घरफिचर्सओढली चुनरीया...

ओढली चुनरीया…

Subscribe

तुम्ही कोणताही नवा ड्रेस शिवून घ्यायच्या विचार केला असेल तर थोड थांबा आणि बाजारातील डीझायनर दुपट्टे बघूनच मग ड्रेस शिवा

एखाद्या साध्या ड्रेसला ग्लॅमरस लूक देण्याचे काम करते ती ‘ओढणी’…म्हणूनच की काय, हल्ली ड्रेसपेक्षा ओढण्यांमधी विविधता बाजारात अधिक बघायला मिळते. आज आपण या ओढण्यांमधले नवे ट्रेंडस काय आहेत ते पाहूया.

मल्टीकलर ओढणी –

- Advertisement -

एकाच ओढणीत तीन रंगापेक्षा अधिक रंग या मल्टीकलर प्रकारातील ओढण्यांमध्ये असतात. एक बेस कलर आणि त्यासोबत उठून दिसणारे आणखी दोन रंग ते तीन रंग… शिफॉन मटेरिअलमध्ये या ओढण्या असल्यामुळे त्या चमकदार असतात आणि कोणत्याही प्लेन ड्रेसवर त्या खुलून दिसतात.शिवाय यात विविधता आहे ती त्यांच्या डीझान्समध्ये. म्हणजे नुसतेच मल्टीकलर नाही. तर बांधणी, गोल्डन, सिल्व्हर ग्लिटर वर्क या ओढण्यांवर पाहायला मिळतात. नवरात्रीत या ओढण्यांची मागणी अधिक असते. साधारण २०० ते ३०० रुपयांपर्यंत मिळतात.

लेस बॉर्डर ओढणी-

- Advertisement -

ओढणीमधील खरंतरं अत्यंत साधा प्रकार. प्लेन ओढणीला लावलेली लेस इतकी साधी ही ओढणी . पण हल्ली डीझायनरचा काळ असल्यामुळे या साध्या ओढण्यादेखील डीझायनर लूक देण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकारातील लेस या ओढण्यांच्या चारही बाजूंना असतात. विशेषत: यात गोल्डन, सिल्व्हर, कॉपर, मल्टीकलर, थ्रेडवर्क अशा जास्त पहायला मिळतात. तर या ओढण्यांचे रंग देखील गडद आणि उठावदार असतात. शिफॉन मटेरिअल मधील या ओढण्या लेस बगळता प्लेन असल्यामुळे तुमच्या प्रिंटेट ड्रेसवर आरामात चालू शकतात. या ओढण्या १५० ते ३०० रुपयांपर्यंत मिळतात.

नेटेड ओढणी-
काही वर्षांपूर्वी नेटेड साड्यांचे फॅड होते. आता ओढण्यांमध्ये हा प्रकार बघायला मिळत आहे. मऊ आणि थोड्या जाड अशा दोन्ही नेटच्या प्रकारात या ओढण्या मिळतात. नेटेड ओढण्यांचना डीझानयर लूक देण्यासाठी हल्ली त्यावर वर्क देखील केलेले असते. ओढण्यांच्या दोन्ही टोकांना गोंडे, मण्यांची लेस असे काही तरी असतेच. त्यामुळे या ओढण्या तुमच्या साध्या कॉटन ड्रेसला देखील न्याय देतात. या ओढण्यांमधील जाड प्रकारातील ओढणी थोडीशी घट्ट असल्यामुळे ती गळ्यालगत घेता येत नाही. तर ती ड्रेसवर वनसाईड जास्त चांगली दिसते. त्यामुळे नेटेड ओढण्यांमधील तुम्ही कोणती ओढणी निवडता. त्यानुसार तुम्ही कोणता ड्रेस घालणार हे ठरवायला हवे. या शिवाय घागरा- चोलीवर या ओढण्या चांगल्या दिसतात. या ओढण्यांची किमंत साधारण २५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.

बांधणी ओढणी-
बांधणीच्या ओढण्या एखाद्या साध्या ड्रेसलाही छान लूक देतात. अनेक महिलांना या प्रकारातील ओढण्या आवडतात. विशेष म्हणजे या ओढण्या सहज उपलब्ध असतात. गुलाबी, आकाशी, जांभळा, पोपटी, केशरी, लाल, हिरवा हे यातले काही बांधणी म्हटल्यावर चटकन डोळ्यासमोर येतात. कॉटन मटेरिअलमधील या ओढण्यांमुळे देखील एक वेगळाच लूक मिळतो. तुमचा ड्रेस कितीही फिक्कट असला तरी या ओढण्या त्याला पुरेपूर न्याय देतात. साधारण १५० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत या ओढण्या आहेत.

डीझायनर दुपट्टा-

तुम्ही कोणताही नवा ड्रेस शिवून घ्यायच्या विचार केला असेल तर थोड थांबा आणि बाजारातील डीझायनर दुपट्टे बघूनच मग ड्रेस शिवा. मिनाकारी वर्क, पटोला, एम्ब्रॉयडरी वर्क, ब्रोकेट, पैठणी, नारायण पेठ, पुलकारी वर्क असलेले हे दुपट्टे अगदी त्यांच्या नावाप्रमाणे डीझायनर आहेत. या ओढण्या पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमात पडणार नाही,असे क्वचितच कोणीतरी असेल. या ओढण्या ५०० रुपयांपासून सुरु होतात. पण या ओढण्या आधी घेऊन तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये तुम्ही ड्रेस शिवू शकता.

सिल्क ओढणी-

रिच लूक देणारा असा हा ओढणीचा प्रकार आहे. हलकीफुलकी, पातळ पण तितकीच फॅशनेबल अशी ही ओढणी असते. प्रिटेंड, लेसवर्क अशा दोन्ही प्रकारात या ओढण्या मिळतात. शिवाय यात प्युअर सिल्क, रॉ सिल्क असे काही पर्याय देखील आहेत. या ओढण्यांची किमंत ३०० रुपयांपासून पुढे आहे.

काय काळजी घ्याल?
१. प्रिटेंड ड्रेसवर प्लेन ओढणी निवडा. तरच्या ड्रेस उठून दिसतो.
२.कॉटन मटेरिअलच्या ओढण्या कॉटन ड्रेसवर अधिक खुलून दिसतात
३. ओढण्यांचे रंग गडद असतात. काहीवेळा पहिल्या धुण्यात या ओढण्यांचे रंग जातात. त्यामुळे ओढण्या ड्रायक्लीन करुन वापरा
४. कधी कधी ओढण्यांचे रंग तुमच्या फिकट ड्रेसला लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ओढण्या ड्राय क्लीन करुन वापरा.
५. ओढण्या न वापरता तशाच पडून राहिल्या की, त्यांना कोंदट वास येतो. अशावेळी ओढण्या धुवून, कडक वाळवून त्यात टाल्कम पावडर घालून ठेवा. कोंदट वास येत नाही

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -