घरफिचर्ससारांशचाईल्ड पोर्नोग्राफी एक भयानकता

चाईल्ड पोर्नोग्राफी एक भयानकता

Subscribe

डिसेंबर 2019 मध्ये 100 शहरांमध्ये सार्वजनिक ‘वेब’वर ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठी सरासरी 50 लाख इतकी दरमहा मागणी होती, ती आता वाढली आहे. या अहवालानुसार, मुले गुदमरणे, त्यांना रक्तस्राव होणे आणि त्यांचा छळ होणे, या स्वरुपाच्या हिंसक मागणीत 200 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ‘भारतीय पुरुष सर्वसाधारण चाईल्ड पोर्नोग्राफीत समाधान मानत नाहीत, त्यांना हिंसक आणि शोषक स्वरुपाच्या फिल्म पाहायच्या असतात.

90 च्या दशकात अनेक लेखकांनी शृगांरिक कथा असणारी पुस्तके, कादंबर्‍या प्रकशित होत होत्या,रत्नाकर मतकरी यांचे ‘ऍडम’ ही शृगांरिक कादंबरी खूप गाजली. डॉ.विठ्ठल प्रभू यांचे ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ हे पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हाती लागले होते. हे पुस्तक ऐन तारुण्यात आलेल्या मुलामुलींसाठी डॉ.प्रभू यांनी लिहिले होते. या पुस्तकात स्त्री-पुरुषांच्या अंतरबाह्य शरीराची रचना केलेली आहे. तसेच वयात येणार्‍या मनुष्याच्या शरीरातील होणारे बदल, अशा वेळी काय करावे आणि काय नाही करावे, याची इत्यंभूत माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाला तरुण तरुणींकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. वस्त्रविरहित स्त्रिया, मॉडेल यांचे रंगीत छायाचित्रे असलेले मासिकाचे वेगळेच आकर्षण होते. शृंगारिक कथा-कादंबर्‍या, पुस्तके आणि मासिक यांची वाचकाकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. मात्र 2१ व्या शतकात इंटरनेट, मोबाईल फोनने या कादंबर्‍या आणि पुस्तकाची जागा घेतली. भारतात इंटरनेटचा आविष्कार झाला आणि पाश्चिमात्य संस्कृती भारतात नांदू लागली, ‘पोर्नोग्राफी’च्या हजारो वेबसाईट्सचा महाजंजाळ इंटरनेटच्या माध्यमांतून भारतात उभे झाले.

संगणकावर पॉर्न व्हिडिओ बघणार्‍यांची संख्या हळूहळू वाढत गेली. गुगल तसेच इतर सर्च इंजिनवर सेक्स, ‘न्यूड’ पॉर्न असा शब्द टाकताच संगणकाचा स्क्रीनवर शेकडो पॉर्न साईड विंडो ओपन होत होती. इंटरनेटचा अधिक वापर करणे अथवा डाऊनलोड करणे हे आर्थिकदृष्ठ्या सर्वांनाच परवडत नसल्यामुळे इंटरनेटच्या वापरावर काहीसे बंधन येत होती. काळानुसार ही बंधने काही मोबाईल फोन कंपन्यांनी दूर केली आणि इंटरनेट सुविधा घरोघरी पोहचू लागली तसतसा इंटरनेटचा वापर वाढला. मोबाईल फोनची जागा स्मार्ट फोनने घेतली, त्यात अनेक मोबाईल कंपन्यानी इंटरनेट सेवा सुरू केल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारखे शेकडो सोशल प्लॅटफॉर्म तयार झाली, बालअत्याचारासंबंधी वेबसाईट्स सुरू झाल्या आणि अश्लीलता वाढली. पॉर्न वेबसाइट्सने तर इंटरनेटच्या जगात धुमाकूळच घातला. चाईल्ड पोर्नोग्राफीचे वाढलेल्या प्रमाणासोबत स्त्रिया आणि लहान मुलावर होणार्‍या लैंगिग अत्याचाराच्या घटना समोर येऊ लागल्यामुळे महिलांवरील अत्याचार, अश्लीलता, बाललैंगिग अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, आणि सन 2012 मध्ये भारतात बालकांवरील लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012’ (पॉक्सो) कायदा बनवण्यात आला.

- Advertisement -

भारतात सर्वाधिक इंटरनेटचा वापर हा चाईल्ड चाईल्ड पोर्नोग्राफी बघण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिकेने चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी भारताला दिली आहे. भारतासोबत शेअर केलेल्या अहवालानुसार मागील 5 महिन्यांत 25 हजाराहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडिओ भारतातील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिकाने हा डेटा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाला दिला आहे. सायबर एक्सपर्ट्सनुसार, देशात प्रत्येक 40 मिनिटात एक अश्लील व्हिडिओ बनवला जातो. याप्रकराचे कंटेंट इंटरनेटवर अपलोड करण्यात केरळ अव्वल स्थानी आहे. तर हरियाणात असे व्हिडिओ सर्वाधिक प्रमाणात पाहिले जातात. पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यात लहान आणि किशोरवयीन मुलांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळेच schoolgirls, teens, desi girls हे सर्वाधिक वापरले जाणारे की वर्ड्स आहेत. यामुळे चाईल्ड सेक्सुअल एब्युज मटेरिअरला प्रोत्साहन मिळत आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्स्टच्या अहवालानुसार, देशात 35-40 टक्के पॉर्न कंटेंट रोज डाऊनलोड केला जातो. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदूर यांसारख्या 10 शहरांमध्ये ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठी मोठी मागणी आहे, या बाबतचे संशोधन ‘आयसीपीएफ’ने केले आहे. भारतातील बाल लैंगिक अत्याचार सामुग्री ‘या नावाचा हा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

‘आयसीपीएफ’ने आपल्या अहवालात ‘युरोपोल’, ‘युनायटेड नेशन्स’, ‘ईसीपीएटी’ यांच्या अहवालांचा हवाला दिला आहे. लहान मुलांवर अत्याचार होण्यात आता ऑनलाइन पद्धतीमुळे वाढ झाली आहे. ‘चाइल्ड लाइन इंडिया हेल्पलाइन’च्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तातडीची मदत व संरक्षण मागणारे 92 हजार हून अधिक कॉल्स लॉकडाऊन नंतरच्या 11 दिवसांत या हेल्पलाइनला आलेले आहेत. यावरून, लॉकडाऊन काळात लहान मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे भीषण सत्य समोर येते. ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’सारख्या लैंगिक अत्याचाराच्या कंटेन्टला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली, यातून मुले लैंगिक अत्याचारास बळी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे, असे ‘आयसीपीएफ’ने अहवालात नमूद केले आहे.

- Advertisement -

करोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या काळात ऑनलाइन चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणार्‍यांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण अधिक वाढल्याचं एका निरीक्षणात आढळून आले आहे. लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन असणारे लाखो लोक सध्या ऑनलाईन पद्धतीने आपली विकृती भागवीत आहेत. त्यामुळे मुलांसाठी इंटरनेट हे माध्यम अत्यंत असुरक्षित बनले आहे. लहान मुलांच्या जीवाला व सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर कठोर कारवाई न झाल्यास, मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते, अशी भीती भारतीय बाल संरक्षण निधीने (आयसीपीएफ) व्यक्त केली आहे.

• ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ची ‘हॉटस्पॉट्स’
‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ची मागणी भुवनेश्वर आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक आहे. विशिष्ट व्यक्ती, वयोगट, स्थाने इत्यादींशी संबंधित सामुग्रीची मागणी कोलकाता, सिलीगुडी, हावडा, चंदीगड, गुवाहाटी, इंदूर, भुवनेश्वर आणि चेन्नई या शहरांमध्ये सर्वात जास्त आहे. नवी दिल्ली, लुधियाना, रायपुरा, लखनऊ, चंदीगड, आग्रा आणि सिमला, रायपूर, रांची आणि इंदूरमध्ये, पश्चिमेतील मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदाबाद; पूर्वेस इम्फाळ, गुवाहाटी, कोलकाता, हावडा आणि शिलाँग तसेच दक्षिण भारतात बंगळूर, कोची आणि तिरुअनंतपुरम येथे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ला सर्वाधिक मागणी आहे. तसेच दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ही मेट्रो शहरे, तसेच मध्यम स्वरुपाची व राज्यांच्या राजधानी असलेली शहरे ही ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’साठीची ‘हॉटस्पॉट’ म्हणून गणली गेली आहेत.

• चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण 95 टक्क्यांनी वाढले
देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाईल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणार्‍यांची संख्या वाढली आहे, असा ‘ऑनलाईन डाटा मॉनिटरींग वेबसाईट्स’चा अहवाल आहे. ‘पोर्नहब’ या जगातील सर्वात मोठ्या पोर्नोग्राफी वेबसाइटवरील आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, लॉकडाऊनपूर्वी चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे सरासरी प्रमाण आता तुलनेने 24 ते 26 मार्च 2020 दरम्यान 95 टक्क्यांनी वाढले आहे. हे निरीक्षण ‘आयसीपीएफ’ने मांडले आहे.

• महाराष्ट्र चाईल्ड पोर्नोग्राफीत टॉप 5 वर
देशात सर्वाधिक चाईल्ड पोर्न व्हिडिओ अपलोड करण्यात दिल्ली पाठोपाठ देशातील पाच राज्ये असून त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली ही पाच राज्य चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये टॉप 5 मध्ये मोडतात. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणं उघडकीस आली आहेत. एकट्या मुंबई, पुण्यात चाईल्ड पॉर्नच्या सर्वाधिक क्लिप्स इंटरनेटवर अपलोड झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातही चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी गेल्या महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर सेलकडून राज्यभरात एकूण 27 व्हिडिओवरती कारवाई करण्यात येत आहे. त्यापैकी दोन व्हिडिओ हे बीड जिल्ह्यातून अपलोड झालेले पोलिसांना आढळले आहेत. एक व्हिडिओ गेवराई, तर दुसरा व्हिडिओ परळी येथून सोशल मीडियावर अपलोड झाला आहे. चाईल्ड पॉर्नविषयक राज्यनिहाय आकडेवारी जारी करण्यात आलेली नसली, एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार चाइल्ड पोर्नोग्राफीत दिल्लीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात1700 व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर अपलोड झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. सर्वाधिक 653 प्रकरणे मुंबईतून समोर आली असून त्या पाठोपाठ पुणे 542, ठाणे 94, नागपूर 64 तर नवी मुंबई 38 अशी संख्या आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक म्हणजे 12 गुन्हे दाखल झाले असून नागपूर 9, औरंगाबाद 8, मुंबई 7, नागपूर ग्रामीण 6 गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पॉक्सो कायद्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची व्याख्या बदलण्यात आली, त्याचप्रमाणे व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पॉर्नोग्राफी अंतर्गत फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा कॉम्प्युटरवर बनवण्यात आलेले फोटो गुन्हा ठरवण्यात आले आहेत.

देशात कडक कायदा
चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत केंद्र सरकारने लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आता फाशीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही 12 वर्षांखालील मुलींवर लैंगिग अत्याचार झाल्यास आरोपीला फाशी देण्याची तरतूद केंद्र सरकारने केली होती.

राज्यात ऑपरेशन ब्लॅक फेस
राज्यभरातील चाइल्ड पोर्नोग्राफीचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या1700 चित्रफिती आढळल्या असून पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 96 गुन्हे दाखल केले आहेत. चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधी ऑपरेशन ब्लॅक फेस हाती घेण्यात आले असून यामध्ये आतपर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे. बालकांचे लैंगिक शोषण ही फार गंभीर बाब असून लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, इंटरनेटवर अपलोड करणे किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणे हा गुन्हा आहे. अशा कारवायांवर पोलिसांची बारीक लक्ष असून ऑपरेशन ब्लॅक फेस ही विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी म्हटलं आहे.

संतोष वाघ (लेखक आपलं महानगरचे प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -