घरफिचर्ससारांशना टॉप ना बॉटम मधेच अडकलेला बेलबॉटम

ना टॉप ना बॉटम मधेच अडकलेला बेलबॉटम

Subscribe

बेलबॉटम ही अत्यंत साधारण फिल्म नाही जी बघून तुम्ही बोअर व्हाल, पण ती अशीही फिल्म नाही जी संपल्यानंतर तुम्ही काही तरी भारी पाहिलंय असा फील येईल. उत्तम आणि वाईट याच्या मधोमध कुठेतरी हा सिनेमा येईल. जो मसाला सिनेमाच्या कथेत होता त्याचा विचार केला तर याचं सादरीकरण फारच साधारण वाटेल, विचार करा. 1984 ची अशी घटना. 5 वर्षात 7 प्लेन हायजॅकिंगच्या घटना घडल्यात, ज्यात आयएसआयचा हात असल्याची शक्यता तर आहे, पण त्याविरुद्ध पुरावा नाही.

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणजे अक्षयकुमार, कोरोनाच्या आधीच्या वर्षात म्हणजे 2019 मध्येही मिशन मंगल, केसरी, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज असे 4 हिट सिनेमे देऊन आपणच बॉलिवूडचे किंग आहोत हे अक्षयकुमारने सिद्ध केलं होतं. मार्च 2020 मध्येही ‘सूर्यवंशी’च्या माध्यमातून दमदार सुरुवात करण्याची इच्छा त्याची होती, पण कोरोना लॉकडाऊनने थिएटर बंद पडले आणि अक्षयसह बॉलिवूड फिल्म्सच्या चाहत्यांचे स्वप्नही भंगले. दरम्यानच्या काळात अक्षयने ‘लक्ष्मी’च्या माध्यमातून ओटीटीवर एंट्री करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो सपशेल आपटला आणि कधी नव्हे ते अक्षयला अपयशाला सामोरं जावं लागलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच, जेव्हा देशातील विविध राज्यात सिनेमागृहे पुन्हा सुरू होत होती तेव्हा त्यांना पुनः जीवित करण्याचा विडा अक्षयने उचलला आणि आपला आगामी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणार असल्याचे सांगितले, हा सिनेमा 2 कारणांसाठी स्पेशल होता पहिलं म्हणजे हा कोरोनानंतर सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा हिंदी सिनेमा आहे आणि दुसरं म्हणजे पहिल्या लॉकडाऊननंतर चित्रित झालेलादेखील हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.

लक्ष्मीच्या अपयशानंतर नवीन सिनेमा प्रेक्षकांसमोर आणताना अक्षयकुमारने आपले सर्वाधिक चलनी नाणे अर्थात देशभक्तीपर सिनेमा वापरले आणि ऑगस्ट महिन्यात देशातील काही थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज करून 15 ऑगस्टच्या मुहूर्ताचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न अक्षयकुमारने केला. 80 च्या दशकात भारतात घडणार्‍या प्लेन हायजॅकच्या सत्य घटनांवर आधारित अक्षयकुमारचा बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’ हा सिनेमा नुकताच ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला आहे, यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी देशातील काही भागातील थिएटर्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, परंतु कोविड नियमांमुळे बॉलीवूडला 33 टक्के महसूल देणार्‍या महाराष्ट्र राज्यातील प्रेक्षकांना सिनेमागृह बंद असल्याने हा सिनेमा पाहता आला नव्हता. अक्षयकुमार, लारा दत्त, वाणी कपूर, हुमा कुरेशी, आदिल हुसेन यांसारखी मोठी नावं आणि लोकांना आवडणारा पॅट्रिओट्रिक जॉनर असतानाही हा सिनेमा फार उत्तम का बनू शकला नाही? याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न.

- Advertisement -

‘बेलबॉटम’ हा सत्य घटनांवर आधारित सिनेमा आहे, ज्याची कथा 80 च्या दशकात घडलेल्या प्लेन हायजॅकिंगच्या घटनांवर आधारित आहे. ट्रेलर पाहिला की, सिनेमाची कथा लक्षात येते, जे ट्रेलरमध्ये दाखवलंय त्यापेक्षा काहीच वेगळं सिनेमात दाखवलेले नाही. सिनेमाची सुरुवात एका प्लेन हायजॅकिंगने होते, ज्याची माहिती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना (लारा दत्ता) एका मीटिंगमध्ये दिली जाते, पाच वर्षात 7 व्या वेळी घडणारी ही विमान अपहरणाची घटना आहे, म्हणून पंतप्रधान त्वरित सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलवतात ज्याला आयबी, रॉसह प्रमुख कॅबिनेट मंत्री उपस्थित होतात. अतिरेक्यांशी बोलणी करणे सोडून त्यांना सडेतोड उत्तर द्यावे असा विचार ठेवणारा एक रॉ अधिकारी बैठकीत दाखल होतो, ज्याचे कोडनेम आहे बेलबॉटम(अक्षयकुमार ). त्याच बैठकीत आदिल हुसेन बेलबॉटम प्लेन हायजॅकिंग केसमध्ये वैयक्तिक रस असलेला अधिकारी आहे, असं इंदिराजींना सांगतो आणि सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो, याच फ्लॅशबॅकमध्ये बेलबॉटमशी संबधी सर्व पात्रांची ओळख करून दिली जाते आणि कथा पुढे सरकते.

एका रॉ ऑफिसरने 210 प्रवाशांना अतिरेक्यांच्या तावडीतून कुठल्याही निगोशिएशनशिवाय दुसर्‍या देशातील जमिनीवरून परत आणण्याचं प्रॉमिस यशस्वी होतं का? हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येईल. एका उत्तम देशभक्तीपर पटामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या सिनेमाच्या कथेत होत्या, नवीन कथा आणि पाकिस्तान दोन्ही गोष्टी सिनेमात असताना यात एक गोष्ट कथेसाठी अडसर ठरली ती म्हणजे सिनेमात असणारी गाणी, सिनेमा संपला की, गाणी कुठली होती हे लक्षातदेखील राहणार नाही, अशी बेलबॉटममधील गाणी आहेत. सेकंड हाफपर्यंत सिनेमात फार काही घडत नाही, हा सिनेमा घटनेपेक्षा जास्त महत्व एका व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाला देतो म्हणून तुम्ही यासोबत लवकर कनेक्ट होऊ शकत नाही.

- Advertisement -

बेलबॉटम ही अत्यंत साधारण फिल्म नाही जी बघून तुम्ही बोअर व्हाल, पण ती अशीही फिल्म नाही जी संपल्यानंतर तुम्ही काही तरी भारी पाहिलंय असा फील येईल. उत्तम आणि वाईट याच्या मधोमध कुठेतरी हा सिनेमा येईल. जो मसाला सिनेमाच्या कथेत होता त्याचा विचार केला तर याचं सादरीकरण फारच साधारण वाटेल, विचार करा. 1984 ची अशी घटना. 5 वर्षात 7 प्लेन हायजॅकिंगच्या घटना घडल्यात, ज्यात आयएसआयचा हात असल्याची शक्यता तर आहे, पण त्याविरुद्ध पुरावा नाही. एक प्लेन हायजॅक होतं आणि पंतप्रधान याआधी 6 वेळा अतिरेक्यांशी बोलणी केलेल्या पाकिस्तानला त्या अतिरेक्यांसोबत बोलणी करण्यापासून रोखत 210 प्रवाशांचे प्राण धोक्यात टाकून एका मिशनला परमिशन देतात.

ते विमान लाहोरवरून दुबईला जाते आणि तिथे काही तासांच्या आत रॉ अधिकार्‍याला असे एक मिशन करायचे आहे, ज्यात रक्तपात होणार नाही, ज्यामध्ये स्थानिक प्रशासन तुमची मदत करणार नाही आणि त्याची माहिती पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही शत्रूंना होणार नाही. एक उत्कृष्ट थ्रिलरसाठी लागणारा सर्व मसाला या सिनेमाच्या कथेत होता, ज्याचे सादरीकरण करताना जर फक्त मिशनचे 6 ते 8 तास दाखवले असते तर उत्कृष्ट सिनेमा बनू शकला असता, पण नाही दिग्दर्शकाला अधिक रस होता, तो आपल्या हिरोला हिरो का म्हणावं हे दाखवण्यात, म्हणून तो चेस खेळतो. 4 भाषा बोलतो यांसारख्या गोष्टी एक्सप्लेन करण्यात आणि वारंवार फ्लॅशबॅक दाखवण्यात वेळ घालविला आहे.

खरा सिनेमा घडतो तो शेवटच्या 35 /40 मिनिटात, जिथे फिल्डवर सगळं काही वेगाने घडतं आणि सिनेमाचा शेवट होतो. अक्षयकुमार या सिनेमात फार उड्या मारताना किंवा अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही म्हणून तो चांगला वाटतो, त्याची भूमिका नेहमीप्रमाणे उत्तम आहे, पण त्याहीपेक्षा वरचढ ठरतो तो झैन खान दुराणी ज्याने मुख्य खलनायकाच्या तोडीची भूमिका साकारली आहे. लारा दत्ताचं प्लास्टिक नाक सोडलं तर तिचा अभिनय उत्तम आहे. आदिल हुसेनचे पात्र कथेत महत्वाचं आणि गंभीर दाखवलंय खरं, पण शेवटी रॉ काय आहे सांगताना त्यांचा कुत्र्यावाला डायलॉग त्यांच्या एकूण पात्राची माती करून जातो. बाकी 6 वर्षात 3 सिनेमे करणारी वाणी कपूर आणि हुमा कुरेशी आहेत म्हणून आहेत, त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. कथेत त्यांना दिग्दर्शकाने महत्व देण्याचा अपयशी प्रयत्न केलाय.

बेलबॉटम फार देशभक्ती देशभक्ती करत नाही म्हणून चांगला वाटतो, यात ओव्हर वाटेल अशा काही गोष्टी दाखविल्या नाहीत म्हणून तो खरा वाटतो, यात संवाद फार ओव्हर नाहीत म्हणून तो पाहू शकतो. एकंदरीत काय तर बर्‍याच दिवसांपासून घरात बसलेल्या प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये हा सिनेमा ट्रीट आहे तर घरी बसून ओटीटीवर चांगला कंटेंट पाहणार्‍या प्रेक्षकासाठी पुन्हा मोबाईल टीव्ही स्क्रीनवरच हा सिनेमा पाहणे एक टाळता येणारा पर्याय …

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -