घरफिचर्समायमहानगर ब्लॉगश्रेष्ठ गणितज्ज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल

श्रेष्ठ गणितज्ज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल

Subscribe

१८५५ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजाचे फेलो झाले. पुढील वर्षी बर्डींन येथील मारिशाल कॉलेजात भौतिक विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या पत्नीने त्यांना वर्णदृष्टी व वायूची श्यानता (दाटपणा) यांवरील प्रयोगशालीय संशोधनात पुष्कळ मदत केली.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल हे गणितज्ज्ञ भौतिकतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 13 जून 1831 रोजी एडिंबरो येथे झाला. १८४७ मध्ये ते एडिंबरो विद्यापीठात दाखल झाले. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी विशिष्ट अंडाकृती वक्र काढण्याची एक रीत शोधून काढली व त्यावरील त्यांचा शोधनिबंध एडिंबरोच्या रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केला. १८५० साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश केला आणि १८५४ मध्ये ते द्वितीय रँगलर म्हणून उत्तीर्ण झाले व पहिल्या स्मिथ परितोषिकाचे ई. जे. राउथ यांच्यासह मानकरी ठरले.

१८५५ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजाचे फेलो झाले. पुढील वर्षी बर्डींन येथील मारिशाल कॉलेजात भौतिक विज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या पत्नीने त्यांना वर्णदृष्टी व वायूची श्यानता (दाटपणा) यांवरील प्रयोगशालीय संशोधनात पुष्कळ मदत केली. १८६० मध्ये ते लंडन येथील किंग्ज कॉलेजात ज्योतिषशास्त्र व भौतिकीचे प्राध्यापक झाले. पुढे १८६५ मध्ये त्यांनी विद्युत व चुंबकत्वावरील आपला प्रख्यात विवेचक ग्रंथ ट्रिटाइज ऑन इलक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम लिहिला व तो १८७३ मध्ये प्रसिद्ध झाला. १८७१ मध्ये केंब्रिज येथे प्रायोगिक भौतिकीचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथेच त्यांनी कॅव्हेंडिश प्रयोगशाळेची योजना तयार करून ती उभारण्याचे आणि तिचा विकास करण्याचे महत्कार्य केले. १८७४ पासून मृत्यूपावेतो त्यांनी या प्रयोगशाळेचे संचालक म्हणून काम केले.

- Advertisement -

मॅक्सवेल यांनी मायकेल फॅरडे यांच्या भौतिकीय संकल्पनांना गणितीय स्वरूप दिले व त्यामुळे त्या मान्यता पावण्यास मदत झाली. मॅक्सवेल यांनी विद्युत व चुंबकीय आविष्कारांसंबंधीच्या ‘दूरवर्ती क्रिये’ च्या (अवकाशातील एकमेकांपासून दूर अंतरावर असणार्‍या वस्तूंमध्ये मध्यस्थ यंत्रणेशिवाय होणार्‍या परस्परक्रियेच्या) संकल्पनेला विरोध करून हे आविष्कार माध्यमातील क्रियेद्वारे घडून येतात, या फॅरडे यांच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा केला. अशा या श्रेष्ठ गणितज्ज्ञाचे 5 नोव्हेंबर 1879 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -