घरफिचर्सभारतात लोकसंख्या विस्फोट अटळ

भारतात लोकसंख्या विस्फोट अटळ

Subscribe

आजमितीस जगात चीन आणि भारत लोकसंख्येबाबत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहेत. येत्या दहा वर्षांत भारत लोकसंख्येत चीनलासुध्दा मागे टाकेल, असे एकूण चित्र आहे. आगामी दहा वर्षांत भारतात लोकसंख्या विस्फोट अटळ आहे. हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. कारण आकडेवारीच एवढी बोलकी आहे, की भल्याभल्यांची बोलती बंद होईल. लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावरील चीनमध्ये आजमितीला 1 अब्ज 41 कोटी 49 लाख 40 हजार, तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतात 1 अब्ज 35 कोटी 43 लाख 40 हजार लोकसंख्या आहे.

चीनने बर्‍याच प्रमाणात त्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदे केले होते. जनजागृतीदेखील या देशात सातत्याने केली जाते. परंतु भारतात जनजागृती आणि लोकसंख्या नियंत्रणासंबंधी कायद्यात दोन्हींचा अभाव दिसून येतो. देशाचा लोकसंख्या वाढीचा वेग असाच कायम राहिला तर दशकभरात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल, अशी दाट शक्यता आहे. वॉशिंग्टन डीसीतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या एनजीओने भारतातील धार्मिक लोकसंख्येवर नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे, त्यानुसार हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन यांच्यासह जवळपास सर्वच धर्माचा जन्मदर घटल्यासह अनेक लक्षवेधी आकडेवारी त्यातून जगासमोर आली. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढतेय, असे निष्कर्ष जरी नोंदवण्यात आले असले तरी, अहवालानुसार 1992 ते 2015 दरम्यान सर्वच धर्माच्या जन्मदरात घट नोंदवण्यात आली. 1992 मध्ये एक मुस्लीम महिला साधारणत: 4 हून अधिक मुलांना जन्म देत होती. 2015 मध्ये हे प्रमाण 2 हून अधिकपर्यंत आले. हिंदूंच्या बाबतीत हे प्रमाण 3 वरून 2.1 पर्यंत पोहोचले. हिंदू ख्रिश्चन 2.9 वरून 2, बौद्ध 2.9 वरून 1.7, शीख 2.4 वरून 1.6 तसेच जैन 2.4 वरून 1.2 वर आले आहेत. असे असले तरी मुस्लिमांचा जन्मदर इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे 1951 ते 2011 दरम्यान भारताची एकूण लोकसंख्या तीन पटीने अधिक वाढली.

भारताचा प्रति नागरिक जन्मदर 2.2 टक्के आहे. अमेरिकेत हाच दर 1.7 टक्के, इंग्लंड 1.6 टक्के, यूएई 1.4 टक्के, कतार 1.8 टक्के. कट्टर मुस्लीम देश समजल्या जाणार्‍या सौदी अरेबियात तसेच सर्वाधिक मुस्लीम असलेल्या इंडोनेशियात प्रति नागरिक जन्मदर 2.3 टक्के आहे. लोकसंख्या वाढीचा थेट संबंध महिलांच्या शिक्षणाची संबंधित आहे, असे म्हणता येईल. महिला जेवढ्या शिक्षित होतील, तेवढीच मुलांच्या जन्माची संख्या कमी होईल. असे थेट गणित जोडले जात असले तरी जागरूकता महत्वाची आहे, हे विसरून चालणार नाही. जागरूकतेला लोकसंख्या नियंत्रण कायद्याची जोड मिळाली, तर अधिकच उत्तम.

- Advertisement -

1951 मध्ये 30.4 कोटींच्या घरात असलेले हिंदू 96.6 कोटींपर्यंत पोहोचले आहेत, तर मुस्लीम 3.5 कोटींवरून २1 कोटींपर्यंत पोहोचले. 17.2 ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या 80 लाखांनी वाढून 2.8 कोटींपर्यंत पोहोचली. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 79.8 टक्के हिंदू तसेच 14.2 टक्के मुस्लीम बांधव आहेत. उर्वरित 6 टक्क्यांमध्ये ख्रिश्चन, शीख,बौद्ध तसेच जैन येतात. भारत जगातील 94 टक्के हिंदूचे घर आहे. नेपाळ सोडले तर भारत सर्वाधिक मोठे ‘हिंदूराष्ट्र’ आहे. विशेष म्हणजे भारतात जगातील अनेक देशांच्या तुलनेत सर्वाधिक मोठी मुस्लीम लोकसंख्या वास्तव्य करते. इंडोनेशियामध्ये 2020 मधील लोकसंख्येनुसार, 20.9 कोटी मुस्लीम लोकसंख्या नोंदवण्यात आली. यानंतर सर्वाधिक मुस्लीम भारतात राहतात. पाकिस्तानमध्ये मुस्लीम लोकसंख्या भारताएवढीच आहे. चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. उत्तर प्रदेशात 20 कोटी, महाराष्ट्र 11.2 कोटी, बिहार 10.4 कोटींसह भारतातील 35 राज्यांपैकी 28 राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत. मुस्लीम लक्षद्वीप तसेच जम्मू-काश्मीरमध्ये बहुसंख्याक आहेत. नागालँड (20 लाख), मिझोरम (10 लाख) तसेच मेघालय (30 लाख) या राज्यात ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत. पंजाबमध्ये शीख बहुसंख्य आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये शिखांची लोकसंख्या 1.6 कोटी होती.

देशात सर्वधर्मीय नागरिकांचा विचार केल्यास मुस्लिमांचा प्रति नागरिक जन्मदर सर्वात जास्त आहे. स्वतंत्र भारतात 1951 मध्ये एकूण लोकसंख्येतील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 84.1 टक्के होते; परंतु 2050 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण 76.4 टक्क्यांवर येईल. याउलट देशाच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 1951 मध्ये 9.8 टक्के होते; परंतु 2020 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 15 टक्के झाले. आता 2050 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 18.35 टक्के असेल,असे भाकीत या अहवालातून नोंदवण्यात आले आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्येतील वाढीचा ओघ बघता 2050 पर्यंत भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येत दहा पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्या सुमारास देशात 3 कोटी मुस्लीम होते. 2021 मध्ये भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 21 कोटी आहे. या लोकसंख्येत आणखी वाढ होईल आणि 2050 पर्यंत भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 31 कोटीपर्यंत पोहोचेल.

- Advertisement -

मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू लोकसंख्येतील वाढीचा वेग कमी आहे. संपूर्ण देशाचा प्रति नागरिक जन्मदर 2.2 आहे. हिंदूंचा प्रति नागरिक जन्मदर 2.1 आहे, तर मुस्लिमांचा प्रति नागरिक जन्मदर 2.6 आहे. भारताची एकूण लोकसंख्या 2050 पर्यंत 170 कोटी असेल, या लोसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 2021 च्या तुलनेत 2050 मध्ये वाढलेला असेल. भारतात 2001 ते 2011 दरम्यान 24 राज्यांतील हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणात घट झाली. याच काळात देशातील 26 राज्यांमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ झाली. मणिपूरमधील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 4.6 टक्क्यांनी कमी झाले. आसाममधील हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 3.4 टक्के, बंगाल 1.9 टक्क्यांनी कमी झाले, तर आसाम 3.3 टक्के. केरळ 1.9 टक्के तसेच बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण 1.8 टक्क्यांनी वाढले. लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण असेच पुढील तीन दशकांमध्ये वाढत राहिले, तर लोकसंख्या 35 कोटींनी वाढून 170 च्या घरात पोहोचेल. भारताने लोकसंख्येच्या भस्मासुराच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच आतापासूनच लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदे करण्यासाठी हालचाली करण्याची आवश्यकता आहे.

–रवींद्रकुमार जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -