भारतात जन्मलेले ब्रिटिश डॉक्टर रोनाल्ड रॉस

पुढे १८९४ मध्ये त्यांनी डासांमुळे मलेरियाचा प्रसार कसा होतो याबाबत संशोधन सुरू केले. वेळोवेळी ते खेड्यांमध्ये जाऊन डास गोळा करून आणत असत, याकामी किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञाची त्यांना मदत झाली.

रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगिरीसाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म 13 मे 1857 रोजी भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी रोनाल्ड यांना इंग्लंडला त्यांच्या काका काकूंकडे पाठविण्यात आले.

१८५७ मध्ये त्यांनी लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू मेडिकल हॉस्पिटल व कॉलेज येथे प्रवेश घेतला. पुढील वर्षी इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथील परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नंतर ते शिप सर्जन म्हणून अटलांटिक महासागरात फिरणार्‍या जहाजावर रुजू झाले. त्याच वेळी सोसायटी ऑफ अँपोथीकॅरीसचे लायसन्स त्यांना मिळाले आणि रोनाल्ड भारतात वैद्यकीय सेवेत रुजू झाले.

पुढे १८९४ मध्ये त्यांनी डासांमुळे मलेरियाचा प्रसार कसा होतो याबाबत संशोधन सुरू केले. वेळोवेळी ते खेड्यांमध्ये जाऊन डास गोळा करून आणत असत, याकामी किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञाची त्यांना मदत झाली. १८८३ मध्ये रॉस यांना मलेरिया झाला आणि त्यांनी बारकाईने भिंतीवरील एका विचित्र दिसणार्‍या डासाचे निरीक्षण केले. या प्रकारच्या डासाला त्यांनी ठिपकेदार पंख असलेला डास असे म्हटले. ४ सप्टेंबर १८९७ रोजी त्यांनी आपली निरीक्षणे संशोधन पत्रिकेत नोंदवली.

पुढे त्यांना असे आढळून आले की, करड्या रंगाच्या डासांनी चावल्यामुळे कावळा, कबुतर, चिमणी अशा पक्ष्यांना रक्तातून मलेरिया होतो. तर तपकिरी रंगाच्या ठिपकेदार पंख असलेल्या डासामुळे माणसात मलेरिया होतो, मात्र पक्ष्यांना होत नाही. अशा रितीने डास हा परजीवींचा वाहक असून त्याच्या चाव्यातून लाळेवाटे पक्षी/मानवी रक्तात गेलेल्या जंतूंमुळे मलेरिया होतो हे त्यांनी सिद्ध केले. रॉस यांना या मलेरियावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. अशा या थोर संशोधकाचे 16 सप्टेंबर 1932 रोजी निधन झाले.