नव्या कपात नवी कल्पना!

आईसक्रीमने सुरूवातीला कागदी कपात स्थान प्रस्थापित केले आणि प्लास्टिक जन्माला येईपर्यंत ते अबाधित होते. छोटे मोठे आणि रंगीबेरंगी कागदी कप आपले लक्ष त्वरीत वेधून घेतात. काचेसारखे फुटण्याचे भय या कपांना कधीच नसते. बिच्चारे एकदा वापरल्यावर पुन्हा ऊपयोगी येत नाहीत. कदाचित एकदा केलेला विचार पुन्हा करण्यापेक्षा दरवेळी नव्या रूपात नवीन विचार मांडण्याची कल्पकता हा प्रत्येक वेळी येणारा नवा कप आपल्याला देत असावा.

कचरा एक सामाजिक समस्या. आज सरकारतर्फे कचरा नियोजनाची वेगळी मोहीमच राबवली जातेय. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. फार पूर्वी जवळपास दहा वर्षे मागे मला एका मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कामानिमित्त जाण्याचा योग आला होता. तिथे प्रथम माझ्या पाहण्यात आले चार वेगळे डबे, निरनिराळ्या रंगांचे, वेगवेगळ्या कचर्‍यासाठी रंगसंगतीचे मूल्यमापन केलेले. कोरडा कचरा पिवळ्या तर ओला कचरा हिरव्या डब्यात, ई कचरा लाल व काचा किंवा टोचणारा निळ्या डब्यात टाकणे आवश्यक होते. काय भन्नाट नियोजनाला, काटेकोरपणे पालन पण केले जात होते. ओला कचरा खत बनायला जात होता, सुका व ई कचरा पुनर्वापरासाठी, काचेचा कचरा वेगळा होता. ते भारतातील पहिले पर्यावरणप्रेमी हॉटेल ठरले नसते तर नवल वाटले असते मला. आज नुसती आठवण झाली तरी असे वाटते ही समस्या जर लवकर समजून कामगिरी सुरू केली असती तर आज चित्र वेगळे असते.

आपल्या घरापासून सुरू केले तर जाणवेल आपल्या अवतीभवती पसरलेलं हे कचरा साम्राज्य. प्रत्येक गल्लीच्या टोकावर, रस्ता वळून असलेली टपरी आठवा, शाळेच्या कोपर्यात, पुलाच्या खाली अशा हमखास जागा असतातच कचरा पडलेल्या अथवा कचराकुंडी बाहेर कचरा ओकणार्‍या. तर काय-काय करता येईल हे सारे विक्राळ रूपी राक्षस संपवायला?

अगदी छोटेसेच उदाहरण पाहूया, कागदापासून बनवलेले कप पुन्हा वापरात येत नाहीत आणि म्हणूनच कचरा वाढवण्यापेक्षा ते धुवुन स्वच्छ करून त्यांच्यापासून विविध कलाकृती आणि शोभेच्या वस्तू बनवता येऊ शकतात. कपाला छोटेसे छीद्र पाडून दोन कपांमध्ये दोरा बांधून टेलीफोन बनवत होतो तो काळ कदाचित आजच्या मुलांना माहित पण नसेल. एका टोकाकडून ‘हॅलो हॅलो कोण बोलतोय’ असा भसाडा आवाज काढून दुसरीकडे कानाला लावलेल्या कपात तो आवाज पोचत असे. सुरूवातीला टेलिफोनमध्ये पण बोलणे आणि ऐकणे या दोन्हीसाठी एकच उपकरण होते. एकादा एकाने बोलायचे तेंव्हा दुसर्‍याने फक्त ऐकायचे. बोलून झाले की ओव्हर म्हणायचे मग समोरच्याने बोलायचे ही कल्पना या कप टेलीफोननेच लक्षात आली. चहाचा कागदी कप हा पर्यावरणाराला अतिशय पूरक आहे.

आईसक्रीमने सुरूवातीला कागदी कपात स्थान प्रस्थापित केले आणि प्लास्टिक जन्माला येईपर्यंत ते अबाधित होते. छोटे मोठे आणि रंगीबेरंगी कागदी कप आपले लक्ष त्वरीत वेधून घेतात. काचेसारखे फुटण्याचे भय या कपांना कधीच नसते. बिच्चारे एकदा वापरल्यावर पुन्हा ऊपयोगी येत नाहीत. कदाचित एकदा केलेला विचार पुन्हा करण्यापेक्षा दरवेळी नव्या रूपात नवीन विचार मांडण्याची कल्पकता हा प्रत्येक वेळी येणारा नवा कप आपल्याला देत असावा.

स्वामी विवेकानंदाना बशीतून चहा पीताना एका गृहस्थ सहज म्हणून गेले ‘काय हा गावठीपणा भारतीय ते भारतीयच’ आणी स्वामींनी ऊत्तर दिले, ‘आम्ही भारतीय बशीतून चहा पितो म्हणूनच कोणी मित्र इतक्यात जर आलाच तर कपातला चहा आम्ही त्याला देऊ शकतो.’ मनात येणार्‍या सर्वच विचारांना चाळणी मारली तर लक्षात येईल किती चांगले, किती वाईट विचार सतत डोक्यात भुंगा घालत असतात. त्यांचा निचरा आपल्या वागणुकीतून होत असतो. करता का आपल्या मनात असे वेगवेगळे कप्पे जे आपल्या मनातील कचर्‍याचा योग्य तसा पुनर्वापर करतील? कल्पना करून बघा मनाला काबीज करू शकलात तर जग जिंकता येईल. आपल्या वाईट विचारांची होळी करून योग्य विचाराना चालना देऊन या भूतलावर स्वर्ग निर्माण होईल असे कार्य आपल्या हातूनच घडते. गरज आहे ती योग्य कृती करायची, स्वतःमध्ये संयम, शिस्त व जाणीवपूर्वक बदल घडवायची.

एखादी स्पर्धा आपण जिंकलो की आपल्याला कप मिळतो तो यासाठीच. आपण प्राविण्य मिळवलेला विषय या कपातून आपण जगाच्या बशीत न्यावा. एखादी गोष्ट नुस्तीच साठवुन ठेवली तर तिला गती मिळत नाही ती प्रवाही होण्यासाठी तीला बशीत ऊतरावे लागते. कप आणी बशीची जोडी आपल्याला सोबत जगण्याचा कानमंत्र नकळत देऊन जाते.

रंगीत विजेचे दिवे लावताना या कपला कव्हर म्हणून वापरता येते. सुंदर प्रकाश किरणांची नक्षी झिरपते.

दिवसा यात आपले पेन पेन्सील किवा वस्तू ठेवण्यास वपरता येईल.

दोन चार सारखे कप बनवून वॉल हंगिंग, घुंगरू लावून विन्डचाईम सुदधा बनवता येईल.

चला थोडे अजून पर्यावरणपूरक बनूया कचर्‍यातून कला घडवूया. आपल्याकडील सर्व प्रकारच्या कचर्‍याचे योग्य नियोजन शिकूया, शिकवूया.

-अर्चना देशपांडे जोशी