घरफिचर्सफक्त ‘न्यूज’ नाही...अवकाशही ‘फेक’च

फक्त ‘न्यूज’ नाही…अवकाशही ‘फेक’च

Subscribe

तुमच्या आजूबाजूचा अवकाशंच फेक असताना माध्यमं त्याला अपवाद असूच शकत नाहीत. म्हणजेच काय तर माध्यमातून जे फेक न्यूज म्हणून येत आहे. ते मुळात त्यांच्या आजूबाजूचा अवकाशच तशा पद्धतीचा असल्यामुळं जास्त ताकदीनं आपल्यासमोर येत आहे. अर्थात त्यामागं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गणितंही आहेतच. क्रोब्रा पोस्टनं केलेलं ऑपरेशन १३६ त्यासाठी नीट समजून घ्यायला हवं.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारची एका मराठी वृत्तवाहिनीनं घेतलेली मुलाखत नुकतीच पाहण्यात आली. अर्थात कन्हैय्या कुमार हा संदर्भ आला की जेएनयू प्रकरण आलं. मुलाखतीची सुरुवात, तुम्ही देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, त्यावेळी तिथं होतात की नाही, या नेहमीच्या ठरलेल्या प्रश्नाने झाली. कन्हैय्या कुमारची ती मुलाखत पाहताना मला सातत्यानं जे जाणवत होतं ते आज मांडतोय. म्हणजे फेक न्यूज ही संज्ञा आता इतकी सामान्य झालीय की आता आपण संवेदनेच्या पातळीवर तिचं गांभिर्यच विसरून बसलोय. विशेषता जेएनयू प्रकरणाबद्दल सरकारी तपास यंत्रणांकडून झालेले खुलासे, त्या व्हिडिओ क्लिप्स बनावट असल्याचे प्रयोगशाळांचे अहवाल हे सगळं समोर असताना आम्ही माध्यमं खोट्या माहितीच्या आधारावर पत्रकारितेचे जे मनोरे उभे करत आहोत, ते जास्त गंभीर आहे. म्हणजे जवळपास आता तीन वर्षाचा काळ उलटत असताना त्या काळात घडलेल्या घटना दुलर्क्षित करून सत्याचं चाक उलटं फिरवण्याच्या नादात आम्ही लोकांच्या जाणिवांसोबत जो खेळ करतोय, तो कोणत्याही हिंसक कृत्यापेक्षा कमी नाही.

फेक न्यूज किंवा खोट्या बातम्या, तसेच राजकीय प्रचारतंत्राचा भाग म्हणून निर्माण करण्यात आलेल्या बातम्या किंवा माहिती हे काही मागच्या चार वर्षातच सुरू झालं आहे असं नाही. मुळात आपण ज्या काळात जगतोय ना त्यातला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अवकाशच मुळात फेक आहे. आणि ज्या मुख्य प्रवाहातील माध्यमांची आपण चर्चा करतोय ती माध्यमंच या फेक अवकाशची अपत्ये आहेत.

- Advertisement -

हे सगळं काही सुरू झालं होतं ते इराककडं अणवस्त्र असल्याच्या अमेरिकेनं सुरू केलेल्या प्रचारतंत्रातून….आजतागयत ती मिळाली नाहीत. ज्या प्रकारे माध्यमातून प्रचारतंत्राचा वापर करून जागतिक सहमती मिळविण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून हा अवकाश निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेनं जो काही उच्छाद मांडला तो आपण पाहिलाच आहे. आपण माध्यमातून आपल्यापर्यंत आलेल्या आशयातून आपलं मत बनवून त्याला मूक संमतीही दिलीच. पण आता पाश्चात्य वाटणारं हे फेक न्यूज प्रकरण आपल्या मानेवर स्वार झालंय. हे कळण्याआधीच त्यानं आपण किती विध्वंसक असू शकतो, याची जाणिव करून दिली. सोशल मिडिया, प्राईम टाईम डिबेट्स या तर त्याला गतीच देत आहेत.

प्रचारतंत्र आणि फेक न्यूज हे प्रकरण आता इतकं गंभीर झालंय आणि तपास यंत्रणा वा सरकारी यंत्रणाच आता सत्याची चाकं जास्त गतीनं असत्याकडं फिरवत आहेत. याची बहुतांश उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत ताजी आहेतच. आमची माध्यमं आता चुकीच्या अवकाशात राहून समांतर न्याय देणारी केंद्र बनत चालली आहेत ?

- Advertisement -

हे सगळं थांबविण्याठी प्रयत्न सुरू आहेत का ? तर नक्कीच होय, भारतात अल्ट न्यूज सारखा पूर्णपणे फेक न्यूजच्या विरोधात काम करणारा माध्यम प्रयोग सुरू आहे. तो यशस्वीही ठरत आहे. पण चुकीची माहिती एवढ्या फोर्सनी तुमच्या अंगावर येत आहे की, फक्त अल्ट न्यूज सारखे प्रयोग त्यासाठी पुरेसे नाहीत. माध्यम संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधून हा सगळा प्रवाह किंवा ट्रेंड थांबविण्याची गरज आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, ‘क्रॉसचेक – ए कोलॅब्रेटिव्ह जर्नालिझम प्रोजेक्ट’

2017 च्या फ्रान्समध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी युरोपातील जवळ ६० च्यावर माध्यम संस्था, वृत्त संस्था, शिक्षण संस्था, फेसबुक, गुगल यांच्या समन्वयातून फेक न्यूज विरोधातला हा प्रोजेक्ट साकार करण्यात आला होता. या एएफपी, बझफीड, ऑब्जरर्व्हर, फ्रान्स टेलिव्हिजन, ग्लोबल व्हाईस, मिदान सारख्या माध्यम संस्था आणि गुगल, फेसबुक सोबतच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स अशा संस्थाही सहभागी होत्या. २०१७ मध्ये फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या प्रोजेक्टमुळं चुकीच्या बातम्यावर अंकुश ठेवण्यात माध्यमांना यश आलं. फर्स्ट ड्राफ्ट न्यूज. कॉम या संकेतस्थळांना क्रॉसचेक प्रोजेक्टच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अशा समन्वयवादी प्रयोगांची तातडीची गरज जगातील माध्यमांना जाणवायला लागली आहे.

या सगळ्यामध्ये पत्रकारिता, तिची तत्वे पणाला लागली आहेत का? तर नाही… या सगळ्यात पणाला लागला आहे तो आमच्या वाचकांचा सत्य माहिती मिळविण्याचा मानवाधिकार. आपल्या बाजूला आधीच निर्माण करण्यात आलेल्या खोट्या अवकाशाची आपण अपत्य असल्याचं मान्य करणं, हे सध्याच्या काळात माध्यमांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं लक्षात येतंय. त्यानंतर मग यातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग शोधता येतील. काही दिवसांपूर्वी रविश कुमार यांच्या द फ्री व्हाईस – डेमोक्रसी, क्लचर आणि नेशन या पुस्तकाचा संपादित मराठी अनुवाद वाचत होतो. भारतीय नागरिकांना प्रचारतंत्र झुगारून देण्यासाठी प्रवृत्त करणं आणि सत्याबदद्लच्या संवेदना जागृत करणं हेच आजच्या काळातलं राष्ट्रनिर्मितीतलं मोठं योगदान आहे, असं मत प्रस्तावनेत व्यक्त करण्यात आलं. मुळात मी राष्ट्र ही संकल्पनाच आता नष्ट झाली आहे. तरी तेवढं सोडून मी या विचाराशी सहमत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -