घरफिचर्ससारांशसुखसोयींमध्ये हरवलेला गाव...

सुखसोयींमध्ये हरवलेला गाव…

Subscribe

एका जवळच्या मित्राच्या गावचे घर नूतनीकरण होणार असल्याची बातमी मिळाली. एक लांबलचक हॉल, तीन-चार अरुंद खोल्या, किचन व वॉशरूम्स, बहुतेक सगळंच मॉड्युलर. हे कितपत समाधानकारक आहे?, हा विचार लगेचच मनात आला. वर्षातून दोनदा गावी जाणारे मुंबईकर स्पार्टेक्सच्या टाईल्सवर कधी चाललेच नाहीत, शॉवर कधी पाहिला नाही आणि स्लॅबच्या घरात कधी राहिले नाहीत. लाखो विटा आणि हजारो किलो सिमेंटने जागेचा होणारा विध्वंस बहुदा नूतनीकरणाच्या उत्साहाच्या मागे कुठे तरी दडून बसला असावा. गावालाच गावसारखं घर नसेल तर ते गाव वाटेल? माडीऐवजी स्लॅबचा विचार करताच, एखाद्या देखावा स्पर्धेत भाग घेतल्याचा भास झाला.

निसर्गप्रेम हे आम्हा दोघा भावंडांना आमच्या पालकांकडून मिळाले. चाळीतील सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकसाठी घेऊन जाण्याचा हा त्यांचा विचार नक्कीच आम्हा लहानांमध्ये निसर्गाविषयीची जागरूकता व संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. गड-किल्ल्यांचा इतिहास व त्याबद्दलची माहिती मिळवण्याची ही नेहमीच एक चांगली संधी असे. दिवाळीतील किल्ले-बांधणी स्पर्धेत त्यांने रात्री ठेवलेला शेवटचा मैलाचा दगड आम्हाला प्रथम पारितोषिक देऊन गेला, परंतु ते काही बक्षीस वाटप समारंभाला उपस्थित राहिले नाहीत. कदाचित त्यांच्या जीवनशैलीतून शिकवण व प्रेरणा मिळाल्याने पाय जमिनीवर आणखी घट्ट रोवले गेले. अर्ध्या फुटाचे करंडक उचलण्यासाठी आम्ही 10 मुले व्यासपीठावर सज्ज झालो, आणि जिवापेक्षा जास्त ते बक्षीस जपून एक एक आठवडा प्रत्येकाच्या घरी ठेऊ लागलो. अगदी चमकावून!

तेव्हा त्याला किंमत होती. आठवडाभर पाठीवर दगड व माती वाहिल्याची किंमत. पण खरे बक्षीस त्या फिनिशरचे, ज्याने स्पर्धेच्या आदल्या रात्री चमत्कार केला. लहानपणापासून रुजवलेल्या त्या बियाणाला पालवी फुटायला बराच अवधी गेला. साधेपणात दडलेली सभ्यता ही समजू लागली. अल्लडपणा थोडा कमी झाला व दरमहा गडकिल्ले, वने व दर्‍याखोरी फिरण्याची आवड तितकीच बळकट होत गेली. पावसाळ्यात खोबण्यांमध्ये रात्र काढण्या-ऐवजी आता आम्ही हॉटेल्स बुक करू लागलो. पण खोबण्यांमधील ती मजा बंद खोलीत कधी मिळालीच नाही. पण माणसाने धंदे उघडण्यासाठी कोणते क्षेत्र शिल्लक ठेवले आहे?

- Advertisement -

एका जवळच्या मित्राच्या गावचे घर नूतनीकरण होणार असल्याची बातमी मिळाली. एक लांबलचक हॉल, तीन-चार अरुंद खोल्या, किचन व वॉशरूम्स, बहुतेक सगळंच मॉड्युलर. हे कितपत समाधानकारक आहे?, हा विचार लगेचच मनात आला. वर्षातून दोनदा गावी जाणारे मुंबईकर स्पार्टेक्सच्या टाईल्सवर कधी चाललेच नाहीत, शॉवर कधी पाहिला नाही आणि स्लॅबच्या घरात कधी राहिले नाहीत. लाखो विटा आणि हजारो किलो सिमेंटने जागेचा होणारा विध्वंस बहुदा नूतनीकरणाच्या उत्साहाच्या मागे कुठे तरी दडून बसला असावा. गावालाच गावसारखं घर नसेल तर ते गाव वाटेल? माडीऐवजी स्लॅबचा विचार करताच, एखाद्या देखावा स्पर्धेत भाग घेतल्याचा भास झाला. हल्ली, शेजार्‍याच्या घरापेक्षा एखादी खोली जास्त असली तरच मनाचे समाधान होते.

शेणाने सारवलेलं व चिराणे बांधलेल्या कौलारू घराचे साधेपण व सौंदर्य कोणाला नको असेल?
इको-फ्रेंडली हौसिंगची कल्पना या दशकात जरी जोमाने वाढली असली तरीही आपले पूर्वज वर्षा-वर्षांपासून निसर्गाशी किती मिळून मिसळून राहिले हे विसरून चालणार नाही. पावसाचे पाणी साठवण्याला एक मोठ्ठा इंग्रजी शब्द (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आलाय इतकंच! घराच्या अंगणात व मागल्या दाराकडे एका स्वरूपाने लावलेली फुलझाडे, औषधी झाडे व कुंपणाला लावलेली स्थानिक झाडे म्हणजे आत्ताचे लँडस्केपिंग. नक्कीच या नव्या कल्पनेचा आधार विज्ञान आहे व त्यात अनेक घटकही आहेत, पण सांगण्याचे तात्पर्य इतकेच की हे सगळं आधीही केले जात असे. शहरीकरण व वाढत्या लोकवस्त्यांमुळे ही प्रथा हरवली होती जी पुन्हा एका व्यवसायाच्या स्वरूपात आली आहे. आधी झाडे तोडून घरे बांधा, आणि मग तीच झाडे नर्सरीतुन विकत घ्या. निसर्गासोबत रूळलेले, स्थानिक मिळणारे साहित्य वापरून, त्या ठिकाणच्या तापमानासोबत ताळमेळ असणार्‍या व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून सध्या आणि सुंदर घराची रचना होऊ शकते, ते ही एखाद्या सिमेंटच्या घराच्या अर्ध्या किमतीत.

- Advertisement -

ग्रीन एस्टेट्स, रिअल इस्टेटचा एक भाग जरी असला तरी आपल्या सोयींचा उगाच अतिरेक न व्हावा एवढे जरी ध्यानात ठेवले, तरी समाधान लाभेल. सुखसोयींच्या इच्छेचे चक्र इतक्याही वेगाने फिरू नये की त्यास समाधानाची परिसीमा ओलांडून पुन्हा माघारी फिरणे कठीण जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -