घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसावधान, कोरोना पुन्हा येतोय !

सावधान, कोरोना पुन्हा येतोय !

Subscribe

हनुमानाचे जन्मस्थळ कोणते यावर दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत राहतील. जन्मस्थळाविषयी निश्चित निर्णायक भूमिकेपर्यंत पोहचण्यासाठी नाशकात शास्त्रार्थ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेत शास्त्राचे अभ्यासक व रामजन्म शिलान्यास सोहळ्याचे पुरोहित गंगाधर पाठक यांनी जणू पंच म्हणून भूमिका वठवली. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय तरी अंतिम मानायला हवा.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनारूपी राक्षस पावसाळ्याच्या आधीच डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे राज्यात अजून जरी मान्सूनचे आगमन झाले नसले तरी कोरोनाचे आगमन मात्र सुरू झाले आहे. अर्थात, दरवर्षी पावसाळा आला की त्याच्या पाठीशी विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार येतच असतात. काही वर्षांपूर्वी आणि अजूनदेखील कोरोनाच्या आधी राज्यामध्ये स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला होता. दोन वर्षांपूर्वी कोरोना आला आणि बाकीच्या आजारांना वैद्यकीय क्षेत्रात जाऊन पूर्णविराम मिळाला होता. त्यामुळेच पावसाळा येण्याच्या आधीपासून राज्यातील आरोग्य यंत्रणा राज्य सरकार आणि केंद्र सरकारदेखील कोरोनाच्या संकटामुळे धास्तावले आहेत.

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास गेल्या दीड महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होंत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे आधी सांगत होते, त्यानुसार राज्यातील कोरोना अजूनही पूर्णतः संपलेला नाही. राज्यातील आणि देशातील लोकांनाही कोरोना म्हटले की हृदयाबरोबरच डोक्यातही ही टाळेबंदीची तिडीक जाते. कोरोनाच्या काळामध्ये काही बंदीच्या नावाखाली जे काही सोसले आहे आहे ते सहन करण्यापलीकडे आहे. त्यामुळेच ताप, सर्दी, खोकला, फ्लू यासारखे पावसाळ्यातले नियमित आजार परवडले, मात्र कोरोना नको अशी स्थिती राज्यातील जनतेची आहे. साधारणपणे दिवाळीनंतर राज्यातील कोरोना स्थिती हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली होती आणि मार्चपर्यंत बर्‍याच शहरांमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यंत अल्प झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये तर कोरोनाचा एकही रुग्ण या काळात आढळून आला नव्हता. मात्र पुन्हा एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने हळूहळू डोके वर काढले आणि आता तर पाऊस डोक्यावर असताना राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र पुन्हा कोरोनाच्या विळख्यात जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने आणि टास्क फोर्सनेदेखील वाढत्या रुग्ण संख्येची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचबरोबर त्यांनी गेल्या दीड महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सात पटीने वाढ झाली असल्याकडेही लक्ष वेधले आहे. त्यामुळे राज्याला आणि राज्यातील विविध महापालिकांना कोरोनाच्या संभाव्य संकटाशी पुन्हा लढा द्यावा लागण्याची दाट शक्यता आहे.

कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. 16 एप्रिल 2022 रोजी राज्यात सर्वात कमी 626 सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या 4500 वर गेली आहे असे सांगून डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर 6 टक्के असून राज्याचादेखील वाढून 3 टक्के झाला आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड प्रतिबंधक व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे. कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.लवकरच शाळा सुरू होतील. शाळांबाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनीही मते मांडली. त्यामुळे राज्यातील जनतेने ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा. बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा. ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी. आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी. ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणार्‍या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे, अशा विविध सूचनांचा भडिमार जनतेवर राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र असे असले तरीदेखील राज्य सरकारने एकदम जनतेच्या मनात भीती निर्माण होईल अशी विधाने करणे टाळले पाहिजे. कोरोना हा नक्कीच घातक आहे, मात्र आता त्याचे स्वरूप पूर्वी इतके गंभीर राहिलेले नाही आणि त्यामुळेच जनतादेखील कोरोनाला पूर्वीइतके गांभीर्याने घेत नाही हेदेखील आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही लक्षात आले असेल. त्यामुळे कोरोनाची भीती दाखवत राज्यातील जनतेला जर पुन्हा एकदा निर्बंध आणि टाळेबंदीच्या अंधार्‍या खाईत लोटण्याचा विचार जर कोणी करत असेल तर तो मात्र आता राज्यातील जनता सहन करण्याच्या पलीकडे गेली आहे, एवढे जरी राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले तरी या निमित्ताने खूप झाले असेच म्हणता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -