Blog: कोरोना पॉझिटिव्हच्या गराड्यात राहूनही रिपोर्ट निगेटिव्ह; पोलिसदादा वापरतो ‘ही’ आयडीया

75 police personnel found corona positive in the state
Coronavirus: गेल्या २४ तासांत ७५ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण!
नमस्कार मित्रानो मी राहुल ज्ञानेश्वर भिसे पोलीस शिपाई क्रमांक 040572 नेमणूक सर जेजे मार्ग पोलीस ठाणे. कोरोना विषयी माझा अनुभव शेअर करत आहे. मित्रांनो जगामध्ये कोरोनाने थैमान घातले. त्यात भारतामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. मी सध्या सर जेजे मार्ग पोलीस ठाणे येथे कार्यरत असून माझ्या पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, अंमलदार यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मी तीन तारखेला माझी स्वतःची स्वॅब घेऊन टेस्ट केली असता माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी जे पॉझिटिव पेशंट होते त्यांच्या संपर्कामध्ये आलो होतो, परंतु मी काही महत्वाच्या नियमांचे पालन केल्यामुळे माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
माझा अनुभव त्यामुळंच आपल्या सर्वांसमोर शेअर करत आहे. मी काही डॉक्टर नाही परंतु माझा अनुभव मी सर्वांना शेअर करतोय. महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी सोशल डिस्टन्ससिंग पाळावे कोणीही एकमेकांजवळ बसू नये. तोंडाला मास्क, हातामध्ये हॅन्ड ग्लोज वापरा, डोळ्याला गाॅगल्स लावा, जेवताना एकमेकांजवळ बसून जेवू नका, लांब लांब बसा, एकमेकांना कोणालाही जेवण शेअर करू नका, स्वतःचे जेवण स्वतः करा, हात स्वच्छ ठेवा वारंवार हात साबणाने धुवा किंवा हॅन्ड सनी टायझर वापरा. तसेच डोळ्याला, तोंडाला, नाकाला किंवा चेहऱ्याला हाताचा स्पर्श करू नका, कोठेही कोणत्याही वस्तूला हात लावू नका, दररोज सकाळी उठल्यानंतर प्रथम वीस मिनिटे प्राणायाम योगासने करावे आणि त्यानंतर कोमट पाण्यामध्ये  हळद, मीठ आणि तुरटी टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात. कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्यावे.
याकाळात तुम्ही चव्यनप्राश घेतलंत तर अतिउत्तम. सकाळी चार बदाम, दोन उकडलेली अंडी आणि पोट भरून नाश्ता करणे सोयीस्कर आहे. चहा पित असाल तर गुळाचा चहा बनवून त्यामध्ये आले, दालचिनी, लवंगा, काळीमिरी, ओवा यांची पूड टाकून जो काढा तयार होतो त्या काढ्याचे सेवन करावे. या काढ्याचे सेवन दर दोन तासांनी करावे. आम्हाला ज्या कॅल्शियम आणि सी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत. त्या दररोज दुपारी जेवणानंतर मी घेतो. कमीत कमी आठ तास झोपणे गरजेचे आहे. तसेच हायड्रोक्सो क्लोरोक्वीन २०० एमजी गोळी हप्त्यातून एकदा म्हणजे जर सोमवारी गोळी घेतली तर पुढच्या सोमवारीच घेणे. तसेच ऍलोपॅथिक मधल्या ज्या इम्युनिटी पॉवरच्या गोळ्या आहेत, त्याचे डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
शक्यतो पाणी पिताना कोमट पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी कोमट पाणी दीड लिटर प्यावे, जास्तीत जास्त फळे खावीत. त्यामध्ये ऑरेंज जास्त खावे. तसेच संध्याकाळी झोपताना वरील प्रमाणे गुळण्या करून दूध किंवा कोमट पाणी यामध्ये हळद टाकून घ्यावी. मित्रांनो मी माझ्या पोलिस ठाण्याचे पॉझिटीव्ह अधिकारी आणि अंमलदार याच्या संपर्कात येऊनही माझी टेस्ट निगेटिव्ह आली. कारण माझा वरीलप्रमाणे दिनक्रम चालू आहे. परंतु परत माझा पुन्हा पॉझिटीव्ह लोकांशी संपर्क आल्यामुळे मला पुन्हा टेस्ट करावी लागेल. मित्रांनो हा काही खूप घाबरण्या सारखा आजार नाही. नियमांचे पालन केले तर हा व्हायरस बाधणारच नाही आणि न कळतपणे झाला तर तो लगेचच बराही होतो घाबरू नका…

 


लेखक राहुल ज्ञानेश्वर भिसे हे सर जेजे मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.