म्हटलं की माणूस ताजा होतो, त्याला गावाकडील आठवणीत रमून जायला आवडतं. पण या धकाधकीच्या जीवनात माणूस फार वेगवान झाला आहे. दिवसाचे चोवीस ताससुध्दा कमी पडायला लागलेत. यात गावाकडून शहरात आलेली माणसं मिसळून जातात. यामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. पण शहर आणि गाव यामधील नातं वेगळे असल्याने अंगात ताकद असेपर्यंत कमवून आयुष्याची पुंजी जमा करून उतारवयात गावी जावून निवांत राहायचं असं प्रत्येकजण मनात स्वप्न पाहत असतो किंवा ठरविले जाते.

- Advertisement -

त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही करीत असतो. मला मात्र गावातच राहायला आवडेल. वळणावळणाच्या वाटा,कौलारू घरे,शेतीवाडी, झाडेझुडपे ,दगडधोंडे, आडविहिरी यामध्ये आयुष्य वेचायला घालवायला मनापासून आवडेल, पण नोकरीनिमित्त ते शक्य नाही याची खंत मनाला कायमच सलत असते. आपल्या गावापोटी असणारे प्रेम,भावना मनात साठवून नेहमी जगत असतो. कधीकधी गावाविषयी काही ऐकायला मिळाले तर भारावून जातो. वर्षातून एकदा तरी गावाकडे जावे असे वाटते. होळी आणि गणपतीला तर गेल्याशिवाय करमतच नाही. कुणाच्या लग्नाला जाणेयेणे होते. आईवडिलांसाठी तर जावेच लागते. खरं तर त्यांच्यामुळेच गाव टिकून आहे, नाही तर गाव हे गाव राहिलेच नसते. गावात वेगळीच शांतता मिळते. तिथे दोन दिवस जरी घालविले तरी प्रचंड आराम मिळतो. कितीतरी दिवसाचा थकवा निघून जातो. पण हल्ली गावात “गावपण” दिसत नाही. गावागावात,वाडीवाडीत भावकी.

गावातील एकूणच चित्र बदलायला हवं, गावाच्या एकात्मतेला तडा न जाता एकसंध ठेवले पाहिजे. यापूर्वी गावात एकीची भावना होती. अखंड गाव एका छताखाली,एकोप्याने राहायचा,पण हल्ली गावाला राजकारणाची कीड लागली.
“माझं गाव माझं नाव” हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने मनी रुजवले पाहिजे. माझ्या गावाशी असलेले नाते टिकले पाहिजे. नाही तर आधुनिकीकरणाच्या लाटेत गाव वाहून जाईल. पण तसे न होता खरे गावपण टिकले तरच माझ्या मनातील आपले गाव जोपासले जाईल.


-भावेश लोंढे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -