घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसावध ऐका... पावसाच्या हाका

सावध ऐका… पावसाच्या हाका

Subscribe

कोरोनासारख्या अदृश्य विषाणूने महाराष्ट्रासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनलॉक करत सुरू झालेला महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये अडकला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र टाळेबंदी तसला तरीही कोरोना रुग्णांची मध्यंतरी वाढलेली बेसुमार संख्या ही कोणाच्याही छातीत धडकी भरवणारी आहे. त्यामानाने या आठवड्याभरात जरी टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्राला दिसत असले तरीही तोंडावर आला पावसाळा हा महाराष्ट्राच्या चिंते अधिक भर घालणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ठ्या संपन्न राज्याच्या अर्थव्यवस्थेची पूर्णतः विस्कटलेली घडी, राज्यभर कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक, त्याचबरोबर आता लवकर म्युकरमायकोसिससारख्या नव्या संसर्गजन्य रोगाचा वाढू लागलेला प्रादुर्भाव, व्हेंटिलेटरवर असलेली राज्याची आरोग्यव्यवस्था, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून पुन्हा सुरु केलेला कडक लॉकडाऊन, तौत्केसारख्या चक्रीवादळाने कोकणासह मुंबई ठाण्याची उडवलेली दाणादाण आणि याबरोबरच जून महिन्यापासून येऊ घातलेला पावसाळा त्यामुळे पुढचे चार-पाच महिने तरी राज्याच्या जनतेसाठी फारसे काही ही आशादायक चित्र नाही असेच नाइलाजाने म्हणावे लागेल मात्र तरीही संसार चालवल्या बरोबरच जीव वाचवणे हे देखील तेवढेच आणि अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे राज्यातील जनतेने सरकारी उपाययोजनांचा अधिकाधिक फायदा घेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला कसे याकाळात सावरता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोरोनासारख्या अदृश्य विषाणूने महाराष्ट्रासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनलॉक करत सुरू झालेला महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये अडकला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र टाळेबंदी तसला तरीही कोरोना रुग्णांची मध्यंतरी वाढलेली बेसुमार संख्या ही कोणाच्याही छातीत धडकी भरवणारी आहे. त्यामानाने या आठवड्याभरात जरी टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्राला दिसत असले तरीही तोंडावर आला पावसाळा हा महाराष्ट्राच्या चिंते अधिक भर घालणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

एरवी ही सर्वसाधारणपणे पावसाळा म्हटला की आपल्यासमोर बंद पडलेल्या लोकल गाड्या जलमय झालेले रस्ते त्यात अडकून पडलेली वाहतूक व्यवस्था नालेसफाईचा बोजवारा आणि या सार्‍याचा परिणाम म्हणजे साथीच्या रोगांचा याकाळात वाढलेला परिणाम हा राज्यातील जनतेवर नेहमीच मोठा परिणाम करत आलेला आहे. एरवीही पावसाळ्यामध्ये ताप सर्दी खोकला पडसे मलेरिया, टायफॉइड ,कावीळ लेप्टोस्पायरोसिस ,स्वाईन फ्लू यासारखे जीवघेणे आजार मोठ्या प्रमाणावर बळावलेले असतात. त्यात सलग दुसर्‍या वर्षी आता पुराना सारख्या महाभयानक विषाणूची या साथीच्या रोगांना जोड मिळाली आहे. त्यामुळे केवळ मुंबईकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेसाठी येणारा पावसाळा ही त्यांच्या आरोग्याची तसेच कौटुंबिक आर्थिक सामाजिक परिस्थितीची अग्निपरीक्षाच पाहणारा ठरला तर त्यात नवल वाटू नये.

यातही सर्वात लक्ष द्यावे लागणार आहे ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शेतकरी वर्गावर कारण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही खर्‍या अर्थाने शेतात राबणार्‍या बळीराजावर अवलंबून असते. आणि बळीराजासाठी तसेच मोठमोठ्या शहरांच्या महानगरांच्या तहान भागवणार्‍या तलावांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडावा यासाठी सर्वच जण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. शेतकर्‍यांचे संपूर्ण आर्थिक गणितच लहरी निसर्गाच्या या वरुण कृपेवर अवलंबून असते. गणित दीड वर्ष महाराष्ट्राची नाळ असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्यातही विशेषता शेती व्यवस्था ही कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी दोन हात करत सर्वशक्तीनिशी लढा देताना पाहायला मिळत आहे. टाळेबंदीमध्ये मुंबईसारखे जगातील अव्वल दर्जाचे शहर थांबलेले पाहावयास मिळाले मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा बंद झालेली पाहावयास मिळाली. संपूर्ण दळणवळण यंत्रणा शहरे ही टाळेबंदीमध्ये अक्षरश: ठप्प झाली होती. मात्र त्याही काळामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव मात्र आपल्या शेतामध्ये जनतेच्या मुखामध्ये दोन घास समाधानाची जावेत यासाठी राबराब राबत होता. त्यामुळेच या अन्नदात्याचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत.

- Advertisement -

मात्र दोन-तीन दिवसांपूर्वीच आलेल्या चक्रीवादळाने राज्यातील विशेषता कोकणातील शेतकर्‍यांची अक्षरशा दाणादाण उडवली. या चक्रीवादळाचा कोकण पट्टीला जबरदस्त तडाखा बसला सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये अक्षरशा हाहाकार माजला. शेतकर्‍यांच्या घरांची छपरे उडून गेली जनावरांचे गोठे कोसळले असंख्य जनावरांचे या चक्रीवादळाचा जीव गेले कोकणचे वैभव असणारी आंबा काजू फणस यासारख्या फळांच्या शेकडो बागा अक्षरशा उध्वस्त झाल्या कोकण पट्टीतील तब्बल चौदाशे हेक्टर बागायती शेती या चक्रीवादळाने उध्वस्त करून टाकली. तब्बल पाच हजाराहून अधिक कौलारू घरे यामध्ये उखडली गेली. कोकणातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयांचे ही चक्रीवादळात अतोनात नुकसान झाले. वीजांचे खांब उन्मळून पडले, वीज वाहक तारा तुटून पडल्या, अनेक ठिकाणी ट्रांसफार्मर पूर्णता नादुरुस्त झाले त्यामुळे कोकणातील शेकडो गावे गेल्या चार-पाच दिवसांपासून पूर्णतः अंधारात आहेत. मोबाईल नेटवर्कची कनेक्टिविटी देखील खंडित झालेली आहे. त्यामुळे ना मोबाईलला नेटवर्क ना शेत पंपासाठी वीज पुरवठा घरांमध्ये कोणत्याही कामासाठी वीजपुरवठा त्यातच घराचे आणि गोट्यांचे बागांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे कोकणातील शेतकरी निसर्गाच्या चक्रीवादळात पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकणातील चक्रीवादळग्रस्त जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवस कोकणच्या दौर्‍यावर होते. नैसर्गिक संकट म्हटले की राजकीय नेत्यांचे दौरे हे आलेच. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी दोघांनी मिळून चक्रीवादळामुळे ज्यांची घरे फळबागा उध्वस्त झाले आहेत अशा कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून भरघोस मदत मिळवून देण्याकरता पुढे आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला 1 हजार कोटींची मदत दिली आहे. महाराष्ट्रालाही मोठ्या मदतीची आपेक्षा आहे असे मुख्यमत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. राज्य म्हणून जे काही शक्य आहे ती मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. समुद्र किनार्‍यावरील वीज वाहक तारांना भूमिगत करण्याच्या बाबतीत विचार करण्यात येत आहे. बंदरचे प्रश्न असतील अशा कायमस्वरुपी गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला हवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. कोकणातील कोळी बांधव, बोटींचे नुकसान झाले आहे. अशा सर्वांना मदत केली जाईल.

पंचनामे आल्यावर मदतीची घोषणा करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त मदतीशिवाय वंचित राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोकणवासीयांना दिले आहे. मदतीची घोषणा करण्यात येईल परंतु ही केलेली मदत कायमस्वरुपी ठेवण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौर्‍याचा जर निष्कर्ष काढायचा झाल्यास तो केंद्र सरकारच्या मदतीवर राज्य सरकारची मदत अवलंबुन सल्याचे या दौर्यातून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ज्याप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रत्येक वेळेस केंद्र सरकार पुढे हात पसरणे हे काही योग्य नव्हे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाने शिवसेनेला बरेच काही दिले आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे जेव्हा कोकण संकटात सापडतो तेव्हा मात्र केंद्र सरकारच्या मदतीकडे बोट दाखवायचे हा दुटप्पीपणा काही योग्य नव्हे. मुख्यमंत्र्यांचे कोकणावर खरेच जर मनापासून प्रेम असेल तर त्यांनी आधी राज्य सरकार यांच्या मार्फत ओपन वासियांना आज ठोस मदत जाहीर करणे गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार तर्फे मदतीची घोषणा केली आहे ती मोघम स्वरूपाची आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते की, शिवसेनेला कोकणाने भरपूर दिले परंतु कोकणाला द्यायची वेळ आली तर शिवसेनेचा हात आखडता येतो यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की तुम्ही काळजी करु नका कोकण आणि शिवसेनेचे नाते घट्ट आहे. या नात्यामध्ये कोणीही काही केले तरी दुरावा येणार नाही. शिवसेनेला कोकणवासियांनी यापुढेही आणखीन भरभरून द्यावे याविषयी काही वाद नाही मात्र आत्ता कोकण संकटात आहे तेव्हा कोकणातील चक्रीवादळ आतील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तात्काळ मदत करावी एवढीच अपेक्षा यावेळी कोकणवासीय व्यक्त करत आहेत. त्याच बरोबर सुरू होणारा पावसाळा आणि साथीच्या रोगांचे आजार हे बरोबर येत असतात त्यामुळे राज्य सरकारने पावसाळ्यातील या साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आधीपासूनच मोठ्याप्रमाणावर पूर्वतयारी करणे गरजेचे आहे अन्यथा ऐन पावसाळ्यात एकीकडे राज्यातील बळीराजाला आभाळातून ऊन-पाऊस झोडून काढेल तर दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता ही त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -