पिझ्झा, बर्गर, फ्रँकी हे जंग फूड सर्रास खाल्ले जातात. सगळे त्याचे दुष्परिणामही सांगतात. मात्र पिझ्झा, बर्गर खाद्यच शरिराला अपायकारक नसून त्याचे बॉक्सही धोकादायक असतात. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. जाणून घ्या कसं…
- पिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी समजूत असते. परंतू हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो.
- धोकादायक रिसाइकल्ड मटेरिअलने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज (हे एक अँटिबायोटीक औषध असते) आणि विषारी शाई असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून हे पदार्थ वापरले जातात आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आपल्या पोटात जातात.
- पिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं.
- तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं. जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गरम पिझ्झा खाण्याची आवड महागात पडू शकते, कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला ६० ते ६५ डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.
यावर उपाय म्हणजे शक्यतो पिझ्झा घरी मागवणं टाळा आणि पिझ्झा शॉपमध्ये जाऊन त्याचा आस्वाद घ्या.