घरफिचर्सशेतकऱ्यांना दिलासा हवामान अंदाजाचा

शेतकऱ्यांना दिलासा हवामान अंदाजाचा

Subscribe

– नितीन शिंदे
यंदा मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, अलिकडे हवामान बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. अशा स्थितीत हवामान अंदाजाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकारनंकार्यान्वित केलेली ‘महावेध’ ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाजविषयक दिलासा देणाऱ्या या यंत्रणेविषयी…

यंदाच्या उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे सारेच हैराण झाले आहेत. अशा स्थितीत यंदाचा पावसाळा कसा राहणार, याविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे. त्या दृष्टीने हवामानविषयक समोर आलेले अंदाज दिलासा देणारे आहेत. या अंदाजानुसार यंदा मान्सून समाधानकारक असणार आहे. तो सरासरीएवढा होईल, असा सर्वसाधारण निष्कर्ष आहे. त्यामुळे सारेजण सुखावले आहेत. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पावसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचं कारण आपल्या देशातील शेती मुख्यत्वे पावसावर आधारित आहे. त्यामुळे येथील शेतीचं सारं गणित पावसावर अवलंबून असतं. पावसानं ओढ दिली किंवा तो प्रमाणापेक्षा अधिक झाला तर शेतकरीवर्गात चिंतेचं वातावरण निर्माण होतं. कारण या दोन्ही बाबतीत शेती उत्पादनात नुकसान सहन करावं लागतं. आपल्या देशात सर्वसाधारणपणे जूनच्या मध्यावर पावसास सुरूवात होते. हे लक्षात घेऊन शेतकèयांमध्ये मशागतीची लगबग दिसून येते.

पूर्वीच्या काळातील शेती
बी-बियाणं, खतं आदींच्या खरेदीसाठी शेतकरी प्रयत्नशील असतात. ही सारी तयारी सुरू असतानाच पावसाचे वेध लागलेले असतात. पूर्वी पावसाचं वेळापत्रक ठरलेलं असायचं. एवढंच नाही तर कोणत्या नक्षत्रावर कसा पाऊस पडणार, याचे ठोकताळे बांधलेले असायचे आणि त्याच पध्दतीनं पाऊस पडायचा. पावसाच्या अशा नियमिततेमुळे शेतीचं गणित बऱ्यापैकी जमून यायचं आणि शेतकरी राजा खूष असायचा.
आताच्या काळातील बदललेले चित्र
अलिकडच्या काळात हे चित्र बदललं आहे. मुख्यत्वे पावसाचं वेळापत्रक बदलत चालल्यानं पिकांच्या लागवडीचं नियोजन करणं कठीण ठरत आहे. अशा स्थितीत हवामान अंदाजाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचणं गरजेचं आहे. आजकाल लहरी हवामानाचा फटका शेती क्षेत्राला सहन करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी महापूर तर कधी अवकाळी पाऊस, जोरदार वारे अशा नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे, हे वेगळं सांगायला नको. जागतिक तापमानवाढ रोखणं हे मोठं कठीण आव्हान बनून राहिलं आहे. अर्थात, या संदर्भात जागतिक पातळीवर विविध देश प्रयत्नशील आहेत. परंतु, तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करतानाच हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचा अवलंब करणंही गरजेचं आहे. तापमान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतातील पिकांवर होत असतो. कारण आपल्याकडील बहुतांश पिकांना विशिष्ट हवामान मानवतं. तसं नसेल तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन पिकांच्या लागवडीचं नियोजन करायला हवं. त्यादृष्टीने सरकारची ‘महावेध’ ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती मिळणार
मुख्यत्वे या यंत्रणेमार्फत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती तसंच अंदाज उपलब्ध होणार असून त्याच्या आधारे पिकांचं योग्य व्यवस्थापन करणं शक्य होणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक अशा रितीनं २०६० स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. साहजिक या केंद्रांद्वारे गावस्तरापर्यंत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज तसंच त्या संदर्भातील माहिती प्राप्त होऊ शकेल. यात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे सध्याची हवामान विषयक यंत्रणा राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यात स्थानिक स्तरावरील हवामान अंदाजाचा स्वतंत्ररित्या समावेश नसतो. मात्र, बऱ्याचदा स्थानिक पातळीवरील हवामानाचे अंदाज वेगळे असतात. एखाद्या गावात चांगला पाऊस तर शेजारचं गाव कोरडं, असं चित्र पहायला मिळतं. अशा स्थितीत संपूर्ण राज्याच्या हवामानाची एकत्रित माहिती लक्षात घेऊन शेतीविषयक कामांचं नियोजन करणं उचित ठरत नाही. त्यादृष्टीने सरकारची ही नवी यंत्रणा निश्चित लाभदायक ठरणार आहे. कारण या यंत्रणेद्वारे स्थानिक पातळीवरील हवामानाच्या अंदाजाची माहितीही उपलब्ध होणार आहे. या यंत्रणेद्वारे त्या त्या ठिकाणच्या वाऱ्याची नेमकी गती किती, ते वारे कोणत्या दिशेनं वाहत आहेत या संदर्भातील माहिती बरोबरच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता तसंच पावसाचं प्रमाण याचीही माहिती उपलब्ध होऊ शकेल. यावरून या यंत्रणेचं महत्त्व लक्षात येतं.

यंत्रणेचं महत्त्व

ही स्वयंचलित हवामान यंत्रणा हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या ‘स्कायमेट’ या कंपनीच्या सहकार्यानं बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी यंत्रणा कार्यरत झालेल्या ठिकाणी हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित केली जाणार असून त्या संदर्भातील व्यवस्था पुण्यातील कृषी महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय ही माहिती केवळ एकत्रित न करता लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल, या संदर्भातही पावलं उचलली जात आहेत. एकंदर या यंत्रणेद्वारे प्राप्त माहितीमुळे शेतकऱ्यांना हवामान बदलात पीक संरक्षणाबाबत वेळीच उपाययोजना करणं शक्य होईल आणि संभाव्य नुकसान टाळता येईल किंवा कमी करता येईल.
राज्यात काही अलिकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे तसंच जोरदार वाऱ्यामुळे विविध पिकांचं तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालं. शेतात काढून ठेवलेलं तसंच काढणीला आलेलं पीक मोठ्या प्रमाणावर वाया गेल्यानं शेतकरी हवालदील झाले. अशा स्थितीत हवामान बदलाचा अंदाज निश्चितपणे शेतकऱ्यांच्या कामी येणार आहे. म्हणजे अमूक एका भागात ढगाळ वातावरण असून येत्या काही तासांत पावसाची तसंच जोरदार वाऱ्याची शक्यता आहे, अशी हवामान अंदाजाद्वारे आगाऊ कल्पना आली तर शेतकरी वर्गाला शेतात काढून ठेवलेलं पीक सुरक्षित ठिकाणी नेणं, त्याच्या संरक्षणासाठी पुरेसं आच्छादन अंथरणं किंवा संरक्षणविषयक अन्य उपाययोजना करणं शक्य होतं.तसंच काढणीला आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी जमेल तेवढं पीक काढून घेणंही शक्य होतं. प्रसंगी अशा प्रयत्नांमध्ये शासन तसंच स्वयंसेवी संस्थाही शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ शकतात. जेणेकरून नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचं नुकसान कमी केलं जाऊ शकतं.

मुख्यमंत्रीपदाचा काळ
एकंदर सरकारचं हे पाऊल काँग्रेसच्या मारोतराव कन्नमवार आणि पी.के.सावंत हे तर अल्पकालीन मुख्यमंत्री ठरले. सावंत तर २५ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदी रुजू झाले आणि ४ डिसेंबर १९६३ रोजी पायउतार झाले. शंकरराव चव्हाण हे इंदिरानिष्ठांमधील महत्वाचं नाव. पण त्यांनाही आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. नजिकच्या काळात विलासराव देशमुख यांचा काळ पूर्ण होता होता मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. हल्ला झालेल्या ताज हॉटेलच्या पहाणी दौऱ्यात त्यांनी आपल्या सोबत रामगोपाल वर्मा यांना नेलं आणि मुख्यमंत्रीपदाचा काळ पूर्ण होता होता त्यांना पायउतार व्हावं लागलं. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे काही मुख्यमंत्र्यांचे अपवाद वगळले तर बहुतांश मुख्यमंत्र्यांना कुठलंही कारण न देता पद सोडावं लागलं होतं. त्यांच्यामागे फडणवीसांसारखा वशिला असता तर कदाचित या दिग्गजांपैकी अनेकांची कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली असती. आता ती मोदींमुळे देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -