घरफिचर्सऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल : ‘स्वप्न’वत वाटणारी नितांत सुंदर प्रेमकथा

ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल : ‘स्वप्न’वत वाटणारी नितांत सुंदर प्रेमकथा

Subscribe

  ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’ हा ‘नॉट युअर काइंड ऑफ स्टोरी’ या संकल्पनेला बरोबर न्याय देतो. कारण ही प्रेमकथा असली तरी ‘यह सबके बस की बात नहीं’. याला मुख्य कारण म्हणजे यातील चित्रण. यातील कत्तलखान्यातील सीन्स बर्‍याच लोकांना नकोसे वाटण्याची शक्यता आहे.

दूर कुठल्यातरी हिमाच्छादित प्रदेशात दोन हरणांच्या बागडण्याने चित्रपटाची सुरुवात होते. काही नितांत सुंदर फ्रेम्समधील पांढर्‍या आणि जराशा निळसर रंगाने, काही भारी नोट्सच्या सोबतीने समोरचा पडदा उजळून निघतो. त्यानंतर थोड्याफार फरकाने आपण थेट एका कत्तलखान्यात पोहचतो. सुरुवातीला दिसलेल्या सुंदर फ्रेम्सच्या अगदी उलट (आणि बहुतांशी लोकांना त्रासदायक तसेच धक्कादायक वाटतील अशा) फ्रेम्स दिसायला सुरुवात होते. हा बेफिकिरपणे त्रासदायक आणि तितकाच काव्यात्मक चित्रपट म्हणजे ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’  ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’ हा ‘नॉट युअर काइंड ऑफ स्टोरी’ या संकल्पनेला बरोबर न्याय देतो. कारण ही प्रेमकथा असली तरी ‘यह सबके बस की बात नहीं’. याला मुख्य कारण म्हणजे यातील चित्रण. यातील कत्तलखान्यातील सीन्स बर्‍याच लोकांना नकोसे वाटण्याची शक्यता आहे.

आंद्रे (गेझा मोर्क्सान्यी) हा एका कत्तलखान्यातील मॅनेजर आहे. तो बराच साधा, सरळमार्गी आहे. पण दुर्दैवाने त्याचा डावा हात निष्क्रिय झालेला आहे. गेल्या कित्येक वर्षात त्याचा कंपनीतील एक एचआर, आणि त्याची पत्नी (जी आंद्रेची पूर्वाश्रमीची प्रेयसी असते) वगळता कुणाशी सौहार्दाचे संबंध नाहीत. बर्‍याच काळापूर्वी त्याचा घटस्फोट झालेला आहे. आणि त्याला एक मुलगीही आहे. एकूणच ही चाळिशीपार पडलेली व्यक्ती काही रूढार्थाने एखाद्याने प्रेमात पडावी अशी नाही. शिवाय तोही आपल्या या आयुष्यात खूश असल्याने, आणि बहुधा स्वतःच्या एका हाताच्या जवळपास निकामी असण्याच्या न्यूनगंडामुळे त्यालाही पुढे जायचे आहे असे दिसत नाही.

- Advertisement -

मात्र कंपनीत काही काळापुरत्या नव्याने रुजू झालेल्या मारिया (अलेक्झांड्रा बॉरबेली) या गुणवत्ता निरीक्षिकेमुळे परिस्थिती बदलू पाहत आहे. आंद्रे तिच्याकडे आकर्षित होऊन तिच्याशी संवाद साधत, एका नवीन नात्याची वीण घालू पाहत आहे. पण मारियामध्ये ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर’ ऊर्फ ‘एएसडी’ची लक्षणे दिसून येतात. ज्यातून ती नेहमी अलिप्त राहताना, कुणाशीच फारसा संवाद न साधत, अनेकदा एकटीच काम करताना दिसते. त्यामुळे आंद्रेचे सुरुवातीचे प्रयत्न व्यर्थ जातात.पण कंपनीत झालेल्या जनावरांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘व्हाएग्रा’सम औषधाच्या चोरीने आणि त्याच्या चौकशीच्या निमित्ताने एक वेगळीच गोष्ट समोर येते. ज्यात एका बर्‍याच ‘मादक’ मानसशास्त्रज्ञाकडून कंपनीतील सर्व कामगारांची मानसिक चाचणी केली जात असते. त्यात असे लक्षात येते की आंद्रे आणि मारियाला रोज रात्री सारखीच स्वप्न पडतात. ज्यामुळे ती मानसशास्त्रज्ञदेखील जराशी चकित होते. मात्र या दोघांनी आपली फिरकी घेतली असा विचार करत ती दोघांना एकत्र बोलावून विचारपूस करते, वगैरे पुढील काही गोष्टी घडतात आणि अगदी टळतातही.

या निमित्ताने आंद्रेला तिच्याशी संवाद साधण्यासाठी जो समान धागा हवा होता तो मिळतो. आणि मग दोघेही सुरुवातीचे काही दिवस आपल्या स्वप्नांची तुलना करून पाहतात. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना त्यात साम्य आढळते तेव्हा या स्वप्नांच्या वेगळ्या युनिव्हर्समध्ये त्यांची प्रेमकथा फुलू लागते, असे एकूण कथानक. त्यामुळे चित्रपट किती पातळ्यांवर वेगळा आहे आणि लिखाणात किती प्रयोग केले आहेत याची किमान कल्पना यातून येईलच.

- Advertisement -

चित्रपटाचा खरा प्लस पॉइंट म्हणजे इल्डिको एन्येडीचे दिग्दर्शन आणि मेट हरबायचा कॅमेरा आहे.गेझा मोर्क्सान्यीसाठी आंद्रेची भूमिका साकारणे काही फार विशेष कार्य नसावे. पण म्हणून त्याची भूमिका अगदी वाईट होती असा अगदी टोकाचा अर्थ होत नाही. मात्र इथे अभिनयात खरा कस लागतो तो मारियाची भूमिका साकारणार्‍या अलेक्झांड्राचा. म्हणजे सर्वांपासून अलिप्त राहणारी, शांत डोक्याची, घरी जाऊन आंद्रेशी झालेल्या प्रत्येक संवादाची रिहर्सल करणारी, हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होणारी ते शेवटच्या काही मिनिटांत तो आपला होऊ शकत नाही या जाणिवेने अस्वस्थ होऊन फक्त पडद्यावर पहावे (किंवा खरंतर पाहू नये) असे कृत्य करणारी मारिया तिने अप्रतिम उभी केलीय.बाकी कशासाठी नाही तरी किमान तिच्यासाठी तरी हा चित्रपट पहायलाच हवा.
– अक्षय शेलार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -