भगवान का रिकॅप..

सिझन 2 प्रदर्शित व्हायला 10 दिवस बाकी आहेत. या सिझन मध्ये गणेश गायतोंडेचा तिसरा बाप काय करणार?, सरदार आणि पारोळकर एकत्र आल्याने या केस चा सुगाव लवकर लागेल का? या आणि अशा किती तरी प्रश्नांची उत्तरे मिळनार आहे.

“भगवान को मानते हो?” हि सुरुवात करून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सॅक्रेड गेम २ चा टीझर काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. १५ ऑगस्टपासून प्रदर्शित होणाऱ्या सॅक्रेड गेम २ चे काऊंटडाऊन देखील सुरु झाले आहे. गेम सुरु होण्यास १२ दिवस बाकी असताना नेटफ्लिक्सने सॅक्रेड गेमचा रिकॅप पब्लिश केलाय. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी त्याचे पात्र असलेल्या गणेश गायतोंडे स्वतःच्या भाषेत प्रेक्षकांना विचारतोय सिझन २ रिलीज होणे वाला है। तो मेरे को एक बात बता.. तेरे को सिझन १ कि कहाणी याद है ? रुक ‘अभी तेरी यादाश को तडका देता हूँ…’ असे म्हणत भगवान का रिकॅप या टायटल खाली सिझन वनची सगळी स्टोरी सांगतो. या रिकॅप मध्ये गेमची सुरुवात सरदारजी म्हणजेच सैफ अली खानला कॉल करून झाली ते सरदारजीला सुराग मिळाला इथंपर्यंतच्या घटना नेटफ्लिक्सने प्रेक्षकांना दाखवल्या आहेत.

सरदारजी आणि गणेश गायतोंडे दोघांची कथा कशी पुढे जाते आणि या दोघांनाही कोणत्या गोष्टीचे सॅक्रिफाईज करावे लागले. सहा तासाचा हा गेम गायतोंडेच्या पहिल्या आणि दुसऱ्या बापाच्या स्टोरीसह कसा चालतो. याचे वर्णन भगवान का रिकॅप मध्ये करण्यात आलेले आहे. तिसरा बापाच्या भूमिकेत असलेला पंकज त्रिपाठीची एंट्री पहिल्या भागाच्या एण्डला झालेली असल्याने दुसऱ्या भागात गायतोंडेचा हा तिसरा बाप नक्की काय करणार? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. टिझर मध्ये दाखवल्याप्रमाणे हा गुरुजी म्हणजेच पंकज त्रिपाठीच्या मते,’सच को सामने रखने के लिये सबको बलिदान देना पडता है ।’ आणि हेच बलिदान गणेश गायतोंडेने सुभद्रा, कुकू यांच्यामार्फत केले तर सरदारजीने काटेकर, रॉ ची मॅडम, स्वतःच्या हाताचा अंगठा यांच्या मार्फत दिले. भगवान का रिकॅपच्या एण्डला गुरुजी त्याच्या स्टाईल मध्ये प्रेक्षकांना आवाहन करतो,” ये कहाणी और खेल अभी खत्म नहीं हुआ है । १२ दिन बचे है । ये खेल बडा है । बहुत बडा है ।”

सॅक्रेड गेम सिझन १ मध्ये २५ दिवसात शहराचा विनाश होणार आहे आणि यात कोणीच वाचणार नाही तर फक्त त्रिवेदीच वाचणार असल्याचं दाखविण्यात आले होते. फक्त त्रिवेदीच का वाचणार आणि २५ दिवसात शहराचा विनाश कसा होणार हा प्रश्न घेऊन पोलीस इन्स्पेकटर असलेला सरदारजी काम करत असतो प्रसंगी तो सिस्टीमच्या विरोधात त्यांचे कोणतेही आदेश न जुमानता हि केस सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी त्याला सतत मदत करतो तो म्हणजे हवालदार काटेकरच्या भूमिकेत असलेला मराठी अभिनेता जितेंद्र जोशी. केसचा उलगडा करत असतांनाच मराठी अभिनेत्री राधिका आपटेने देखील रॉ ची एक अधिकारी अंजली माथुर ही भूमिका रंगविली आहे; मात्र या केस चा छडा लावत असताना काटेकर आणि रॉ ची अधिकारी या दोघांची हत्या होते.

दुसरीकडे गणेश गायतोंडे आपण कुठून आलो?, कसा घडलो हे सांगतानाच सरदारजीला फोन करून शहराच्या विनाश होणार असल्याची माहिती देतो. त्याच सोबत फक्त त्रिवेदीच वाचणार असल्याचे सांगतो. हा त्रिवेदी सरकारी बाबू असतो त्यासोबतच गणेश गायतोंडे आणि गायतोंडेचा तिसरा बाप गुरुजी अर्थातच पंकज त्रिपाठी यांची ओळख करून देण्यामध्ये मुख्य भूमिका बजावणारा असतो.

ज्या वेळी गणेश गायतोंडे इसा नावाच्या व्हिलनला टक्कर देतो आणि मुंबईवर स्वतःच राज्य निर्माण करून आज से तुम सबका भगवान अपुन है असे सांगत असतो तेव्हा राजकीय नेता बिपीन भोसले आणि पोलीस अधिकारी पारोळकर हे नेहमीच गायतोंडेच्या मागे पुढे असत; मात्र गायतोंडेची प्रेयसी, मित्र आणि बायको यांची हत्या केली जाते तेव्हा गायतोंडे क्रूर कामे करायला सुरुवात करतो यामुळे पोलीस लॉकअप मध्ये ते ही अंडासेल मध्ये त्याला राहावे लागते. पारोळकर त्याची धु धु धुलाई करतो एवढी धुलाई करतो कि अपुन नही बचेगा, अपने का जिने का नही एवढ्या परिस्थितीवर येतो. या दरम्यान सरदारजी म्हणजेच सैफ अली खानचा बाप हवालदार दिलबाघ सिंग अंडासेल च्या ड्युटी वर असतो. गायतोंडेला हिम्मत देण्याचे वेळ पडल्यास डब्यातील भाजी पोळीही तोच देत असतो. त्यामुळे दिलबाघ सिंगने आपल्यावर खूप उपकार केले आहे ते कसे तरी फेडायचे आहेत हेच त्याच्या मनात येत असते.

सिझन १ ने प्रेक्षकांना कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. अभिनय, संवाद यात कुठेही कमी नव्हती. हिंसा, प्रत्येक वाक्यात असलेली शिवराळ भाषा, सेक्सची दृश्ये, अभिनेत्री राजेश्री देशपांडेने दिलेले हॉट सीन, अपर न्युडीटी हे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यातील शिव्या आणि डायलॉग तर अक्षरशः मीम्स साठी वापरले गेले.

एकंदरीतच वेब सिरीजवर कोणतेही सेन्सोर नसल्याने फक्त हॉट दृश्यच नही तर शिवराळ भाषा हिंसेची दृश्ये अतिशय बेलगाम पणे वापरले जातात. याकडे आकर्षित होणारा प्रेक्षक वर्गाच्या मनात सेक्स, शिवराळ भाषा, भाईगिरी असल्या गोष्टी कुठेतरी घर करून बसलेल्या असतात; परंतु सामाजिक दबावामुळे या गोष्टी सहजासहजी बाहेर पडत नाही मग असल्या गोष्टींचा फायदा उठवत नेटफ्लिक्स सारख्या कंपन्या प्रेक्षकांपुढे आणतात.

आता सिझन 2 प्रदर्शित व्हायला 11 दिवस बाकी आहेत. या सिझन मध्ये गणेश गायतोंडेचा तिसरा बाप काय करणार?, सरदार आणि पारोळकर एकत्र आल्याने या केस चा सुगाव लवकर लागेल का? या आणि अशा किती तरी प्रश्नांची उत्तरे मिळनार आहे.

वैभव कातकाडे,
आपलं महानगर, नाशिक