कोरोना शरीरात नक्की काय धुडगूस घालतो? वाचा!

corona virus

कोरोना व्हायरस काय करतो? न्युमोनिया? नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो. हे कदाचित चुकत असावे. SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो. त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात. त्यामुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही. शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.

…मग फुफ्फुसांना इजा होते…!

उपचारांनंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते. रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफ्फुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिअॅक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.

कुठल्याही जंतुसंसर्गात, जर फुफ्फुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुरवातीला तो डावीकडे किंवा उजवीकडे; एकाच बाजूस आणि असमान असतो. कोरोनामध्ये ऑक्सिजन आणि लोहकणाच्या लढाईत फुफ्फुसांचे कुरुक्षेत्र झाल्याने प्रत्येक वेळी दोन्ही फुफुसांना मोठ्या प्रमाणात इजा होते, जी ‘सी. टी.’ स्कॅनवर दिसते. याचं वर्णन Bilateral Ground-glass Appearence असे केले जाते. त्याला दुसरी उपमा नसल्याने त्याला Bilateral न्यूमोनिया समजून उपचार दिले जातात.

आता हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे पुढील परिणाम बघू…

ऑक्सिजन कमी पडतो आहे हे जाणवून शरीर हिमोग्लोबिन तयार करण्याची गती वाढवते. (म्हणून कोरोना बाधितांमध्ये हिमोग्लोबिन जास्त दिसते) रक्तातील सुटे लोहकण आणि त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचा पुन्हा वापर किंवा निचरा करण्यासाठी शरीरातील ferritin हे द्रव्य वाढते. (कोरोनाच्या पेशन्टमध्ये म्हणूनच रक्तातील चाचण्यांमध्ये ferritin खूप जास्त प्रमाणात दिसून येते). मलेरियामध्ये वापरले जाणारे क्लोरोक्वीन किंवा सध्या चर्चेत असलेले हायड्रॉक्सि-क्लोरोक्वीन ही औषधे मलेरियाच्या जंतूंपासून हिमोग्लोबिनला वाचवण्याचे काम करतात. तसेच ते कोरोना व्हायरसपासून हिमोग्लोबिनला वाचवित असावेत.

कोरोनाचे विषाणू हिमोग्लोबिनपासून वेगळे कसे करायचे?

अजूनही कोरोनाचे विषाणू हिमोग्लोबिनपासून वेगळे कसे करायचे हे आपल्याला ठाऊक नाही. (पेशन्टला अगदी व्हेंटिलेटरमधून जरी ऑक्सिजन पुरवला तरी तो ऑक्सिजन पुढे न्यायला पुरेसे हिमोग्लोबिन नसेल तर त्या ऑक्सिजनमुळे फुफ्फुसांनाच जास्त इजा होऊ शकते. आज आपण जे व्हेंटिलेटर वापरण्याचे नियम (protocol) पळतोय ते न्यूमोनिया किंवा ‘ए.आर.डी.एस.’ साठी बनवलेले असल्याने ते कोरोना बाधितांसाठी फायदेशीर ठरत नसावेत असा संशय काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यावर अजून संशोधन होईलच. आजतरी कोरोनाने संपूर्ण जगाला एक मोठे कोडे घातले आहे हे नक्की. गोष्ट इथेच संपत नाही. वाढत्या लोहकणांमुळे लिव्हरवर ताण पडतो आणि तब्येत फार झपाट्याने बिघडू लागते. हिमोग्लोबिनची परिणामकारकता कमी होत जाणे, रक्तातील लोहकण वाढत जाणे आणि महत्वाच्या अवयवांचा ऑक्सिजन पुरवठा कमी होणे यामुळे फुफ्फुसांसोबत इतर अवयव निकामी होत जातात हे आपण बघितले.

आता आपण यासाठी आहारात काय बदल करू शकतो हे पाहूया…

शरीराची कोरोनाविरोधी शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या यांचा वापर आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात घेणे हे उपाय आपण करतोच आहोत. त्या बरोबरीने खालील बदल करायचे आहेत.

  • लोहकणांपासून सुरक्षा
    १) लिंबू फ्रीझरमध्ये ठेऊन ते घट्ट झाले की ते सालीसकट किसून घेणे. त्यात मीठ टाकून त्याचे सरबत घेणे. माणशी एक लिंबू तरी सालीसकट पोटात घेणे.
    २) हळकुंड मिळाल्यास त्याची पावडर करून किंवा मग तयार हळद घेऊन दिवसभरात निदान एक चमचा हळद गरम पाण्यातून पोटात घेणे.
    ३) आपला साधा चहा, आले घातलेला चहा हाही उपयोगी पडतो.

या तीन गोष्टी अजूनही सहज मिळतात. यातील काही औषधी द्रव्यांमुळे सुटे लोहकण शरीराबाहेर टाकायला मदत होते. तसेच ऑक्सिजनमुळे होणारी इजा होण्यापासून सुरक्षा मिळते. या सोबत काही अन्न-औषधे (Nutraceutical) उपयोगी पडू शकतील. उदा. पिकनोजेनॉल, कुटकी, कुरकुमिन इत्यादी.

  • महत्वाच्या अवयवांना कमी ऑक्सिजनमध्ये काम चालू ठेवण्यास मदत करणे. बीटरूट, पालक आणि कोबी यांचा रस (स्मूदी), लसणीचा मुबलक वापर, भेंडीच्या, भोपळ्याच्या किंवा कलिंगडाच्या बिया दोन चमचे दिवसभरात पोटात घेणे. या सोबत काही अन्न-औषधे (Nutraceutical) उपयोगी पडू शकतील उदा. arginine, CoQ 10

कोरोना काय करतो याची जी माहिती समोर येत आहे त्या माहितीच्या आधारे ‘विस्डम क्लिनिक’ तर्फे वरील आहार सुचवले आहेत. यात कोरोना ज्या जागी वार करतो तिथे सुरक्षाकवच देण्याचा प्रयत्न आहे. फळे खा, भाज्या खा, प्रोटीन्स घ्या. या ज्या सामान्य सूचना असतात त्यांना पर्याय म्हणून नाही तर पूरक म्हणून या सूचना आहेत.

– डॉ. नितीन पाटणकर एम.डी.


लेखक ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टर आहेत.