घरफिचर्सप्रगल्भतेचा प्रवास

प्रगल्भतेचा प्रवास

Subscribe

एक शिवभक्त म्हणजे शिवमावळा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष संतोष धनावडे यांच्याकडून एक नवीन शब्द ऐकला. तो म्हणजे ‘शिवमावळा’. त्यांनी या शब्दाचा अर्थ सांगितला तो म्हणजे मातृभूमीसाठी प्रसंगी नांगर, तलवार, लेखणी समर्थपणे पेलतो तो ‘शिवमावळा’.

संतोष धनावडे या व्यक्तीमुळे मला ‘शिवमावळा’ या शब्दाचा खरा अर्थ समजला. त्याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवमावळा प्रतिष्ठान या ढोलताशा पथकाचा मी पथकप्रमुख असून या प्रवासात मला अनेक चांगली माणसं भेटली आणि मी प्रगल्भ होत गेलो.

सन २०१५ म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज व मराठेशाहीचा इतिहास यावर बरीच पुस्तकं वाचलीत व व्याख्यानं ऐकलीत. असेच एक शिवभक्त म्हणजे आमचे दादा शिवमावळा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष संतोष धनावडे यांच्याकडून एक नवीन शब्द ऐकला. तो म्हणजे ‘शिवमावळा’. त्यांनी या शब्दाचा अर्थ सांगितला तो म्हणजे मातृभूमीसाठी प्रसंगी नांगर, तलवार, लेखणी समर्थपणे पेलतो तो ‘शिवमावळा’. आया बहिणींच्या मानसन्मानासाठी झटणारा, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा तो शिवमावळा. स्वराज्यासाठी मावळ्यांनी केलेल्या बलिदानाचा इतिहास दादांकडून ऐकला. शिवचरित्राच्या प्रत्येक घटनेतून शब्दाशब्दांतून शिकण्यासारखे आहे हे दादा नेहमी सांगतात आणि मी त्याचा अनुभवही घेतला.

- Advertisement -

मी जे आत्मसात केलं ते माझ्या बरोबरीच्या युवापिढीला कसं देता येईल, शिवविचार व त्याचा प्रचार यात त्यांना कसं वाहून घेता येईल हा विचार मनात घोळू लागला. मग दादांशी चर्चा करून त्यांच्या संकल्पनेतून ‘शिवमावळा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ढोलताशा व ध्वज पथकाची स्थापना केली. आमच्या वहिनी, काकी, आई मानसी संतोष धनावडे, समीर दादा, यश, जय सर्वांनी संपर्क अभियान राबवून शेकडो तरुण-तरुणींना एकत्र आणलं. त्यांना शिवविचारांची गोडी लावली. दरवर्षी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनी रायगडवारी सुरू केली. दुर्गराज श्रीमंत रायगडावर महाराजांच्या पालखीचा भोई होणे, मिरवणुकीत ढोलताशा ध्वज पथकाची मानवंदना देणं हा आनंद लुटून आपला घाम गाळून रक्त आटून दादांना अपेक्षित एकेक शिवमावळा तयार होत होता. एकही रुपया मानधन न घेता वादनाच्या मेहनतीतून उभा राहिलेला पैसा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कामात वापरला जाऊ लागला. दुष्काळग्रस्त भागात धान्यवाटप, स्त्री सशक्तीकरणाचे धडे व प्रोत्साहन, आरोग्य शिबीर, अनाथ मुलांना अन्न, खाऊ, खेळणी व शालेय साहित्य वाटप, दीपोत्सव, नववर्ष शोभायात्रा असे उपक्रम पथकामार्फत राबविले गेले. या कार्याची दखल नामवंत वृत्तपत्र व वृत्तवाहिनींनी घेतली. मान्यवर व प्रतिष्ठितांकडून कौतुकाची थाप मिळाली.

आज तरुण पिढी मोबाईल, क्षणिक सुख, नैराश्य व व्यसन यात अडकत चाललाय; पण मी अभिमानाने सांगतो की, मी अशा एका पथकाचा पथकप्रमुख आहे जिथे आलेला आणि स्थिरावलेला तरुण वर्ग आज शिवभक्त होतो. दादांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आयुष्यात येणार्‍या प्रत्येक छोट्या मोठ्या संकटांवर मात करून शिवमावळा म्हणून अभिमानाने प्रगतीशील आयुष्य जगतोय.मी शिवाजी महाराज व संतोष धनावडे या दोन व्यक्तिमत्वांमुळे प्रेरित झालो. तसेच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कित्येक तरुण-तरुणी मला सहकारी म्हणून लाभले. अथक परिश्रमाने शिवमावळा प्रतिष्ठानला नावारुपास आणलं अशा माझ्या पथकाचा, पथकातील प्रत्येक वादकांचा, कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे.

- Advertisement -

– सागर चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -