घरफिचर्ससारांशएज इज जस्ट अ नंबर

एज इज जस्ट अ नंबर

Subscribe

ओटीटी आल्यांनतर ज्या काही चांगल्या गोष्टी गेल्या काही वर्षात घडल्या आहेत त्यापैकीच एक आहे ती म्हणजे सोकॉल्ड जुन्या अभिनेत्रीचं पुनरागमन...गेल्या काही महिन्यात ही संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, आपल्या रुपासोबतच आपला अभिनय टिकवून ठेवलेल्या या अभिनेत्रींचे पुनरागमन अनेक गोष्टींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षात वाढलेले नायिका प्रधान सिनेमांचे प्रमाण आणि प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, त्याचा इंडस्ट्रीवर पडलेला प्रभाव या सगळ्यांची फलश्रुती म्हणजे हे पुनरागमन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा अभिनय आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता म्हणायला हरकत नाही, एज इज जस्ट अ नंबर.

अतरंगी रे नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला, या सिनेमात अक्षय कुमारसमोर सारा अली खान नावाची अभिनेत्री आहे. सैफ अली खानची मुलगी म्हणून सारा आता सर्वाना माहितीये. सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांनी ज्यावर्षी पहिला सिनेमा सोबत केला होता, त्यावर्षी सारा अली खानचा जन्मदेखील झाला नव्हता. अक्षय कुमार एक अभिनेता म्हणून कसा आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, आज तो 54 वर्षांचा आहे आणि ज्या अभिनेत्रीसोबत तो काम करतोय ती 26 वर्षांची… पण हा मुद्दा आज कशासाठी ? बॉलिवूडमध्ये नायक कायम तरुण राहतो तर नायिका सर्वात आधी वयस्क बनते. वयाच्या पस्तिशीत आली की, तिचे सिनेमे कमी होतात आणि चाळीशीत तिच्याकडे कामच शिल्लक राहत नाही. साधारणतः आपल्याकडे एखाद्या अभिनेत्रीचं करियर नायिका म्हणून फार तर 10 वर्षं आणि खूपच लवकर पदार्पण झालं असेल तर 15 वर्षांचं करियर असतं. याउलट नायक मात्र आपल्याला 30 तर कधी कधी 40 वर्षंदेखील नायकच दिसतो.

‘मैने प्यार किया’मधला सलमान असो किंवा ‘राधे’ मधला सलमान तो नायकच आहे, पण त्याकाळातील एखादी अभिनेत्री तुम्हाला आज नायिका म्हणून कुठे दिसते का? आपल्याकडे नायक पन्नाशीचा झाला तरी तो नायक असतो, कधी तरी मोठा भाऊ बनतो किंवा खूपच म्हातारा झाला तर बाप बनतो, त्यातही बापाची भूमिका महत्वाची असेल तर, एकंदरीत नायकाला आयुष्यभर नायकत्व मिळत, पण नायिकेच्या नशिबात हे नसते. आधीपासूनच आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ सुंदरता, नायकाच्या मागे उभी राहणारी, जिला नायक वाचवतो किंवा जिच्यासाठी तो इतरांविरुद्ध लढतो अशी व्यक्ती म्हणून दाखवली आहे. ओटीटी आल्यांनतर ज्या काही चांगल्या गोष्टी गेल्या काही वर्षात घडल्या आहेत त्यापैकीच एक आहे ती म्हणजे सोकॉल्ड जुन्या अभिनेत्रीचं पुनरागमन…गेल्या काही महिन्यात ही संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, आपल्या रुपासोबतच आपला अभिनय टिकवून ठेवलेल्या या अभिनेत्रींचे पुनरागमन अनेक गोष्टींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षात वाढलेले नायिका प्रधान सिनेमांचे प्रमाण आणि प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, त्याचा इंडस्ट्रीवर पडलेला प्रभाव या सगळ्यांची फलश्रुती म्हणजे हे पुनरागमन आहे असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

नव्वदीच्या काळातील 3 लोकप्रिय अभिनेत्रींनी नुकतेच ओटीटीवर पुनरागमन करत सर्वांच्या नजरा पुन्हा आपल्यावर खेचल्या आहेत, या तीनही नायिका आपल्या काळातील सुपरहिट नायिका म्हणून ओळखल्या जातात, पण पस्तिशीत इंडस्ट्रीपासून दूर गेलेल्या या अभिनेत्रींनी पंचेचाळीशी ओलांडल्यानंतर इंडस्ट्रीत पुनरागमन केलंय. 1994 साली मिस युनिव्हर्सचा मुकुट भारतात घेऊन आल्यानंतर सुष्मिता सेनसाठी इंडस्ट्रीची दारे खुली झाली, दरम्यानच्या काळातच तिने इंडस्ट्रीत आपले पाय घट्ट केले आणि 2010 पर्यंत सिनेमात काम केलं. पण मग तब्बल 10 वर्षं इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर 2020 साली तिची आर्या नावाची एक वेबसिरीज डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली, या वेबसिरीजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती आणि तिचा पहिला सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला. नुकताच या सिरीजचा दुसरा सिझनदेखील प्रदर्शित झालाय ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीवर आधारित असलेल्या पेनोझा नावाच्या डच सिरीजचा रिमेक ही सिरीज होती, ज्यात नायिका आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी अनपेक्षितपणे या व्यवसायात ओढली जाते आणि नंतर मग याच व्यवसायाचा एक भाग बनते. सिरीजमध्ये सुष्मिताची भूमिका इतकी दमदार आहे की, बाकी सगळे सहकलाकार लक्षातदेखील राहत नाही, तिचा अभिनय अधिक प्रगल्भ झालेला तर दिसतोच पण सोबत तिच्या सौंदर्यातदेखील कुठेच कमी झालेली दिसत नाही. सुश्मिता सेनप्रमाणेच नव्वदीतील शिल्पा शेट्टीने ओटीटीवर पदार्पण केलंय. हंगामा सिनेमाच्या सिक्वेलमध्ये शिल्पा शेट्टीने मुख्य भूमिका निभावली आहे. हंगामा 2 हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी डिस्नी हॉटस्टारवर रिलीज झाला, त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नसला तरी शिल्पा शेट्टीच्या लूक आणि अभिनयाची बरीच चर्चा झाली होती. शिल्पा शेट्टीची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली ती बाजीगरसारख्या सुपरहिट सिनेमाने शेवटी 2008 साली दोस्तानामध्ये तिने काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून डान्स रिअ‍ॅलिटी शोजमध्ये परीक्षण करणारी शिल्पा आता येणार्‍या काळातही काही सिनेमा-वेबसिरीजमध्ये अभिनय करताना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारचे मोहरा सिनेमातील सुपरहिट गाणे टिपटिप बरसा पाणी रिक्रिएट करण्यात आले आहे. सिनेमात त्या गाण्यावर नाचताना अक्षयसोबत कॅटरिनाला पाहिल्यावर मूळ गाण्याची आणि त्यावर नाचणार्‍या त्या अभिनेत्रीची आठवण झाली आणि त्यानंतर काहीच दिवसांनी नेटफ्लिक्सवर रविना टंडनची वेबसिरीज ‘अरण्यक’ प्रदर्शित झाली. नायिका म्हणून शेवटच्या वेळी रविना टंडन 2006 साली आलेल्या सॅन्डविच नावाच्या सिनेमात दिसली होती. 1991 ते 2006 या 15 वर्षात 75 च्या वर सिनेमात काम केलेल्या रविना टंडनचे हे पुनरागमन सर्वात दमदार म्हणावे लागेल, कारण या सीरिजला मिळणारा प्रतिसाद हा तिच्या अनेक सिनेमांपेक्षाही खूप जास्त होता. एका पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत रविनाला पाहणे प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी होती, सौंदर्यापेक्षाही तिचा अभिनय खरंच वाखाणण्याजोगा होता. रविनाचे हे पुनरागमन अधिक मोठे होणार होते, पण लॉकडाऊनमुळे ते लांबले. कारण ब्लॉकबस्टर सिनेमा केजीएफ 2 चे प्रदर्शन पुढच्या वर्षी होणार आहे. ज्या सिनेमात रवीनाने महत्वाची भूमिका साकारली आहे.

पण माझ्यासाठी त्या सिनेमापेक्षाही अरण्यकमधील रविनाची भूमिका अधिक महत्वाची होती, कारण या सीरीजमध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. केवळ सुष्मिता सेन, रविना टंडन, शिल्पा शेट्टी या तीन अभिनेत्रीच नव्हे तर धकधक गर्ल माधुरी दीक्षितही लवकरच फाइंडिंग अनामिका नावाच्या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ओटीटी हे अशा सर्व पुनरागमन करू इच्छिणार्‍या अभिनेत्री आणि अभिनेत्यांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म बनले आहे. याची काही मुख कारणं म्हणजे एक तर यात फार मोठ्या ओपनिंगची किंवा थिएटर स्क्रीन्स मिळण्याची भीती नसते. कमी बजेटमध्ये सिनेमे आणि सिरीज बनवता येतात. इथे वेगळे विषय हाताळता येतात आणि मुख्य म्हणजे जुन्या लोकांना घेऊन प्रयोग करता येतात. बॉलिवूड बदलतंय म्हणा किंवा प्रेक्षक त्याला बदलायला भाग पाडताय म्हणा, पण एक गोष्ट मात्र खरी की, जे बदल व्हायला आधी 10 वर्ष लागायची तेच बदल आता 2 वर्षात होतात, अभिनेत्रीचं हे कमबॅक त्याचच ताज उदाहरण म्हणता येईल. नायिका प्रधान सिनेमांची संख्या वाढली आणि त्याचा थेट परिणाम आपल्या सांसारिक जीवनात व्यस्त झालेल्या किंवा अभिनयाला दुसरे ऑप्शन निवडलेल्या अभिनेत्रींवर झाला आणि पुस्तकात वाचलेलं एक वाक्य आठवतं त्यांनी पुनरागमन करण्याचं ठरवलं. त्यांचा अभिनय आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता म्हणायला हरकत नाही, एज इज जस्ट अ नंबर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -