घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचॅनेल्सच्या सूडाचं अर्थकारण!

चॅनेल्सच्या सूडाचं अर्थकारण!

Subscribe

भारतातील जाहिरातींची उलाढाल सुमारे 30 हजार कोटी रुपयांची आहे असं म्हटलं जातं. या उलाढालीतला सगळ्यात मोठा भाग आपल्या हाताला लागावा म्हणून टीव्ही चॅनेल्स जीव जाळत असतात. आता पोलिसांनी भांडाफोड केलेल्या टीआरपी घोटाळ्यामध्ये दोन मनोरंजन वाहिन्यांचे अधिकारी दोषी सापडले आहेत. याच प्रकरणात ‘सबसे तेज’ असलेल्या चॅनेलला याआधी दोन वेळा दंडही झालेला आहे. इतकंच नव्हे तर टीव्ही 9 वाहिनीने पुण्यात मुख्यालय असलेल्या एका मराठी चॅनेलची लेखी तक्रार टीआरपी घोटाळ्याच्या बाबतीत केली आहे. मात्र परमवीर सिंग आणि त्यांचे तडफदार पोलीस अधिकारी यांनी या पुणेरी बडा राजकीय वरदहस्त लाभलेल्या कंपनीच्या बाबतीत कोणतीही कारवाई केलेली नाही. परमवीर सिंग यांनी फक्त हा घोटाळा आता रिपब्लिकच्या रागामुळे कायद्याच्या भाषेत सांगायचं तर तो ‘रेकॉर्ड’वर आणला आहे.

मटका हा संसाराला लागलेला चटका आहे, असं वामनराव पै यांनी म्हटलं आहे. पण हाच मटका खेळणार्‍यांचा जीव सकाळी अकरा वाजल्यापासूनच कासावीस व्हायला सुरुवात होते. कारण दुपारी बारा ते एकच्या सुमारास यातला नेमका आकडा लागणार असतो. मटका चालवणार्‍याच्या हातात कित्येकांचं नशीब अवलंबून असतं. याचं शास्त्र- तंत्र एक गौडबंगालच आहे. अगदी तसंच टीव्ही चॅनेलच्या रेटिंगचंही आहे. त्यामुळे काही विशेष गुणवत्ता नसूनही संपादक झालेल्या अनेकांचा रक्तदाब दर गुरुवारी या रेटिंगच्या भितीनं वाढलेला असतो.वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही आणि आता डिजिटल या चारही माध्यमांचा विचार केला तर सगळ्यात महागडं माध्यम म्हणून आपल्याला टीव्ही चॅनेलचा उल्लेख करावा लागेल. या महागड्या माध्यमाचा खेळ मुख्यतः जाहिरातींवरच अवलंबून असतो.

या जाहिराती मिळवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग असतो तो म्हणजे चॅनेलचं साप्ताहिक रेटिंग. नव्वदच्या दशकात जेव्हा आपल्याकडे वाहिन्यांचं जाळं पसरलं त्यावेळेला संपूर्ण देशभरात काही हजार टीआरपीचे मीटर्स लावलेले होते. आताही ती संख्या वाढूनही साधारण 40-42 हजार इतकीच आहे. हे रेटिंग मीटर ज्यांच्या घरात लावलेले आहेत त्या घरातली माणसं काय पाहतात यावर हा सगळा खेळ अवलंबून असल्याचं आपण सामान्यपणे म्हणू शकतो. मग या माणसांनी काय पहावं यासाठी टेलिव्हिजन चॅनेल्स धावपळ-धडपड करत असतात. हा सगळा मामला अनेक वर्षे झाकलेल्या मुठीसारखा होता. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि त्याचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांना जी काही ठोकायला सुरुवात केली ते भयंकर होतं. सुशांतसिंह प्रकरणात अर्णब यांनी एक भूमिका घेतली. आणि त्यानंतर टीआरपी घोटाळ्याचा जन्म झाला.

- Advertisement -

भारतातील जाहिरातींची उलाढाल सुमारे 30 हजार कोटी रुपयांची आहे असं म्हटलं जातं. या उलाढालीतला सगळ्यात मोठा भाग आपल्या हाताला लागावा म्हणून टीव्ही चॅनेल्स जीव जाळत असतात. आता पोलिसांनी भांडाफोड केलेल्या टीआरपी घोटाळ्यामध्ये दोन मनोरंजन वाहिन्यांचे अधिकारी दोषी सापडले आहेत. बॉक्स मराठी आणि फक्त मराठी या वाहिन्यांनी घोटाळा केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि तक्रारही दाखल झाली. मनोरंजन वाहिन्यांवर आरोप असला तरी बोट मात्र रिपब्लिककडे दाखवण्यात येत आहे. याच प्रकरणात ‘सबसे तेज’ असलेल्या चॅनेलला याआधी दोन वेळा दंडही झालेला आहे. इतकंच नव्हे तर टीव्ही 9 वाहिनीने पुण्यात मुख्यालय असलेल्या एका मराठी चॅनेलची लेखी तक्रार टीआरपी घोटाळ्याच्या बाबतीत केली आहे. मात्र परमवीर सिंग आणि त्यांचे तडफदार पोलीस अधिकारी यांनी या पुणेरी बडा राजकीय वरदहस्त लाभलेल्या कंपनीच्या बाबतीत कोणतीही कारवाई केलेली नाही. हा घोटाळा वाटतो तितका सोपा नाही. परमवीर सिंग यांनी फक्त हा घोटाळा आता रिपब्लिकच्या रागामुळे कायद्याच्या भाषेत सांगायचं तर तो ‘रेकॉर्ड’वर आणला आहे. प्रत्यक्षात याच घोटाळ्याने देशाची संसदही स्तब्ध झाल्याच्या घटना याआधी घडलेल्या आहेत.

2004 ते 2008 या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री असणार्‍या प्रियरंजन दास मुन्शी यांनी ते टीआरपी घोटाळ्यावर उपायोजना करण्याच्या प्रयत्नात असताना आपल्याला धमक्या आल्याचं देशाच्या संसदेमध्येच सांगितलं आहे. या सगळ्या घोटाळ्यावर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय लवादासमोर जाऊन आपली बाजू मांडणार्‍या डॉ. प्रणव रॉय यांनाही याबाबत अपयश आलेलं आहे. डॉ. प्रणय रॉय हा भारतीय वृत्त क्षेत्राचा एक सुसंस्कृत आणि कसदार चेहरा म्हणून आपल्याला परिचित आहे. मूल्यवर्धित बातमीदारी करणे हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यानुसार त्यांनी शेकडो कसदार पत्रकार घडवलेत. पण त्यांच्यासारख्या माणसालाही या घोटाळ्यावर रामबाण उपाय शोधता आलेला नाही किंवा त्याविरोधात सक्षम व्यवस्थेकडून न्यायही पदरात पाडून घेता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात आहे. इतक्या मोठ्या देशानं टीव्हीवर कधी- काय पाहायचं हे ठरवणार्‍या टीआरपी मीटरची संख्या मात्र पन्नास हजाराच्या आत आहे.

- Advertisement -

देशातील आयएएस,आयपीएस, आयआरएस अधिकारी बनणारी मंडळी ‘बातमी’ नीट कळावी म्हणून एनडीटीव्ही वृत्तवाहिनी आवर्जून पाहत असतात. गेली काही वर्षे परिपक्व प्रेक्षकांच्या मनांमध्ये या वृत्तवाहिनीने स्वतःचे एक वेगळं स्थान बनवलं आहे. सहाजिकच या वृत्तवाहिनीच्या यशामुळे सबसे तेज काहीही दाखवण्याचा प्रयत्न असणार्‍या मंडळींना सतत पोटशूळ उठत असतोच. त्यातही व्यावसायिक यशापयशाच्या गणितातून या ‘सबसे तेज’ वाल्यांनी टीआरपीचे रेटिंग आकडे त्याचं तंत्र आणि मंत्र स्वतः मॅनेज करायला सुरुवात केली. याबाबतीत त्यांना अनेक वेळा संबंधित व्यवस्थेकडून समजही देण्यात आलेली आहे. तसेच दोन वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण इथे चपखल लागू पडते. जे ‘सबसे तेज’ वाल्यांनी एनडीटीव्हीच्या बाबतीत जे केलं तेच आज रिपब्लिक सबसे तेज वाल्यांच्या बाबतीत करताना दिसत आहे.

दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम आहे. या माध्यमातून बातमीचे चित्रण आणि ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतं. अशा प्रेक्षकांचा बातम्या किंवा टीव्ही पाहण्याचा जो सर्वाधिक वेळ आहे त्याला ‘प्राईम टाईम’ म्हणतात. हा प्राईम टाईम आपल्या जाहिरातींच्या ओढाताणीसाठी कधी सुपर प्राईम टाईम झाला हे चॅनेल्स आणि प्रेक्षकांनाही कळलंही नाही. या सुपर प्राईम टाईममध्ये ‘शो’ करण्यासाठी चॅनेलच्या संपादक, मालकापासून ते अगदी प्रेक्षणीय चेहर्‍यांच्या अँकर्सनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. धुमाकूळ मी एवढ्यासाठी म्हणतोय की प्राईम आणि सुपर प्राईमटाईम मध्ये दिसावं म्हणून प्रस्तुतकर्ते हव्या त्या नकोत्या पध्दतीने प्रस्तुत व्हायला लागलीत. त्यातूनच जाहिरातींचे क्लाइंट चोरणं इथपासून ते अगदी पॅनेलिस्टच्या पळवापळवीपर्यंत गोष्टी गेल्यात. रोज तेच ते चेहरे चॅनेलच्या माध्यमातून दिवाणखान्यात पोहोचले. एकजण चार पाहुण्यांना घेऊन बसला तर दुसरा चौदाजण छोट्यापडद्यावर घुसविण्याच्या अट्टाहासाने पछाडलाय. मग राजकीय पक्षांनीही आपली बोलकी बाहुली वर्षाच्या सुरुवातीलाच यादीतूनच जाहीर करायला सुरुवात केली.

या बोलक्या बाहुल्यांनीही आपल्या वाहिन्या आणि अ‍ॅन्करना वाटून घेतलंय. या प्राईम टाईम आणि सुपर प्राईम टाईमसाठी कॅमेरासमोर भसाभसा बोलणारे या शोंची गरज झाले. आणि अर्णबसारख्या धंदेवाईक मंडळींनी माकडचाळे करणार्‍या प्रदीप भंडारीसारख्या माकडांनाच अधिष्ठान देऊन टाकलं. ही माकडं कधी टॅक्सीच्या टपावर तर भर रस्त्यावर ‘दांडिया’ खेळू लागली. अर्थात हे टीव्हीच्या दुनियेत नवं नाहीय. संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर स्वत:च मोतीचूर लाडू वाटणारे, कॅमेरामनला बिसलेरी बाटलीनं पाणी आणून परिसर भिजवून ‘बारिश’ दाखवणारे, राजकीय पक्षाचा आनंद दाखवण्यासाठी स्वत: ढोलपथक बोलवणारे, अंडरवर्ल्डमधील अटक करुन अंधेरी पोलीस ठाण्यात आणताना दरवाजातच गुंडाला ‘भाई’ म्हणून गळा काढणारे आणि मग अधिकारी दया नायकच्या हातची सणसणीत कानाखाली खाणारेही महाभाग पत्रकारितेत होतेच आणि आहेतच की! बिझनेस चॅनेलमध्ये जे चालतंय त्यावर तर मधुर भांडारकर चित्रपट काढू शकतो इतकं भयंकर आहे. हे सगळं टीव्हीमध्ये चाललंय म्हणून वृत्तपत्रांनी दसर्‍यालाच दिवाळी साजरी करायची गरज नाही. कुणी सांगावं आज चॅनेलवाले जात्यात आहेत उद्या प्रिंटवालेही असू शकतात.

टीआरपी घोटाळ्यात सीबीआय ही देशातील सगळ्यात महत्वाची तपास संस्था असली तरी या घोटाळ्याच्या तळापर्यंत जाणार की दिखाऊगिरी करुन गप्प बसणार हाच खरा मुद्दा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -